• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - १०४

असाच एकदा मुक्काम असताना सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र (राम चितळकर) भेटण्यास आले. त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते. ते पुस्तक यशवंतरावांना भेट म्हणून द्यायचे आणि थोडीफार चर्चा करायची या उद्देशाने ते आले होते. त्यांनी पुस्तकाची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली मात्र, 'तुमचा हा ग्रंथ मी वाचला आहे' हे यशवंतरावांचे शब्द ऐकताच ते सर्दच झाले. पुस्तकासंबंधी सांगण्याच्या तयारीत ते असताना यशवंतरावांनी अभिप्राय देणे सुरू केले आणि
लता मंगेशकर बाबत ज्या तऱ्हेने तुम्ही काही गोष्टी नमूद केल्या आहेत ते केले नसते तरी चालले असते. त्या लोकप्रिय ज्येष्ठ गायिका आहेत. तुम्ही ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आहात, एकमेकांच्या सहकार्याने संगीत रसिकांना तुम्ही संतुष्ट केले आहे. दिल्लीत पं. नेहरूंच्या उपस्थितीत तुम्हा दोघांच्या सहकार्याने संगीताच्या माध्यमातून एक कार्यक्रम होणार होता. त्यावेळी तुम्हाला क्लेशदायक असे काही घडले. त्यात दोषी कोण या तपशिलात मी जात नाही. ती क्लेशदायक घटना तुम्ही पुस्तकात रेखाटली आहे. अखेर तुमच्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे कार्यक्रम यथासांग पार पडला. ते संगीत ऐकून पंडितजी गहिवरले. मला वाटते तो विषय, तिथेच संपला. ज्येष्ठ कलावंतांनी अशी काही पथ्ये पाळली तर समाजमनावर याचा मोठा अनुकूल परिणाम घडतो. माणूस म्हणून कलाकार अधिक श्रेष्ठत्व पावतो.

सी. रामचंद्र शांतपणे ऐकत होते. त्यांच्या नेत्रात अश्रू जमा झाले. यशवंतरावांनी विषय बदलून, चित्रपटसृष्टी, त्यांचं व्यक्तिगत जीवन, नवीन उपक्रम वगैरे गोष्टी सुरू केल्या. 'तुम्ही म्हणता तसा विचार मी करायला हवा होता' असं अश्रूपूर्ण नेत्रानं सांगून सी. रामचंद्र यांनी निरोप घेतला.

मुंबई मुक्कामातील दोन-तीन महत्त्वाच्या नोंदी यशवंतरावांनी करून ठेवल्या आहेत त्या अशा -
------------------------------------------------------------

मुंबई
६ जानेवारी

रात्री १२ वाजता मुंबईत पोहोचलो. सकाळी उशीरा उठलो. उठून पाहिले तर सगळा आनंद. कैलासगडची स्वारी रिव्हिएरावर. कलायोगी कांबळे यांचे प्रसिद्ध चित्र शिवाजीराजांचे सुंदर पोट्रेट घेऊन आलेत. सोबत माझ्या आईचेही पोट्रेट आणले आहे. आईच्या ५३ / ५४ सालच्या फोटोवरून काढलेले इतके हुबेहूब की आई समोर बसली आहे असे वाटते. माझे डोळे मी माझ्या आईकडून घेतले आहेत हे खरे मला आज पटले.
शिवाजीराजांचे चित्र जिवंत व तेजस्वी आहे. सर्व सकाळ उत्साहात गेली. स्वत: कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह आले होते. मधुकरराव चौधरी आपुलकीने आले होते. शिवाजीराजांचे हे चित्र अधिकृत म्हणून मान्य करावे असा माझा सल्ला मी दिला.

(मंत्रालयातील प्रवेश दालनात छत्रपतींचे जे भव्य तैलचित्र आहे ते
हेच. कलायोगी कांबळे यांचे.)
------------------------------------------------------------