• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १६८

ते मूळचे भारतीय - त्यांच्या कुटुंबातील बरेचजण भारतात आहेत. परंतु त्यांच्या मनात श्रीलंकेत 'सेटल' व्हावयाचे होते. त्याप्रमाणे ते या देशात कँडी येथे राहतात. जेवणासाठी मुद्दाम दोन अडीच तासांचा प्रवास करून आले होते.

मी तारीख १५ रोजी कँडी येथे जाणार आहे. लगेच संध्याकाळी परत येणार आहे. तेथे दोन-तीन तास असेन, गव्हर्नरकडे राहण्यापेक्षा मी श्री. प्रसादकडे थांबण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. मला घरच्यासारखे वाटेल म्हणून. एक जुना बुध्दिमान्, प्रेमळ सहकारी हे त्यांचे आमचे खरे नाते. मंत्रि, अधिकारी हेच केवळ आमचे संबंध नव्हते. फेलिक्सशी जेवणानंतर भारतीय भूमिकेवर तपशीलवार बोलणे झाले. १) लिमाची लिस्ट वाढवावयाची नाही. २) गेस्ट म्हणूनही मर्यादित लिस्ट आम्ही ऐक्याच्या दृष्टीने मान्य करू. ३) ऑब्झर्वर स्टेट्ससाठी त्यांनी आग्रह करावयाचा नाही. ४) नव्या को-ऑर्डिनेशन ब्यूरोची संख्या २७-२९ पर्यंत न्यावयास हरकत नाही. परंतु रचना करताना आजचे सदस्य पुढील 'टर्म’ साठी चालू द्यावेत. अॅडिशनल सदस्यांची वाटणी आजच्याप्रमाणेच भौगोलिक तत्त्वावर व्हावी व एक तृतियांश सदस्य पुढच्या 'समिट' वेळी 'रिटायर' करावे - म्हणजे 'रोटेशन आणि कंटिन्युइटि' कायम राहातात. ही श्रीलंकेची कल्पना त्यांनी मांडली. आम्ही तत्त्वत: मान्यता दिली. दुसरे दिवशी एन्. कृष्णनने ही संमत सूत्रे कागदावर उतरून श्री. फेलिक्सला दिली.

श्रीलंकेशी झालेली त्या रात्रीची व दुसऱ्या दिवशी युगोस्लाव्हिया व अल्जेरिया यांच्याशी झालेली चर्चा ही fatalic Agent ठरली म्हटले तरी हरकत नाही. कोणत्या दिशेने जावयाचे याचे वातावरण बनण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचा पुरावा काल व आजही मिळाला.

नव्या व्हिएतनामचे नवे परराष्ट्रमंत्रि म्हणजे प्रसन्न चेहऱ्याचे प्रौढ व्यक्तिमत्व आहे. बोलणे किती सौम्य पण स्पष्ट! Criteria चे प्रश्नावर मूलभूत भूमिका सरळ स्पष्ट होती. परंतु कोणत्याही देशाला अकारण दुखविण्याची (या प्रश्नावर) तयारी नव्हती. इंडोनेशियाचे बाबतीत विरोधी बोलले. 'टेमोर' बाबत तर अगदी उघड विरोध होता.

व्हिएतनामी भाषा मूलत:च सौम्य भासते पण सूत्रमयही आहे की काय न कळे. भाषांतरे ऐकताना असे मला तरी वाटले. ते पाच दहा शब्द बोलत आणि त्यांचे भाषांतर पाच चार वाक्यांत ऐकावे लागे. तसेच उलट सुलट.

दहा तारखेस सकाळी ५ वाजता उठलो. एकसारखा प्रवास व येथे आल्यानंतर गाठीभेटी. रात्रीची हाय-कमिशनरची मेजवानी. (यात खाण्यापेक्षा बोलणेच फार झाले). परत यावयास १२ वाजले. हा ताण बरा नाही. पण दुसरा मार्ग काय?