महाराष्ट्रातील दुष्काळ - ७६

'शिनिटनिको'

शिनीटनिको या रशियन भूगोलविद्या शास्त्रज्ञाने इ.स.पू. १२०० पासूनच्या आजपर्यंतच्या कालचक्रांचा अभ्यास करून असे सिद्ध केले आहे की सध्याचे १८०० ते २००० वर्षाचे कालचक्र ५०० वर्षापूर्वी सुरू झाले.  या कालचक्रामध्ये इ.स. १०० शतकाच्या शेवटापर्यंत अथवा इ.स. १९०० च्या सुरुवातीपर्यंत विपुल प्रमाणात वृष्टी होऊन पृथ्वीवर पाण्याची मुबलक उपलब्धता होती.  परंतु त्यानंतर पुढे सतत यात घट होत चालेली असून भूपृष्ठावरील आणि भूगर्भित पाण्यात सध्याच्या कालचक्रात सतत घट होत असल्याचे दिसून येते.  त्यामुळे पाण्याचे नियोजन करीत असताना अशी घट होणारी कालचक्रे दृष्टीसमोर ठेवून नियोजन झाले पाहिजे.  ह्यात धरणांद्वारे नदीच्या पाण्याचे नियमन (रेग्युलेशन), धरणाद्वारे साठवलेल्या व नद्यातून वाहात असलेल्या पाण्याची प्रदूषणापासून जपणूक, अधिक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या भागातून कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रदेशाकडे प्रवाह घेऊन जाणे, पाण्याच्या सर्व प्रकारच्या वापरात काटकसर करणे, सिंचन पाण्याची कार्यक्षमता (इफीसियन्सी) वाढवणे, शहरातून व कारखान्याद्वारे येणारी घाण व क्षार, धरणात आणि नदीत जाण्यापासून थांबविणे नद्यांचे प्रवाह बदलून कृत्रिमरित्या भूगर्भीय पाण्याचे पुनर्प्रस्थापित करून (artificial recharge of ground water) त्यात वाढ करणे, धरणातून होणारे बाष्पीभवन कमी करण्याच्या दृष्टीने संशोधन, अशा प्रकारे दीर्घ पल्ल्याच्या जलविकासाच्या योजनांचा विचार होणे आवश्यक आहे.  (long range water development planning) तसेच केवळ पाण्याचा मुबलक उपलब्धतेवर भर न देता त्यातील गुणात्मक बदलाचा (qualitatively change) देखील त्यात समावेश झाला पाहिजे.

भारतातील परिस्थिती  :-

भारताच्या दृष्टीने विचार करता भारतात जे पाणी उपलब्ध आहे ते जवळपास अमेरिकेसारख्या तिप्पट मोठ्या देशात उपलब्ध असलेल्या पाण्याइतके आहे.  तसेच जगात, भारताचा पाण्याच्या उपलब्धतेनुसार ५ वा क्रमांक लागतो.  जगात ब्राझिलमध्ये सर्वात अधिक नदीतून पाणी उपलब्ध असून हे जगातील एकूण नदीतून उपलब्ध असलेल्या पाण्याच्या (१३.४ टक्के) आहे.  त्यानंतर रशिया (११.२ टक्के), चीन (६.७ टक्के), कॅनडा (५.८ टक्के) आणि भारत (४.९ टक्के) असा क्रम आहे.

भारतात ७० ते ८० टक्के जमीन खडकाळ असून हिच्यात सुरवातीच्या १० ते १५ मीटर मातीच्या थरात (अर्थ सरफेस) ४ टक्के ते ५ टक्के पाणी साठविण्याची क्षमता आहे.  मोठ्या नदीच्या काठीही क्षमता १० टक्के ते १५ टक्के असते.  हे पाणी बर्‍याचअंशी पडणार्‍या पावसावर अवलंबून असते.  दुर्दैवाने या भागात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे.  म्हणून भूगर्भातील पाणी अतिशय अशाश्वत असे आढळून येते.  तेव्हा अशा भागात पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाऊ न देता त्यास थोपवून धरून कालवयाद्वारे याचा वापर करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.  नद्याद्वारे जरी विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध होत असले तरी याचा पूर्णपणे वापर फार कठीण आहे.   काही नद्यांच्या खोर्‍यात वापरण्यात इतके मुबलक पाणी आहे की ते वापरणेच शक्य होत नाही; तर काही नद्यांच्या खोर्‍यात वापरण्यास पाणी शिल्लक नाही.  ब्रह्मपुत्रा खार्‍यात विपुल पाणी आहे तर दक्षिणकडे पेन्नार नदीच्या खोर्‍यात फारच कमी पाणी उपलब्ध आहे.  ब्रह्मपुत्रा खोर्‍यात दरडोई १० मी. पाणी उपलब्ध असून दक्षिणेतील पेन्नार नदीच्या खोर्‍यात हेच प्रमाण ०.२ मीटर दरडोई आहे.

भारतात खोरे निहाय मोठ्या नद्यात खालीलप्रमाणे पाणी उपलब्ध आहे.
तक्ता नं २४ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)