• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. २२७

मुख्य मंत्री झाल्यापासून ‘महाराष्ट्र राज्याचा पहिल्या नंबरचा चाकर’ या दृष्टीनं ते मुख्यमंत्रिपदाचा विचार करत असावेत असं आढळतं. काँग्रेस-पक्षाचे ते नेते होते, परंतु समाजाची पक्षीय दृष्टीनं विभागणी करूं नये हा विचार राजकीय कार्यकर्त्यांनी प्रामुख्यानं अंगी बाणवाव यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचं काम करायचं तर वादंगापेक्षा ऐक्याचाच पुरस्कार झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पक्ष असायला त्यांची हरकत नव्हती. मतभेदास थारा मिळूं नये असाहि त्यांचा आग्रह नव्हता; परंतु पक्षांना तात्विक बैठक असावी, कल्याण ही अंतिम कसोटी मानण्यांत यावी आणि कसोटी मानून निश्र्चय पक्का झाला की तो लोकांपुढे निर्भयपणे मांडावा, अशी त्यांची शिकवण होती.

यशवंतराव गोड बोलत, पण सत्य बोलत. सत्य कठोर वाटलं तरी हरकत नाही. जनतेला माणूस पटला, त्याचा विचार पटला, कर्तृत्व उमगलं की जनता आपला राग विसरून जाते असे स्वानुभवाचे त्यांचे बोल होते. कार्यकर्त्यांना हे बोल ते ऐकवत असत. सत्य बोलून समाजाचं भंगलेलं मन सांधण्याची, एकता साध्य करण्याची त्यांची तळमळ होती. मनुष्यबळ ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी साधनसंपत्ति. या साधनाचा सांधा नियोजनाशी जुळवला जावा आणि त्याद्वारे महाराष्ट्राचं विकासाचं नवं चित्र निर्माण व्हावं यासाठी त्यांचा हा सारा खटाटोप सुरू होता.

यशवंतरावांना बहुजन-समाजाचे नेते संबोधून महाराष्ट्रांतले कांही उच्चभ्रू खांदे उडवत असत. बहुजन-समाज म्हणून एक विशिष्ट समाजाचा वर्ग या मंडळींच्या मनांत घर करून राहिलेला असे. यशवंतरावांनी एका प्रसंगी याचीहि दखल घेतली आणि बहुजन-समाज म्हणजे नेमका कोणता समाज, हे बहुजन-समाजाला आणि या तथाकथित उच्चभ्रूंनाहि ऐकवलं. ‘ज्यांची सुखदुःख समान आहेत तो बहुजन-समाज’ अशी यशवंतरावांनी बहुजन-समाजाची सुटसुटीत व्याख्या केली.

बहुजन-समाज या शब्दाबद्दल यशवंतरावांना मनापासून कधीच प्रेम वाटलं नाही. पण महाराष्ट्राच्या भूगोलाप्रमाणे महाराष्ट्राच्या समाज-जीवनांतहि उंचसखलपणा निर्माण होऊ नये याची त्यांना काळजी होती. महाराष्ट्राच्या समाज-जीवनांतले सर्व थर शहाणे व्हावेत आणि ‘अज्ञान’ हा शब्द महाराष्ट्राच्या कोशांतून नाहीसा करणं हेच त्यांनी आपलं सर्वांत मोठं काम मानलं; समाजाला त्यासाठी त्यांनी आवाहन केलं. खेड्यांतल्या माणसांनी कोणाच्या मार्गदर्शनाची वाट पाहूं नये, किंबहुना अशा मार्गदर्शनाची आवश्यकताच रहाता उपयोगी नाही असं वातावरण निर्माण करावं, असं त्यांचं आवाहन असे.

व्यक्ति-पूजा व एकाच माणसाचं नेतृत्व या गोष्टी महाराष्ट्रांत असाव्यात, या कल्पनेच्या ते विरुध्द होते. निश्र्चित अशा कार्यक्रमावर आधारलेलं सामुदायिक नेतृत्व त्यांना मान्य होतं. त्या दृष्टीनं शेती, सहकार, उद्योग, शिक्षण आदि विविध क्षेत्रांत सामुदायिक नेतृत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. राजकीय क्षेत्रांतहि नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या जिल्ह्यांतल्या जिद्दीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणांत संधि मिळवून दिल्यानं, महाराष्ट्रांत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एक नवी पिढी त्यांतून जन्माला आली.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी आणि त्याहीपूर्वी, महाराष्ट्रांत शेतकरी-कामकरी पक्षाची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमधले अनेक तरुण कार्यकर्ते काँग्रेसविरोधी गोटांत गेले होते. हा सगळा विरोधी ओघ काँग्रेसकडे पुन्हा आकर्षित करण्याचं श्रेय यशवंतरावांच्या नेतृत्वालाच द्यावं लागेल. यशवंतरावांचं नवं नेतृत्व पुरोगामी दृष्टिकोनांतून, संपूर्ण महाराष्ट्राचं जीवन बदलून टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय करत आहे आणि प्रत्यक्षांत धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे असं दिसतांच, नागरी आणि विशेषतः ग्रामीण भागांतल्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस-प्रवेशाची जणू चढाओढ सुरू झाली.