• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - १०३

दिल्ली
३१ जानेवारी

या बैठकीचे पडसाद फार दिवस निघत राहिले. श्री. नाईकांच्या विरुद्ध काही कारस्थान चालू आहे असा त्यांच्या मनात संशय निर्माण करण्यात त्यांच्या आवती भोवतीचे लोक बरेच यशस्वी झालेत. दुर्दैव असे की त्याला मराठा-मराठेतर वादाचे पिशाच्च रूप दिले गेले. फार प्रयत्नपूर्वक ते थांबविण्याचे मी परिश्रम केले. किती यश आले आहे सांगणे अवघड आहे. तिरपुडे यांना पुढले एम.एल.सी. चे तिकीट नाकारण्यात त्याची परिणती झाली आणि एक नको तो वाद रुजला की काय अशी शंका राहून जाते.
------------------------------------------------------------

दिल्ली
१२ जानेवारी

सेंट्रल इलेक्शन कमेटीची दिल्लीत बैठक होती. यू. पी. लिस्ट सुरू झाली आणि मला रोमला जावयाचे आहे म्हणून निरोप घेऊन निघालो. निघताना पंतप्रधानांनी त्यांच्या मुंबईच्या भेटीबाबत काय करावे? मुंबईला जाऊन मत कळवण्यास सांगितले. दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जंग यांना महाराष्ट्र सदनात जाऊन भेटलो. विषय पंतप्रधानांच्या मुंबई भेटीचा होता. या माणसाला त्याच्या कार्यक्रमाचे कोडे पडले आहे. सल्ला देण्यामध्ये उत्सुकता दिसली नाही.

मुंबईत पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्री भेटले. पंतप्रधानांच्या मुंबई भेटीबाबत मताचा अंदाज घेतला आणि मुंबई भेटीस येऊ नये असे पंतप्रधानांना, स्वत:च सांगितले. आता त्यांचा त्या निर्णय घेवोत.

मुंबईत अकारण एक वेडे वातावरण तयार झाले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमेटीचा पोरखेळ होऊन खेळखंडोबा राजकारणाचा झाला आहे. लोकसभा पोटनिवडणूक हातची जाणार अशी परिस्थिती आता दिसते.

दलित पँथर - एक नवा जोशीला राग - मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. तीव्र भावनावेग आहे, तणाव आहे. परंतु मुख्य म्हणजे कार्यक्रम कोणता? हे सर्व कशासाठी? मध्यरात्री नंतर रोमला प्रयाण केले.
------------------------------------------------------------

कार्यक्रमानिमित्त यशवंतरावांचा मुंबईत एक-दोन दिवसांचा मुक्काम असेल तर नरिमन पॉईंट येथील 'रिव्हिएरा' या निवासस्थानी अनेकजण भेटीसाठी, सल्लामसलतीसाठी किंवा निव्वळ क्षेमकुशल जाणून घेण्यासाठी येत असत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अशा भेटी आणि चर्चा होत राहिल्या तरी त्यांनी त्यात आनंद मानला. भेटीसाठी येणारांमधे राजकीय क्षेत्रातले आणि अन्य विविध क्षेत्रातील लोक असत. त्यात कलाकार, शिल्पकार, साहित्यिक, संगीततज्ज्ञ, संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी, मंत्री, आमदार, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, उद्योजक असे असत. यातील प्रत्येकाचे चर्चेचे विषय वेगवेगळे असले तरी योग्य सल्ला मिळाल्याच्या समाधानात ते परत जात असत.