• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १७३

१) वर्ग दोन पाटबंधारे कामावर आकारण्यात येणारी एकत्रित शेतसारा पद्धत रद्द करण्यात यावी.  एकत्रित शेतसार्‍यामधून पाणीकर वजा करून शेतसारा वसूल करावा व त्याशिवाय वेगळी पिकनिहाय पाणीपट्टी आकारावी.

२)  तथापि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या वर्ग दोन पाटबंधारे कामावर एकत्रित शेतसारा पद्धत, प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने चालू रहाण्यास हरकत नाही.

३)  वर्ग दोन सिंचन प्रकल्पात वसूल करण्यात येणार्‍या पाणीपट्टीतून ५ टक्के रक्कम बाजूला काढून ठेवावी व जी त्या प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार्‍या अधिकरण किंवा संस्थेस वर्ग करावी.

२१.  प्रवाही व उपसा सिंचनाच्या संयुक्त वापरात उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात विहिरी व लहान तळी बांधण्याच्या कामास उत्तेजन मिळावे.

२२.  पाझर तलावापासून काय फायदे मिळतात त्याचा शास्त्रीय अभ्यास हाती घ्यावा.

२३.  जमिनीत पाणी पुरण्याची प्रक्रिया वाढण्यासाठी नदीनाल्या वरील पूल हा नुसता पूल म्हणून न बांधावा.  तसेच नदीनाल्यांच्या रेताड पात्रात भूगर्भातील बंधारे बांधावे.  त्याकरिता काळी माती वापरावी.

२४.  शेतकर्‍यांना त्यांना जी पिके फायदेशीर आहेत ती पिके पेरण्याची काही अटीवर मुभा असावी.  अट अशी की, पेरल्या जाणार्‍या पिकांना जमीन योग्य पाहिजे, अति पाणी लागून जमिनी खराब होता कामा नयेत व पाण्याचा विनाकारण व्यय होता कामा नये.

२५.  सर्व सिंचन परवाने दीर्घ मुदतीचे असावेत व सध्या अनेक वर्षे परवाने देण्याची पद्धत चालू ठेवावी.

२६.  ठराविक क्षेत्रात एकाच प्रकारची पिके पेरण्यास उत्तेजन (localisation) देऊ नये.

२७.  महाराष्ट्र राज्यातील निरनिराळ्या सिंचन पद्धतीत खालीलप्रमाणे ब्लॉक्स असावेत.

अ)  अ प्रकारचा ऊसाचा ब्लॉक (१:४)
ब)  ब प्रकारचा ऊसाचा ब्लॉक (१:३)
क)  फळ बाग ब्लॉक
ड)  बाग ब्लॉक
ई)  अ प्रकारचा दुहंगामी ब्लॉक
फ)  ब प्रकारचा दुहंगामी ब्लॉक
ग)  ऐच्छिक रब्बी ब्लॉक

२८.  पाणी अर्ज वेळेवर निकालात न काढल्यामुळे लाभधारकाची गैर सोय होते.  अशा तक्रारींना वाव देऊ नये त्यासाठी पाणी अर्ज निकालात काढण्यासाठी काल मर्यादा ठरवून द्यावी. 

२९.   कालव्याच्या जास्तीची वहन क्षमतेचा (spare capacity) उपयोग पावसाळ्यात खालीलप्रमाणे करता येईल.

१)  विहिरीवर वाढणार्‍या पिकास पूरक पाणी पुरवठा करावा.
२)  हंगामापूर्वी भिजवण्यासाठी पाणी वापरावे.
३)  भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी चार्‍यातून एस्केपमधून पाणी सोडावे.

३०.  सिंचन वर्षाचा कालावधी १ जुलै ते ३० जून असावा सिंचन हंगाम खालीलप्रमाणे असावेत.

१)  खरीप हंगाम   १ जुलै ते ३० सप्टेंबर
२)  रबी हंगाम     १ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी
३)  उन्हाळी हंगाम  १ मार्च ते ३० जून