• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १७८

९१ सॅनफ्रॅन्सिस्को
१० ऑक्टोबर, १९७६

न्यूयॉर्कहून निघण्यापूर्वी लिहीन म्हटले पण शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाची न कळत इतकी गर्दी झाली की निवांतपण मिळालेच नाही. ८ तारखेला बांगला देशचे 'लंच' चे आमंत्रण मी व श्री. रिखी जयपाल, दोघांनीही स्वीकारले होते. त्यांचा आग्रहही फार होता. गेलो ते बरे झाले.

त्यांची दृष्टी कितीही दूषित असली तरी आम्ही खिलाडू वृत्तीने जिथे वागायला पाहिजे तिथे वागणारच हे त्यांना समजणे जरूर होते. आदमखान व्यवहाराला धरून वागला. मी मुद्दामहून त्यांच्याशी त्यांचे नवे धोरण, कसे निष्फळ मूलत:च आहे हे सांगण्यासाठी बोलणे काढले. ऐकून घेतले. पण गंगेचे पाणी तुमच्या हातात आहे. आम्ही प्रयत्न करून पहावयास पाहिजेत ना? अशी सबबवजा बाजू मांडली.

या जेवणाच्या वेळी कैसर, त्यांचा पी. आर. पुष्कळच बोलत होता. तो आपली व आपल्या घराण्याची हकिगत सांगत होता. तरुणपणी तो आय. पी. एस्. (पोलिस अधिकारी) होता हे त्यांने सांगितले.

मला हे माहित आहे हे सांगताच चपापला, ''माझा बायो-डेटा तुम्ही पाहिला आहे तर'' असे विचारू लागला. मी म्हटले, ''तू इतका प्रसिध्द गृहस्थ आहेस की, तुझी ही सामान्य माहिती माझ्याप्रमाणे अनेकांना आहे.'' पुष्कळच बोलत होता. ''आमच्या मिनिस्टरशी (आदमखान) बोला व तुमचे म्हणणे पटवा'' अशीही गळ घालीत होता. मी म्हटले, ''मी बोलेन पण त्याला किती पटवू शकेन हे सांगता येणार नाही.''

या सर्व बांगलादेशी डेलिगेटस्मध्ये त्यांच्या विदेश-मंत्रालयाचा प्रतिनिधि असलेला एक ऑफिसर मला मुद्दाम बाजूला घेऊन आपले मनोगत मोकळेपणाने बोलला. गेल्या महिन्यात दिल्लीला आलेल्या त्यांच्या डेलिगेशनमध्ये तो होता. आदमखान इंदिराजींना भेटला त्या वेळी तो बरोबर होता. त्या भेटीत इंदिराजींनी जी भावना व्यक्त केली ती माझ्या हृदयाला भिडली. आमच्याकडून त्यांच्या हृदयापर्यंत भिडण्याचा प्रयत्नच झाला नाही. आमच्या मिनिस्टरने मीटिंग फारच 'अॅब्रप्टली' संपविली वगैरे. विचार करणारी माणसे अजूनही त्यांच्यामध्ये आहेत एवढाच तूर्त त्याचा चांगला अर्थ मी काढतो.

८ ला दुपारी दोन टेलिव्हिजन मुलाखती आणि येथील एका भारतीयाने चालविलेल्या पत्राला लांबलचक मुलाखत यांत दोन-अडीच तास गेले. 'हूस्टन' ला जाण्याची वेळ झाली आणि १४-१५ दिवसांनी Cartyle सोडले. हूस्टन व न्यूयॉर्क एक तासाचे अंतर आहे. तीन साडेतीन तासांचा प्रवास करून आम्ही ११-११॥ पर्यंत तेथे पोहोचलो. सामान घेऊन हॉटेलमध्ये (रिजंट) पोहोचायला सव्वा-दीड झाला.