• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ४९


--------

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सहवासाचा यशवंतराव यांच्या मनावर व स्वभावावर परिणाम मात्र एका विशिष्ट दृष्टीनं निश्चित झाला. समाजवादाचा विचार त्यांच्या मनांत अगोदरपासूनच होता. रॉय यांच्या सहवासामुळे त्याला शास्त्रशुद्ध, अभ्यासू आणि सखोल अशी बैठक प्राप्त झाली. १९३० नंतरच्या पुढच्या दशकांत सर्व जगांतच, विचारी तरुणांना समाजवादाचं आकर्षण वाटत होतं. त्या काळांतील जागतिक परिस्थितीहि त्याला ब-याच अंशीं कारणीभूत होती. जागतिक मंदीमुळे भांडवलशाहीचा पराभव होत राहिला होता. रशियांत मात्र साम्यवादी अर्थव्यवस्था निर्माण झाल्यानं तिथे प्रगति सुरू झाली होती. त्यामुळे हिंदुस्थानांतील, त्या काळांतील तरुणांनाहि मार्क्सवादाचं आकर्षण निर्माण झालं. लेनिनप्रणीत मार्क्सवादानं शास्त्रीय पद्धतीनं ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक पायाचे बुरखे फाडल्यानंतर हें आकर्षण अधिकच वाढीला लागलं.

यशवंतरावांनी बी. ए. पदवी संपादन केली होती. १९३७ सालीं कायदेमंडळाच्या निवडणुकींत आत्माराम पाटील यांना विजयी करून ती निवडणूकहि जिंकली होती. रॉय यांचा पक्ष बुद्धिवादी विचार-मंथन करण्यांत गुंतला होता. पं. नेहरू चीनमध्ये होते. फॅसिझमविरुद्ध उभं रहायचं की कम्युनिझमविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध – वसाहतवादाविरुद्ध सुरू केलेल्या लढ्याचं काय, अशा प्रश्नांच्या चर्चा सुरू होत्या. त्याच वेळीं अखिल भारतीय काँग्रेसची बैठक पुण्यांत झाली. राजाजी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित पंत आदि आघाडीचे नेते बैठकीस उपस्थित होते. तिथेहि चर्चा झाली, परंतु कसलाच निश्चित निर्णय होत नाही अशी यशवंतरावांच्या मनाची अवस्था होती. सातारा आणि कोल्हापूर जिल्हा हें त्यांचं कार्यक्षेत्र, पण तेंहि आता अपुरं वाटूं लागलं. मोठ्या क्षेत्रांत झेप घ्यायची तर त्या काळाला अनुलक्षून बी. ए. नंतरची उच्च शिक्षणाची आणखी एक पायरी अगोदर ओलांडावी असेहि विचार मनांत जमा होत राहिले. अर्थात् हे विचार वकिलीची परीक्षा देण्याचे होते. त्यासाठी त्यांना पुण्याला यावं लागणार होतं. पुणें शहराचं आकर्षण तर होतंच. पुणें हें शिक्षणाचं, विद्वानांचं माहेर. लो. टिळकांनी पुण्याला राजकीयदृष्ट्या सा-या देशांत एक प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त करून दिलेलं होतं. पुण्यांत येण्यामुळे अभ्यासाचं, अनुभवाचं, ज्ञानाचं क्षेत्र रुंदावणार होतं. हे सर्व विचार मनांत होते, पण पुण्यास जावं कसं आणि रहायचं कुठे, हा प्रश्नहि भेडसावत होता. पण योगायोग असा की, आत्माराम पाटील हे त्या वेळीं पुण्याला होते. यशवंतरावांनी आत्माराम पाटलांकडेच जायचं ठरवलं आणि एक दिवस ते पुण्यांत येऊन दाखल झाले. बाडबिस्तारा आत्माराम पाटलांकडेच ठेवला आणि वकील बनण्यासाठी पुण्याच्या लॉ-कॉलेजमध्ये नांव दाखल केलं.

वकील बनण्यासाठी यशवंतराव १९३९ मध्ये पुण्यांत आले खरे, पण संघर्षानं त्यांची पाठ सोडली नव्हती. मॅट्रिक होण्यांत त्यांची १९३० ते १९३३ अशी तीन वर्षे खर्ची पडली होती. राजकीय काम करतां करतांच त्यांना बी. ए. व्हावं लागलं होतं. अन् वकिलीचा अभ्यास करायला निघाले त्या वेळी आपण आता कम्युनिस्ट व्हावं या विचारानं त्यांना घेरलं. युद्ध सुरू होतं, रॉय यांचं बोट सुटलं होतं, वसाहतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी काँग्रेस निश्चित स्वरूपाचं असं कांही करत नव्हती आणि सर्वत्र केवळ चर्चा सुरू राहिल्या होत्या. या परिस्थितीनं यशवंतरावांच्या मनाचा कोंडमारा केला. कांही तरी करण्यासाठी मन धडपडत होतं, पण कुणी कांही करीत नव्हतं आणि करूंहि देत नव्हतं. या कुचंबलेल्या अवस्थेंतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग दिसला तो कम्युनिस्ट बनण्याचा. कारण कम्युनिस्ट कांही वेगळं बोलत होते. अर्थात् त्यांचा खरा राग होता हिटलरवर, त्याच्या हुकूमशाहीवर. देशांतले कम्युनिस्ट त्या रोखानं भडक बोलत होते. करत मात्र नव्हतं कुणीचं कांही! यशवंतरावांच्या मनाची अस्वस्थता त्यामुळे अधिकच वाढली. कम्युनिष्टांच्या भडक घोषणांचं आकर्षण त्यांच्या तरुण मनांत निर्माण झालं असावं. त्यामुळे अभ्यासावरील लक्ष उडालं. त्यांतून मग त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणा-या परीक्षेला बसायचं नाही असा निर्णय केला. त्यांचे मित्र आत्माराम पाटील, ह. रा. महाजनी वगैरेंनी काँग्रेस सोडलीच होती. त्यासंबंधांतहि विचार करणं सुरूच होतं आणि त्यांतूनच एक दिवस युद्धविरोधी कार्यक्रमाच्या आखाड्यांत उतरलेल्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर कां जाऊं नये, असा त्यांनी विचार केला.