ठिबक सिंचन संच राबविण्याची शास्त्रशुद्ध पद्धत :
१. शेती व शेतकरी यांची माहिती घेणे.
२. शेताचा सर्व्हे.
३. शेताचा प्राथमिक आराखडा तयार करणे.
४. पर्जन्यमान, तपमान, बाष्पीभवन या आधारे हवामानाचा अभ्यास.
५. शेतकर्यांच्या शेतातील पाणी व माती यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत परीक्षण व त्याआधारे अनुमान.
६. पाणी व खते यांच्या मात्रा व पाळ्या निश्चित करणे.
७. पीक, पिकातील अंतर, पाण्याची गरज, नंतर मशागत इ. बाबींचा सर्वांगीण अभ्यास करणे.
८. पीक, पाणी, जमीन, हवामान व शेताचा आराखडा या सर्वांच्या परस्पर संबंधाचा विचार करून ठिबक सिंचन संच पद्धतीचीड्रीपर्सची निवड करणे.
९. असलेला पंप, मोटार, एकूण पाण्याची गरज, निवडलेला ठिबक सिंचन पंप, सर्व बाबींचा व घटकांचा अभियांत्रिकी आराखडा करणे.
१०. पंप शेतापर्यंत पोहचवून त्याची शेतात योग्य मांडणी करणे.
११. संचाबद्दल शेतकर्याला प्रशिक्षण देणे.
१२. संच चालवीत असताना शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकर्यांच्या अडचणी सोडविणे. त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे.
या सर्व बाबी जैन इरिगेशनमार्फत महाराष्ट्रभर विविध ठिकाणी केल्या जात आहेत. ठिबक सिंचन हा दारिद्रय व दुष्काळ निवारणाचा दूरगामी उपाय आहे, केवळ पाणी बचतीचा मार्ग नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकरी व शेती यांच्या उत्पादनासाठी, भरभराटीसाठी जैन ठिबक सिंचन पद्धती सेवेत हजर आहेत.
महाराष्ट्रभर विविध पिकांवर शेतकर्यांच्या शेतावर ठिबक सिंचन संच व्यवस्थितपणे कार्यरत व्हावे हे ध्येय उराशी ठेऊन जैन इरिगेशन ''ठिबक सिंचन'' क्षेत्रात आपली वाटचाल करीत आहे.