• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १८८

२) युरोपमध्ये फॅसिस्ट जुन्या राजवटी होत्या त्या गेल्या. पोर्तुगाल व स्पेनमध्ये लोकशाही राजवटी आल्या आहेत किंवा येऊ घातल्या आहेत. सोशल चेंजवर भर देऊन या लोकशाहीची वाटचाल होईल अशा प्रकृति दिसत आहेत. पश्चिमेकडील प्रगत राष्ट्रांच्या राज्यव्यवस्थेमध्ये Plurality of Political Parties हे एक महत्त्वाचे अंग आहे. (आफ्रिकन विकसनशील देशांमध्ये याचे उलट चित्र आहे.) त्यात कम्युनिस्ट पक्षाला आपली भूमिका वटवायची आहे. त्यामुळे त्यांचे कार्यनीतीचे स्वरूप बदलते. पूर्व युरोपचे त्यांना अनुकरण करण्याची गरज नाही. सोशल चेंजला पायाभूत मानून प्रगत पक्षाची एकजूट वा सहकार्याची भूमिका ही त्यांना महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने पश्चिम युरोपमध्ये कम्युनिस्ट मुव्हमेंटमध्ये नव्या कल्पानांचा उदय झाला आहे.

जागतिक कम्युनिस्ट चळवळीला मार्गदर्शक असे कुठे एक केंद्र असू शकत नाही. (हा त्यांचा टोला रशियाला होता.) पश्चिम युरोपचे बाबतीत नव्हे तर पूर्व युरोपचे दृष्टीनेही.

३) चीनमध्ये अंतर्गत झगडे आहेत. परंतु It is China's business झगडे आहेत याचाच अर्थ आपली अंतर्गत स्थिति व भावी धोरणाची दिशा बळकट करण्याच्या प्रयत्नात चीन गुंतला आहे, रशिया व चीन यांचे संबंध सुधारतील. हिंदुस्थानचे व चीनचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. गति कदाचित मंद राहील. परंतु दोन्ही देशएकमेकांकडे दुर्लक्ष करूच शकत नाहीत इतका त्यांचा शेजार निकटचा आहे व त्यांची प्रत्यक्ष वा सुप्त सामर्थ्ये (पोटेन्शिअल) इतकी जबरदस्त आहेत.

माकोव्हेस्कीने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर सरकारी धोरणाचा कसा भर आहे; किंबहुना चालू योजनेचा काळ त्या दृष्टीने क्रांतिकारक कसा आहे ते सांगितले. ''शेती, उद्योग व शिक्षण यांचे आधुनिकीकरण व विस्तार हा या कामाचा पाया आहे. मार्क्सने दास कॅपिटलमध्ये सांगितलेल्या गोष्टी तशाच या नव्या काळात लागू पडत नाहीत. काळ व परिस्थिती यांच्याबरोबर इतिहास पुढे गेला आहे. ते ध्यानात घेऊन आमचा देश वागत आहे.''

हे सर्व क्लिष्ट लिहिणे आहे. पण महत्त्वाच्या जागी काम करीत असलेल्या लोकांच्या विचारांची, हे लिहिताना उजळणी होते व नोंदही राहते. एवढेच हे सर्व लिहिण्याचा उद्देश!