• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १५२

भारतीय शेती आयोगात हवामानाच्या अंदाजासंबंधी खूप तपशीलवार चर्चा केलेली आहे.  दुष्काळाचे भाकीत करणे सध्यातरी संभवनीय नाही असा शेती आयोगाचा निष्कर्ष आहे.  अर्थात हा निष्कर्ष सुमारे चवदा-पंधरा वर्षापूर्वीचा आहे.  हवामान शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे 'एल-निनो' च्या प्रक्रियेच्या आधारे हवामानांत बदल होत आहेत.  याचा यापूर्वी उल्लेख केलेलाच आहे.  या निष्कर्षामुळे वैचारिक गोंधळात भर पडणार आहे किंवा काय अशी भती वाटते.  आधुनिक विज्ञानाच्या व शास्त्रांच्या प्रगतीमुळे दीर्घमुदतीचे हवामानाचे अंदाज वर्तविणे शक्य झाले तर अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याच्या दृष्टीने मानवसमूहांना सतर्क होता येईल.  इतर दृष्टीनेही अशा अंदाजांचा खूपच उपयोग होऊ शकेल.

श्री. बाबासाहेब कुपेकरांनी जागतिक पातळीवर नवीन चर्चिल्या जाणार्‍या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले, हे उल्लेखनीय आहे.

२.  विनायक रघुनाथ बारी

कंकराडी, ता. डहाणू, जि. ठाणे.

प्रश्न : ठिबक-तुषार-सिंचन पद्धत अंमलात आणण्यासाठी बिनाव्याजी तत्त्वावर कर्ज द्यावे म्हणजे ठिबक योजना शीघ्रतेने चालविण्यास प्रोत्साहन मिळेल.  तसेच फळ झाडे, पालेभाज्या, उत्पादनक्षमतेत वाढ होऊ शकेल - हे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास शासनाने मदत करावी.

उत्तर :  प्रश्नाचा रोख हा ठिबक आणि तुषारसिंचन पद्धतीचा शासनाने प्रोत्साहन द्यावा असा आहे.  

श्री. बारी ह्यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटतो.  ज्या ज्या पाणी व्यवस्थापन सुधारणेमुळे पाण्याची बचत होऊ शकेल, पाण्याचा काटकसरीने वापर ही सवय वाढू शकेल, शेती उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा सर्व आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे.  अशा पाणी-बचतीच्या आधुनिक पद्धती लोकप्रिय होण्यासाठी शासनाने सर्वाधिक प्रयत्‍न करण्याची गरज आहे.  जलसंपत्ती ही नैसर्गिक परंतु दुर्मिळ संपत्ती आहे.  उद्योग-व्यवसाय, नागरी गरजा, शेती, पर्यावरण इत्यादींसाठी पाण्याची आवश्यकता आहे.  पण ही गरज, पाणी-उपलब्धतेच्या मानाने खूपच अधिक आहे.  त्यामुळे पाण्याची मागणी व पाणी-पुरवठा ह्यात मोठे अंतर आहे.  औद्योगिक-विकास, नागरी-गरजा, आणि शेतीसाठी पाणी ह्या तिहींच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ द्यायचा नसतो.  म्हणूनच, जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणायची असेल तर तुषार, ठिबक इत्यादी पद्धतींचा वाढत्या प्रमाणात वापर करायला पाहिजे.  त्यातल्यात्यात ठिबक पद्धतीवर विशेष भर द्यायला पाहिजे कारण ह्या पद्धतीमुळे पीक कार्यक्षमतेमध्ये उपयोग होऊ शकेल.  इस्त्रायलमध्ये पाणी तेवढेच वापरून पण ठिबक पद्धतीने बारामाही बागायती क्षेत्र ५८ टक्के वाढवले आहे, पिकाच्या गरजेप्रमाणेच आणि आवश्यक तेव्हाच पाणी दिल्यास, उत्पादनक्षमतेत वाढही चांगली होऊ शकते.  म्हणूनच ठिबक-पद्धतीचा प्रसार होण्याला विशेष महत्त्व आहे.  परंतु ठिबक-पद्धतीचा प्रसार होण्यात मुख्य अडचण ठिबक पद्धती साहित्य साधनांची किंमत हीच आहे.

भारतातील ८० टक्के शेतकरी हे दोन हेक्टरपेखा कमी जमीन धारण करणारे आहेत.  त्यांना ठिबक-साहित्य किंमत परवडू शकणारी नाही.  आणि इतर अधिक जमीन असणार्‍या शेतकर्‍यांना ठिबक-साहित्यसंचाची किंमत परवडेल अशी असल्याशिवाय ठिबक-पद्धतीचा प्रसार व प्रचार होण्याच्या मार्गात बर्‍याच अडचणी येण्याची शक्यता आहे.  म्हणूनच ठिबक-साहित्य स्वस्त भावात उपलब्ध होईल अशी परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकेल, ह्याकडे शासनाने सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे.

तांत्रिक-ज्ञानाचा प्रसार करण्यावर भर देणे हे अशा प्रचारकार्यातील अंग असायला पाहिजे.  ठिबक-पद्धतीप्रसार म्हणजेच तांत्रिक ज्ञान प्रसार असे कोष्टक झाले पाहजे.  ह्याकामासाठी स्वयंसेवी संघटना आणि शासकीय व बिनशासकीय संस्थांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे.