• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ८७ (2)

पाणी पुरवठा केंद्रे व मानवी वस्ती

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याच्या साठ्यापासून किती अंतरावर मानवी वस्ती असावी.  असली तर काय खबरदारी घ्यावी याची लोकशिक्षणाच्या दृष्टीनेही फारशी खंत कुणास वाटू नये यातच आपल्या सर्वजनिक जीवनाची दुर्देवी परिस्थिती लक्षात येईल.  गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या कचर्‍यामुळे व घाणीमुळे पुणे शहराची कशी परवड झालेली आहे याची चर्चा चालू आहे.  अशा चर्चेचे स्वागतच केले पाहिजे.  परंतु प्रदूषित पाणी हे ८० टक्के रोगांचे उगमस्थान असते.  त्या पाण्याच्या शुद्धतेबाबत आपल्याकडे फारशी चर्चा होताना दिसत नाही.  पुण्याला अगदी अलीकडे एक फार महत्त्वपूर्ण चर्चासत्र झाले.  हा त्यास अपवाद समजला पाहिजे.  पशुधनास - गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या इ. जनावरांनासुद्धा माणसाप्रमाणेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज असते.  याची सरकारी कागदोपत्रीही फारशी दखल घेतली जात नाही.  परंतु जे जनावरे पाळतात त्यांनासुद्धा याची फारशी जाणीव नाही, हे आमचे दुर्दैवच आहे.  आमच्या पशुधनाची उत्पादनक्षमता अगदीच कमी आहे.  त्यास इतर अनेक कारणांबरोबर शुद्धा पाण्याचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे.  वरील सर्व प्रश्नांवर अधिक समाजप्रबोधन झाले पाहिजे.

२  :  फळबागांच्या मूलभूत समस्या

अमेरिकेत चिलीमधून आयात केलेल्या द्राक्षांबाबत मोठा स्फोटक वाद निर्माण झाला आहे.  ह्यात द्राक्ष उत्पादकांचा दोष नाही.  चिली हा दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनार्‍याला लागून असलेला अरुंद परंतु दोन-अडीच हजार मैल लांबी असलेला देश आहे.  गुणवत्ता असलेली फळे पिकविण्याबाबत चिलीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.  त्यामुळे इतर देशांतील फळबागांच्या धंद्याला देशांतर्गत अर्थव्यवस्थेत आणि निर्यातीच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्‍त झाले आहे.  प्रचंड प्रमाणात या देशातून द्राक्षे व इतर फळे निर्यात होतात, केवळ खाण्याची द्राक्षे प्रतिवर्षी सहाशे कोटी रुपयांची चिलीमधून निर्यात होतात परंतु गेल्या महिन्यात एक मोठी दुर्दैवी घटना झाल्याचे आढळून आले.  'सायनाइड' नावाचे तात्काह मृत्यू येणारे विष इंजेक्शनच्या सहाय्याने द्राक्षात घातलेले आढळून आले.  अमेरिकेतील फिलोडेल्फिया या प्रांतातील फळांची विक्री करणार्‍या दुकानात अशी विषारी द्राक्षे आढळून आली.  अमेरिकेतील मोठमोठे डिपार्टमेंटल स्टोअर्स आपापल्या शीतगृहात चिलीमधून मोठ्या प्रमाणात आयात केलेली द्राक्षे साठवून ठेवतात.  वरील विषारी द्राक्षे सापडताच अमेरिकेतील लहान-मोठ्या दुकानांतील साठवलेली व खासगी घरातील द्राक्षे फेकून देण्यासंबंधी अमेरिकन सरकारने सूचना दिल्या.  चिलीतील द्राक्षे व फळे यांची आयात बंद करण्यात आल्यामुळेही अमेरिकेतील बाजारात फळे, द्राक्षे इत्यादींचा पुरवठा कमी झाला.  त्यामुळे अमेरिकेतील फळांचे भाव एकदम वाढले.  आणि लहान-मोठे वितरक जगाच्या इतर कोणत्या भागांतून द्राक्ष व इतर फळे उपलब्ध होऊ शकतील म्हणून चौकशी करू लागले आहेत.  अन्न व फळेविक्री कोणत्या विक्रेत्यामध्ये एकप्रकारचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

द्राक्षे व फळबागा

अमेरिकेतील एक मोठे द्राक्ष व फळविक्रेत्या कंपनीच्या प्रतिनिधींनी (फार्मर जॅकसस् सुपर मार्केट) तर म्हटले आहे की, सर्व द्राक्ष विक्रीचा व्यवहार हा विश्वासाने चालत असतो.  घडलेली घटना म्हणजे विश्वासघाताचाच एक प्रकार आहे.  द्राक्षे आणि औषधावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार्‍या अमेरिकेचे सरकारी अधिकारी फ्रॅन्क यंग यांनी चिलीमधून आयात केल्या जाणार्‍या सर्व फळांना बाजारात विक्रीस ठेवण्यास बंदी करणारा हुकूम काढला आहे.  मात्र द्राक्षापासून तयार होणारे रस, जॅम्स आणि इतर खाद्य अगर पेये यांना मात्र हे बंधन लागू करण्यात आलेले नाही.  वॉशिंग्टन येथील चिलीच्या वकिलातीच्या प्रतिनिधीने या घटनेमुळे गंभीर चिंता व्यक्त केली असून, चिलीमधील द्राक्ष उत्पादकांचे किमान सहाशे कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे मत व्यक्त केले आहे.  विषारी द्राक्षे उघडकीला आल्याची घटना घडल्यानंतर चिलीची राजधानी सांटिओगे येथील अमेरिकन वकिलातीला दोन निनावी टेलिफान आले होते आणि चिलीमधून अमेरिकेस निर्यात होणार्‍या फळांत येथून पुढे विष घातले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.  चिलीच्या लष्करी राज्यकर्त्यांनी चिलीमधील बेकायदा म्हणून जाहीर केलेल्या कम्युनिस्ट पक्षाला घडलेल्या घटनेबद्दल दोष दिला आहे.