• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १८७

९७ रोम
१९ जानेवारी, १९७७

लवकर दिल्लीला पोहोचावे म्हणून बुखारेस्टवरून निघणारे पहिले विमान गाठून आम्ही सकाळी ११ वाजता आलो. अडीच वाजता एअर इंडियाची फ्लाइट येणार होती. आता संध्याकाळचे ७ वाजलेत पण अजून विमान केव्हा येणार ते निश्चित असे कुणालाच माहीत नाही.

प्रत्येक एक तासानंतर वेळ वाढवून सांगत आहेत. आताच्या माहितीनुसार रात्री ९॥ वाजता येईल आणि १०॥ वाजता निघेल. कोण जाणे!

दुसरी दिल्लीला जाणारी सर्व्हिस नाही. प्रागची भेट, दिल्लीला लवकर जाता यावे म्हणून टाळली. आणि येथे अकारण १२ तास फुकट गेले. एअर इंडियाचे बाबतीत हे नेहमी घडते. उगाच मन:स्ताप!

मी यापूर्वी रुमानियाच्या भेटीचे सारांशरूपाने लिहिले आहे. तेथे झालेल्या चर्चा फार उपयोगी व महत्त्वाच्या आहेत. पुढे स्मरणातूनही जातात. (सरकारी अहवाल असतात ही वेगळी गोष्ट.) म्हणून त्यांचा महत्त्वाचा गोषवारा नमूद करीत आहे.

माझ्या दोन महत्त्वाच्या चर्चा झाल्या. एक प्रेसिडेंट चाऊ शेस्कू यांच्याशी व दुसरी विदेशमंत्रि माकोव्हेस्कीशी. पहिली दोन तास व दुसरी तीन हप्त्यात पाच तास.

त्या दोघांनीही आपल्या देशांचे प्रश्न मूलत: मांडले आणि त्या संदर्भात त्यांनी काही मूलभूत गोष्टीही सांगितल्या.

चाऊ शेस्कू साठी, त्यांनी अधिक बोलावे म्हणून माझ्या प्राथमिक संभाषणात तीन प्रश्न त्यांच्यापुढे उभे केले होते.

१) हेलेसिंकी नंतरच्या युरोपचे स्वरूप. २) युरोपामधील आजचे कम्युनिस्ट व नॉन कम्युनिस्ट आंदोलनाचे स्वरूप, त्यातील नव्या प्रवृत्ति व कल्पना आणि ३) चीनमधील अंतर्गत परिस्थिती व भावी धोरणाची दिशा.

त्यांची उत्तरात्मक चर्चा अशी –

१) हेलेसिंकी ही युरोपच्या दृष्टीनेही घडलेली महत्त्वाची घटना आहे. लष्करी तयारी व शस्त्रास्त्राची मर्यादा या बाबतीत तेथे व्यक्त झालेले विचार हे मूलगामी म्हणून महत्त्वाचे, परंतु या बाबतीत हेलेसिंकीनंतर काहीच प्रगति दोन्ही बाजूंनी झाली नाही. आणि हे घडले नाही तर हेलेसिंकी फुकट आहे. १० टक्के लष्करावरील खर्च कमी झाला पाहिजे. पश्चिमी देश नंबर ३ चे बास्केट धरून बसले आहेत. त्यालाही महत्त्व आहे पण ते इतके महत्त्वाचे नाही की ज्यामुळे त्यालाच प्राधान्य मिळावे.