• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६५

यशवंतरावांच्या भाषणात साहित्यिकांत साहित्यिक कार्यकर्त्यात कार्यकर्ता, पत्रकारात पत्रकार आणि विद्वानात विद्वान होण्याइतकी लवचिकता होती. आपले एखादे मत ते सहजपणे त्यांच्या वागण्याबोलण्यातून समाजास पटवून देत. विरोधकांना सुद्धा मित्रत्वाच्या पातळीवर आणून आपल्या नर्म विनोदाने त्यांचा विरोध कमी करत आणि सभेचे वातावरण त्यांच्या या खास नर्म विनोदी शैलीने बदलून टाकत. यात त्यांचा व्यासंग, सुसंस्कृतपणा वक्तृत्व आणि मनाचा उमदेपणा, बोलण्यातील चातुर्य आणि औदार्य या बाबी महत्त्वाच्या होत्या. त्यांची एखाद्या विषयातील मांडणी, त्याला अनुरूप दाखले. उपस्थित महत्त्वाच्या माणसांचा केलेला उल्लेख आणि प्रयत्नपूर्वक आणलेली काव्यात्मकता हे त्यांच्या वक्तृत्वशैलीचे खास विशेष. यांच्यामुळेच त्यांच्या भाषणाला रंग भरत असे. या त्यांच्या भाषणगुणामुळे पुस्तक-प्रकाशनासाठी, साहित्य-संमेलनासाठी, चर्चासत्रासाठी किंवा एखाद्या लेखकाच्या सत्कारासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची वाटे. यशवंतरावांनाही अशा सर्जनशील लोकांचा सहवास नेहमीच प्रिय असे अशा लोकांच्याबरोबर कोणत्याही विषयावर ते अगदी मुद्देसूद आणि नेमकेपणाने बोलत. राजकारण, समाजकारण, शिक्षण हे त्यांच्या आवडीचे विषय. पण कला, साहित्य, नाट्य, महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभ, विद्यापीठाचे पदवीदान समारंभ, स्नेहसंमेलने यांसारख्या कार्यक्रमातून अशा विषयांवर ते लालित्यपूर्ण बोलत आणि अनेकांची मने आपल्या संभाषणाने आकर्षित करत.

शिक्षणाची गंगा

ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या यशवंतरावांनी ह्यातभर लोकशिक्षणाचे कार्य केले. शिक्षण ही सामाजिक गरज असल्याचे त्यांनी अनेकवेळा प्रतिपादले आहे. सत्तेत असताना व नसतानाही त्यांनी समाजातील शैक्षणिक प्रश्नांवर आपले विचार मांडले. त्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले. त्यांमध्ये मोफत शिक्षण योजना व व्यावसायिक शिक्षणावर भर दिला. इ. पाचवी पासून इंग्रजी हा विषय ऐच्छिक केला मराठवाड्यातील अनेक शिक्षण संस्थांना सढळ हाताने त्यांनी आर्थिक अनुदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्वतंत्र शिफारस व विद्यापीठाची स्थापन केली. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना व सातारा येथे सैनिकी स्कूलची स्थापना, आदिवासी मुलांच्यासाठी आश्रमशाळांची सोय. औरंगाबाद आणि कराड येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मिती, नागपूर येथील केंद्रसरकार पुरस्कृत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रुपांतर, तसेच माध्यमिक शाळांतील फी वाढ रद्द असे कितीतरी महत्त्वपूर्ण शैक्षणिक निर्णय त्यांच्या राजसत्तेच्या काळात त्यांनी घेतले. त्यामुळे शिक्षणाची दार सर्वांना खुली झाली. मनुष्यबळाला शिक्षणाची जोड देऊन त्यांनी समाजात नवसामर्थ्य निर्माण करण्याचा सैदव प्रयत्न केला. एकूणच राज्याच्या व राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक योजना राबविल्या. त्यामुळे आजच्या शैक्षणिक उभारणीमध्ये यशवंतरावांचा महत्त्वाचा वाटा आहे हे आपणास मान्य करावे लागेल. खरे शिक्षण कशाला म्हणावे याची व्याख्या यशवंतराव अशी करतात, "शिक्षित व्यक्तीला स्वत:च्या भोवती घडणा-या गोष्टी आणि जगामध्ये घडणा-या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काहीसंगती लावता येते, त्यांचा योग्य अर्थ समजावून घेता येतो आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय घडतो हे समजावून घेता येते समजावून देता येते, त्याला मी शिक्षण मानत आलो आहे." शिक्षणाचा जीवनाशी, परिसराशी जितका संबंध येतो तितकाच वर्तमान आणि भविष्याशी आहे असे ते सांगतात. खेड्यातील शिक्षण व शहरातील शिक्षण यांच्यातील कृत्रिम अंतर कमी करून त्यांच्यामध्ये तोल निर्माण करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. शिवाय खेड्यातील कोट्यवधी जनतेचे जीवन मंगलमय होण्याच्या दृष्टीने ग्रामीण शिक्षणाकडे पाहावे. ग्रामीण जीवनातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी ज्यावेळी उच्चविद्याविभूषित होतो तेव्हा त्याला शेतीत काम करण्याची लाज वाटते. एवढेच नव्हे तर पोटासाठी तो नोकरी पत्करतो. पर्यायाने शेती व आईवडील दोघांनाही मुकतो. अशी आजच्या नवशिक्षित ग्रामीण तरुणाची शोकांतिका ते खेदाने विशद करतात. तेव्हा अशा पांढरपेशी बनलेल्या तरुणांना शेतीच्या व खेड्याच्या विकासास उपयुक्त ठवणारे शिक्षण द्यावे, एकूणच सुशिक्षित तरुणांचे शहराकडे असलेले आकर्षण कमी करून ग्रामीण मातीत शिकलेले मुले ग्रामीण मातीच्याच विकासासाठी झटली पाहिजेत असा विचार 'ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना' या विषयावर मुंबई आकाशवाणीवरील भाषणात ते मांडतात.