• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ६०

यशवंतराव हे जिल्ह्याचे व चळवळीचे नेते. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी खूपच धांवपळ सुरू केली. अनेकांना आमिषं दाखवलीं, परंतु ते हाताला लागत नाहीत असं पाहून अखेर त्यांच्या कुटुंबियांकडे पोलिसांनी मोर्चा वळवला. यशवंतरावांचा नुकताच विवाह झाला होता. तेव्हा यशवंतरावांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी यशवंतरावांच्या नूतन पत्नीला – सौ. वेणूबाईंनाच अटक केली. ते घरच्या लोकांना गुप्तपणानं भेटण्यासाठी येत असत आणि जात असत. पोलिसांना मात्र समजत नव्हतं. पण कुटुंबियांचा छळ होत आहे असं दिसतांच ते प्रगट होतील अशी पोलिसअधिका-यांची समजूत झाली असावी.

पोलिसांनी सौ. वेणूबाईंना पकडलं तें त्या वर्षींच्या संक्रांतीच्या मुहूर्तावर. घरांत नवी सून आलेली. तिची पहिली संक्रांत म्हणून सासूबाई – विठाई – यांनी संक्रांतीची सर्व तयारी चालवली होती. पण संक्रांतीच्या आदल्या दिवशीं एक गुप्त-पोलिस घरीं दाखल झाला. त्या वेळीं घरांत सौ. वेणूबाई एकट्याच होत्या. आक्का आणि मोठे दीर हे संक्रांतीची साडी खरेदी करण्यासाठी बाजारांत गेले होते. बाहेर गेलेली मंडळी घरीं परत येण्याची वेळ आणि गुप्त-पोलिस दाखल होण्याची वेळ एकच आली. पोलिस घरीं आला आहे आणि आपल्या सुनेला कांही विचारत आहे असं दिसतांच आक्का संतापल्या आणि त्यांनी त्या पोलिसाची कानउघाडणी सुरू केली. सौ. वेणूबाईंचे मोठे दीर गणपतराव, त्या वेळीं तिथे पोंचले नव्हते. पण त्यांना दुकानांत जेव्हा हें समजलं तेव्हा ते तातडीनं घराकडे धांवले. एकूण परिस्थितीची कल्पना येतांच त्यांनी आक्कांना शांत केलं, पोलिसांनी मग आपलं काम केलं. सौ. वेणूबाईंना पकडून पोलिसांनी त्यांना कराडच्या पोलिस-चौकींत नेलं आणि आवश्यक तें वॉरंट मिळवून त्यांना तुरुंगांत डांबण्यांत आलं. सौ. बेणूबाईंची पहिली संक्रांत तुरंगांत अशा त-हेनं साजरी झाली. यजमान राजकीय चळवळे होते, नेते होते, आसपास काय घडत आहे हें त्या समजत होतं, पण स्वत: त्यांच्यावर हें सर्व भोगण्याचा आणि सहन करण्याचा प्रसंग प्रथमच निर्माण झाला होता. वडील बडोदें संस्थानांतले खाजगीकडील नोकर. त्या वातावरणांतच त्या वाढलेल्या. विवाहापूर्वी यजमानांच्या चळवळ्या वृत्तीबद्दल आणि कार्याबद्दल त्यांनी ऐकलं होतं. पण ऐकणं आणि प्रत्यक्ष प्रसंग येणं यांतला फरक आता त्यांना उमजला.

कराडच्या तुरुंगांत पोलिसांनी त्यांना पांच-सहा दिवस ठेवलं. पण लोकांमध्ये कुजबूज सुरू झाल्यानं नंतर सौ. वेणूबाईंची रवानगी इस्लामपूरच्या तुरुंगांत करण्यांत आली. देशमुख आडनांवाचे एक पोलिस-अधिकारी रोज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सौ. चव्हाण यांच्याशी बोलण्यासाठी येत असत. ते बोलायचे मोठे गोड. हिताच्या गोष्टीहि सांगायचे आणि सर्व बोलणं झाल्यावर त्यांचा एक प्रश्न ठरलेला असे – ‘यशवंतराव कुठे आहेत?’

सौ. वेणूबाईंचं उत्तरहि ठरलेलं असे – ‘मला कांहीच माहिती नाही.’ तें खरंहि होतं. यशवंतराव अचानक केव्हा तरी घरीं येत असत. आई, पत्नी, बंधु यांना भेटत आणि निघून जात. नेमके कुठे जाणार आणि कुठे रहाणार हें त्यांनाच माहिती नसायचं. अशा स्थितींत त्यांच्या पत्नीला तरी त्यांचा नेमका ठावठिकाणा कसा माहिती असणार! पण पोलिसांनी पंधरा दिवस सौ. वेणूबाईंचा पिच्छा पुरवला. मधून मधून दमदाटीहि करून पाहिली. पण लाघवी बोलणं किंवा दमदाटी, यांपैकी कोणतीच मात्रा लागू पडली नाही आणि शेवटी कंटाळून, दीड महिन्यानंतर, सौ. वेणूबाईंची तुरुंगांतू मुक्तता झाली. या भूमिगत चळवळीनं सौ. वेणूबाईंना तुरुंगवास घडवून देशभक्तीची पुण्याई संपादन करून दिली ती अशी!

सौ. वेणूबाईंची तुरुंगातून मुक्तता झाली, पण पोलिसांनी यशवंतरावांचे बंधु गणपतराव यांना स्थानबद्धतेंत अडकवून विजापूरच्या तुरुंगांत पाठवलं. यशवंतरावांचा ठावठिकाणा त्यांच्या कुटुंबियांनीच सांगावा हा पोलिसांचा अट्टाहास होता. त्या दृष्टीनं त्यांचा आटापिटा चालला होता. संकट संपतां संपत नव्हतं!