• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ७२

सिंचनाच्या विविध पद्धती  :

अ)  पाट पाणी पद्धत.
ब)  तुषार सिंचन किंवा फवारा सिंचन.
क)  ठिंबक सिंचन पद्धती.

वर नमूद केलेल्या विविध पद्धतीपैकी ठिंबक सिंचन पद्धती ही अत्याधुनिक पाणी देण्याची शास्त्रीय पद्धत आहे.  ज्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स व महाराष्ट्र :

महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या सर्व पिकांना, जमिनीला योग्य अशा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब जैन ठिबक पद्धती मार्फत केला जात आहे.  ''जैन ठिबक सिंचन'' पद्धत म्हणजे केवळ पाणी देण्याची नवीन पद्धत नव्हे, ती आहे पीक समृद्धीची गुरुकिल्ली व पीक वाढीची वैज्ञानिक दृष्टी.

आपल्या राज्यात विविध प्रकारची जमीन आहे, हवामानात विविधता आहे, पाण्यात सुद्धा विविधता आहे.  या सर्व बाबींचा अभ्यास करून जैन इरिगेशन, जळगाव, या उद्योग समूहामार्फत अत्यंत कार्यक्षम अशा ठिबक सिंचन पद्धती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शेतकर्‍यांना पुरविल्या जात आहेत व त्यांची योग्य देखभाल केली जात आहे.  १५, मार्च १९८८ अखेर सुमारे १५०० एकर क्षेत्रावर जैन इरिगेशनमार्फत ठिबक सिंचन संचन कार्यान्वित केले गेले आहेत.

ठिबक सिंचन म्हणजे काय ?

झाडांच्या (रोपांच्या) मुळांशी थेंब-थेंब पाणी ठराविक मात्रेत हळुहळू देणे.  हे दिले जाणारे पाणी पिकाच्या गरजेनुसार, हवामान, जमीन यांचा अभ्यास करून दिला जातो.  यालाच ठिबक पद्धत म्हणतात.

ठिबक सिंचन संचाचे प्रमुख घटक :

अ)  पंप - विहीर.
ब)  मेनसबमेन पी. व्ही. सी. पाईप.
क)  फिल्टर स्टेशन (वाळूचा फिल्टर व जाळीचा फिल्टर)
ड)  खत सयंत्र.
इ)  लॅटरल पाईप.  (काळे लॅटरल पाईप - एल.डी.ई.)
ई)  ड्रीपरएमिटर किंवा अत्याधुनिक बायवॉल सिंचन पद्धती.
फ)  प्रेशन गेज, व्हॉल्व्हस् इ.

ठिबक सिंचनाचे प्रमुख फायदे :

१.  उत्पादनात भरघोस वाढ.
२.  पाण्याची ४० ते ७० टक्के बचत.
३.  शेती मालाची सुधारित प्रत.
४.  पाण्याची बचत होत असल्यामुळे जादा क्षेत्र सिंचनाखाली येते.
५.  पिकांमध्ये तणे कमी येतात.
६.  पिकाला एकाच वेळी समप्रमाणात पाणी.
७.  चढ उताराच्या व डोंगराळ जमिनीवर पाणी देण्याची सुलभ पद्धत.
८.  मजूर व मनुष्यबळ यांची बचत.
९.  पंपाला लागणार्‍या उर्जेत बचत.
१०.  नापिक व क्षारयुक्त जमिनीवर पिकाची लागवड.
११.  पिकांना दिल्या जाणार्‍या खतांचा पुरेपूर व नियोजनबद्ध उपयोग
१२.  पिकांच्या नंतर मशागतीवरील खर्चात कपात.

वरील प्रमाणे ठिबक सिंचनाचे अनेक फायदे आहेत.  ओळीने जवळ लावली जाणारी पिके उदा. ऊस, कापूस, भाजीपाला ही सुद्धा, 'बायवॉल सिंचन पद्धती' मुळे ठिबक सिंचनाखाली आणता येतात.