• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (167)

ऋणानुबंध

यशवंतराव चव्हाण
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर -
वडीलधा-यांचे बोट धरून चालणे आले,
थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी 'एकला चलो रे'च्या चालीवर तर -
कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस,
तर कधी आशा-निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत -
नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना
यांचे संगमस्थान वाटेत लागले तर -
मौलिक असे काही छंद आणि काही श्रद्धा मिळून जातात.
वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना
कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.
म्हणूनच -
अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग,
अशा भावना, असे विचार,
अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा -
ऋणानुबंध
म्हटले तर शब्दातीत,
म्हटले तर शब्दबद्धही.