• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान.. ९

यशवंतरावांच्या मातु:श्री तीर्थस्वरूप अक्का हें एक असेंच थोर अलौकिक आणि विलोभनीय व्यक्तिचित्र. यशवंतरावांच्या पोरक्या बालपणांतील त्या अज्ञान स्त्रीची जयशालिनी जिद्द, आणि पुढे यशवंतराव महाराष्ट्राचे मुखय मंत्री झाल्यावर, राज्यपालांना दिलेली अधेली...मनाला वेडें करून टाकतें अक्कांचें हें शब्दचित्र. अक्कांसारखेंच आणखी एक अबोली रंगाचें व्यक्तिचित्र वेणूताई.

परीक्षण-कर्त्याला गवसणार नाही, पण वाचकाला मंत्रमुग्ध करून टाकील असें हें एका सुगृहिणीचें चित्र श्री. रामभाऊ यांनी फारच समर्थपणें उभें केलें आहे.

मा. यशवंतरावांचे एक बंधु गणपतराव. मोठा जिद्दीचा माणूस. यशवंतरावांच्या जडण-घडणींत त्यांचा हिस्सा मोठा. हें व्यक्तिचित्र प्रकाशांत आणून श्री. रामभाऊंनी बरंच कांही साधलंय.

पहिल्यांदा टायपिस्ट म्हणून सेवेला आलेले श्री. डोंगरे पुढें यशवंतरावांचे अत्यंत आवडते स्वीय सचिव होतात. एवढेच नव्हे तर, ‘ते मला सख्या भावाहून अधिक आहेत’ असे भावपूर्ण उद्गार स्वत: यशवंतरावच त्यांच्याविषयी काढतात, ती सारी हकीगतहि वाचनीय आहे.

यशवंतरावांचा दिल्लींतील दैनंदिन कार्यक्रम, त्यांचे दिल्लींतील घर आणि त्यांना येणारी पत्रें... माहिती अगदी खास आहे. त्यांतील काव्योपहार – ही सारी माहिती नवी आहे. आगळी वेगळी आहे.

माझें हे लिहिणें ना प्रस्तावना ना परीक्षण अशा जातींतले आहे. हा केवळ शकुनाचा एक श्रीकार. रामभाऊंसारखाच मीहि यशवंतरावांचा एक चहाता. ते भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत. मी कोणीच नाही. त्यांचे-माझे बाल्य एका परिसरांत गेलें. देवराष्ट्र-सागरेश्वर-कुंडल. सागरेश्वरांतील तीन महादेव चुकून कुंडलला आले आहेत. त्यांची तीन देवळें कुंडलमध्ये आहेत. त्या कुंडलमध्ये मी शिकलों, बागडलो, रामभाऊ जोशीहि साता-याचे. यशवंतरावांच्या स्नेहाचा लाभ हे त्यांचेंहि भाग्य.

एका पत्रकार स्नेह्याने, परिश्रमपूर्वक सिद्ध केलेलें हें एका थोर मित्राचें चरित्र – त्या दोघांविषयी मन: पूर्वक प्रेम बाळगणारा मी एक वाचक. एवढाच माझा अधिकार.

मा. यशवंतरावांच्या कार्याविषयी, जीवनाविषयी, विचारांविषयी आणखी किती तरी ग्रंथ प्रसिद्ध होतील. होणें अपरिहार्यच आहे.

एक खरे की, यापुढे कुणालाहि ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्याविषयी लिहायचें असेल तर, त्याला ‘रामजोशीयाते वाट पुसितु’ प्रस्थान ठेवलें पाहिजे. फार काय, स्वत: यशवंतरावांना आत्मचरित्र लिहावेसें वाटलें तरी, त्यांना हें ‘इतिहासाचे एक पान’ आधी नजरेखाली घालावें लागेल.

ग. दि. माडगूळकर
‘पंचवटी’
मुंबई रस्ता, पुणें ३
दि. २५ मे १९७६.