• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १४८

१८.  ग्रामीण भागातील लहान मोठे उद्योग हे परवडणार्‍या अर्थव्यवहाराच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत.  हे वाक्य अतिशय विचारपूर्वक अंतर्भूत केलेले आहे.  आणि याचा अर्थही समजून घेतला पाहिजे.  ह्याचे कारण असे की बरेचसे आपले धोरण या तत्त्वाला धरून चाललेले नाही.  म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे.  म्हणजे ग्रामीण भागातील सर्व लहान मोठे उद्योगधंदे हे परवडणारे आहेत.  म्हणजे इकॉनॉमिक व्हायाबिलिटी प्रिंसिपल हे अंतरभूत असले पाहिजे.  असे यात म्हटलेले आहे.  अर्थात लहान मोठे उद्योगधंदे हे परवडणार्‍या आर्थिक व्यवहाराच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत, म्हणजेच स्वावलंबी म्हणून जगात येईल.

१९.  उत्पादन खर्च हा कमी आणि परवडणारा असला पाहिजे.  उत्पादन गुणात्मकदृष्ट्या उत्तम असेल आणि आधुनिक तंत्र विज्ञानाच्या पातळीवर, उन्नत करायचे असेल तर प्रोत्साहन द्यावे लागेल.

२०.  शेती उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी त्याची विस्तारित क्षमता फारशी उपयुक्त नाही.  नोकरशाहीचा विस्तार करण्याकरता आणि खर्‍या अर्थाने मोठमोठ्या तज्ज्ञांच्या आधारे शेती विकासाचे काम संबंधित पिकांच्या उत्पादकांच्या संघटना बांधून तिच्या माध्यमातून विकास कार्य न्यावे लागेल !

२१.  महाराष्ट्रात द्राक्ष बागायत संघाने कृषी-तंत्राचा विज्ञानाचा अवलंब करून ज्या पद्धतीने चांगले काम केलेले आहे, तशाच पद्धतीने पीकशेती-उत्पादनवाढीचे कार्यक्रम हे हाती घ्यावे लागतील.

२२.  नोकरशाहीच्या पगाराचा प्रचंड बोजा जनतेवर टाकून, विस्ताराच्या कामाची सध्या उभारणी केली आहे, तिच्यात बदल लागेल.   कारण नोकरशाहीतून कार्यक्षम शेती-विकास काम सुरू होऊ शकत नाही.

२३.  दुष्काळी महाराष्ट्रातील काही भागात पाण्याच्या प्रश्नाने दुष्ट स्वरूप धारण केलेले आहे.  माणसे व पशूधन ह्यासाठी पिण्याचे पाणीही मिळणे दुर्मिळ झाले आहे.  ही परिस्थिती भविष्य काळात आणखी भयानक होणार आहे.  हे लक्षात घेऊन कोकणपट्टीतील समुद्रात अशारितीने वाया जाणारे पाणी, जिथे शक्य असेल तेथून देशावर आणण्यासाठी ताबडतोब योजना हाती घेतल्या पाहिजेत.  अशा योजना पाटबंधारे प्रकल्पांचा महत्त्वाचा कार्यक्रम बनवला पाहिजे.

२४.  दुष्काळी महाराष्ट्रात पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे भीषण स्वरूपाचे सामाजिक व आर्थिक संकट कोसळलेले आहे, त्या शेतकर्‍याला या संकटातून वाचविण्यासाठी सर्व योजनांना अग्रक्रमाने वाव दिला पाहिजे.

२५.  जनावरांना मोकाट फिरवण्याची पद्धत लोकांना शिक्षण देऊन व शासकीय उपाययोजनांच्या आधारे आपण केली पाहिजे.

२६.  जमीन आणि झाडे यांचे संरक्षण ठेवल्याशिवाय भूगर्भातील पाण्याचे संरक्षण होणार नाही.  त्याल पूरक म्हणून भूगर्भातील सर्व योजनांना प्रोत्साहन दिले पाहिजे.  त्यासाठी ओढे नाले इत्यादींचा वापर शेतकर्‍यांना करू दिला पाहिजे.

२७.  भूगर्भातील पाणी वाचवणे आणि भूगर्भातील पाणी मुरवणे याचा समतोल ठेवला नाहीतर अनेक तर्‍हेच्या गुंतागुंती निर्माण होतील.  म्हणून पीक पद्धतीचा आराखडा लोक प्रतिनिधींनी आणि जाणकार मंडळींच्या सहकार्याने तयार केला पाहिजे.

२८.  पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याचे सर्व मार्ग अवलंबिले पाहिजेत.  शास्त्र आणि तंत्रविज्ञान आधारे पाणी वापर हा कार्यक्रम व्यापक प्रमाणात अवलंबिता येईल.  अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.