• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १६६

८३ कोलंबो
१२ ऑगस्ट, १९७६

ही नॉन-अलॉइन्ड शिखर-परिषद आशियातील पहिली म्हणून आम्हाला याचे फार अप्रूप. ही परिषद ऐतिहासिक व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा. परिषद करणे हा इतिहासच आहे. त्या अर्थाने नव्हे तर यांतील निर्णय आजच्या आंतराराष्ट्रीय संदर्भात नवी दिशा दाखविणारे, मार्गदर्शन करणारे, परिस्थितीचा अचूक वेध घेणारे व्हावेत ही इच्छा आहे.

असे काही घडले की नाही याचा मागोवा घेण्यासाठी मी पाहिलेल्या, भाग घेतलेल्या आणि काही ऐकलेल्या घटनांची तारीखवार नोंद या लेखनात ठेवणार आहे.

१० ऑगस्ट दुपारी १-३० वाजता पोहोचलो. मद्रासमध्ये राजभवनच्या बेडरूममध्ये तीन तास कंटाळवाणे काढले. Felix भंडारनायके स्वागतास हजर होते. बरेच विदेशमंत्रि दोन दिवसांपूर्वीच येथे पोहोचले आहेत असे त्याने सांगितले. औपचारिकतेत वेळ न घालविता आम्ही गावाकडे निघालो.

रस्ते सुधारलेले - ट्रॅफिक व्यवस्था काहीशी सुधारलेली दिसली. एक आर्मी मेजर लिविझाँ ऑफिसर म्हणून आहे. सुस्वभावी व शांत (मंद) वाटला. श्री. गुरुबचन - आमचे हायकमिशनर साथीला होते. वाटेत त्यांनी येथील तयारी व घटनांची पार्श्वभूमी सांगितली. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम सांगितला.

५ ते ६ क्यूबा-विदेशमंत्रि.
६ ते ७ व्हिएतनाम-विदेशमंत्रि.
८॥ हायकमिशनरचे जेवण.

Felix ही पाहुणा म्हणून येणार आहे. तेव्हा जेवणातंर त्याची चर्चा. त्याचेबरोबर परिषेदच्या तयारीसाठी व यशासाठी राबणारे सर्व प्रमुख अधिकारीही येणार आहेत. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर घाईघाईने, 'लंच' घेतले. ३-३० वाजून गेले होते. थोडी विश्रांति घेतली आणि ५ वाजता परिषदेच्या चक्रव्यूहात शिरलो.

क्यूबा-विदेशमंत्री, हॅवाना, सभेपासून ओळखीचे. त्यांना आणि व्हिएतनामचे मंत्र्यांना परिषदेपुढे येणाऱ्या प्रश्नांबाबत आमची मते व 'असेसमेन्ट्स्' हव्या होत्या.