• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १५३

३.  बाबूराव दौ. पारखे
माजी महापौर, कोल्हापूर

प्रश्न :  मुलगा असो वा मुलगी असो म्हणजेच एक किंवा दोन मुले झाल्यावर कुटुंब-नियोजन झालेच पाहिजे.  हे भारतातील सर्वच नागरिकांनी पाळले पाहिजे.  शेतीवर अवलंबून असलेली संख्या कमी आणायची असेल तर शेती धंद्यास पूरक असे उद्योग खेडोपाडी चालू केल्याशिवाय व तिकडे लोकांना वळवल्याशिवाय शेतीवरील अवलंबित लोकसंख्या कमी होणार नाही.  तसेच, कुटुंब-नियोजनाकरिता कायदा आहे.  पण तो जेवढ्या तीव्रतेने मनावर घेऊन कुटुंब-नियोजन केले जात नाही.सबब पगारवाढ, महागाईभत्तावाढ ह्यामुळे आर्थिक नियोजनावर वाढणारा ताण आपण कसा कमी करू शकू ?

उत्तर :  कुटुंब-नियोजनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी हा आग्रह बरोबर वाटतो.  आपल्या देशात कुटुंब नियोजनाच्या प्रश्नावर व्यापकर प्रमाणात राजकीय मतैक्य होऊ शकत नाही.  हे दुर्दैवच समजले पाहिजे.  कुटुंब-नियोजनासारख्या कार्यक्रमाला सर्वांनी जातपातधर्म निरपेक्ष राहून पाठिंबा दिला पाहिजे व शासनाने तो सर्वांना लागूही केला पाहिजे.  तरच त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकेल.  श्री बाबूरावजी पारखे ह्यांचा हा मुद्दाही बरोबर आहे.  भारतातील सर्व राजकीय पक्षांनी हा प्रश्न अग्रक्रमाने मान्य करण्याची गरज आहे व ह्या प्रश्नावर राष्ट्रीय मतैक्य घडवून आणण्याच्या प्रक्रियेस मदत करण्याचे कर्तव्य बजावले पाहिजे.

लोकसंख्येच्या वाढीप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर काळात उद्योगधंद्याचा विकास पुरेशा गतीने आपण करू शकलो नाही.  हे आपले अपयश मोकळेपणाने मान्य करण्याची गरज आहे.  गेल्या २३ वर्षात आपल्या देशातील उद्योगधंद्याच्या विकासाची गती बर्‍यापैकी वाढली आहे.  परंतु स्वातंत्र्योत्तर काळांतील गेल्या ३५-३७ वर्षाचा विचार केल्यास असे दिसते की उद्योगधंद्याच्या विकासाची गती अगदीच निराशाजनक राहिली आहे.  म्हणजेच प्रतिवर्षी सरासरी प्रतिवर्षी ४.३ टक्के इतकीच राहिली आहे.  जगातील सर्वात अप्रगत अशा राष्ट्रांच्या विकासा एवढाच आपला वेग होता.  ह्यालाच सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कै. डॉ. राजकृष्ण ह्यांनी 'हिंदू विकास गती' म्हणून संबोधिले आहे.  शेतीवर लोकसंख्येचा बोजा वाढण्यास मदत झाली.  त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रयही अधिक वाढले.  भारतात १३ टक्के ते १४ टक्के उद्योगधंद्यांच्या विकासाची गती असली तरच शेतीवरचा बोझा काही कालावधीनंतर कमी होण्याची शक्यता आहे.  उद्योगधंद्याच्या गतीच्या वाढीबरोबरच लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावेत.  उद्योगधंद्यातील विकासाचा विचार करताना उत्पादनाला प्राधान्य दिले असता, अधिक प्रमाणात उत्पादनक्षमता कशी होऊ शकेल ह्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ शकते.  आणि होणे आवश्यकही आहे.

श्री. पारखे हे महाराष्ट्रातील एका नामवंत आणि ऐतिहासिक पण आधुनिक शहराचे महापौर असून, त्यांना ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची जाण आहे म्हणून त्यांनी हा मूलभूत प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत.  त्याबद्दल त्यांना धन्यवाद.