• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. १५८

यशवंतरावांना आता एक आव्हान मिळालं होतं. क्षेत्रफळाच्या बाबातींत मुंबई राज्य हें भारतीय संघराज्यांतील पहिलं आणि लोकसंख्येच्या बाबातींत दुसरं बनलं होतं. पूर्वीच्या मुंबई राज्यांत आता क्षेत्रफाळाच्या बाबातींत ७० टक्क्यांनी आणि लोकसंख्येच्या बाबातींत ३४ टक्क्यांनी वाढ झाली होती. नव्या राज्यांत बृहन्मुंबईसह एकूण ४३ जिल्हे (पूर्वी २८ होते), लोकसंख्या ४ कोटि ८३ लक्ष आणि क्षेत्रफळ १ कोटि ९० लक्ष ६९० चौरस मैल असा त्याचा ऐसपैस  आकार बनला. या प्रचंड राज्याचा राज्यकारभार परिणामकारक आणि सुलभरित्या कसा होऊं शकेल याकडे मुख्य मंत्र्यांना प्रारंभापासूनच लक्ष द्यावं लागणार होतं.

यशवंतराव त्यासाठी स्वत:च चक्रव्यूहांत शिरले होते. कांही पुढा-यांची जन्मजात अशी एक खोड असते की, परिस्थितीचा चक्रव्यूह निर्माण करण्यांतच ते आपली बुद्धि, शक्ति खर्च करीत रहातात. स्वत:च त्या चक्रव्यूहांत शिरतात आणि इतरांनाहि अडकवतात. त्यांतून सोडवणूक करून घेणं मात्र  अडकलेल्या प्रत्येकावर सोपवलं जातं. चक्रव्यूहांत गुरफटलेले
बिचारे बाहेर पडण्यासाठी, वाट मोकळी करण्यासाठी धडपडतात, कांही प्रमाणांत यशस्वीहि होतात आणि थोडी फार वाट मोकळी झाल्याचं दिसतांच, प्रथम बाहेर पडण्याचा मान घेतात ते मात्र चक्रव्यूहांत अडकवणारे पुढारी ! मुत्सद्दी म्हणून स्वत:चा बोलबाला करून घेण्यासाठी मग सर्वप्रथम तेच धांवतात.  चक्रव्यूह मागे कायमच राहिलेला असतो आणि बाहेर पडण्यासाठी खस्ता खाणारे  आशाळभूतपणें या मोकाट सुटलेल्या पुढा-याकडे नुसतं पहात रहातात.

यशवंतरावांचा  पिंड अगदी वेगळा. राष्ट्रीय परिस्थितींत कुठे चक्रव्यूह निर्माण होत आहे किंवा  झालेला आहे असं जाणवतांच स्वत:च त्यामध्ये उडी घेण्याचे प्रसंग त्यांच्या राजकीय जीवनांत अनेकदा आले; परंतु ज्या ज्या वेळीं त्यांनी अशी हिंमत केली त्या प्रत्येक वेळीं चक्रव्यूहाचा संपूर्ण भेद वरून, स्वत:साठी आणि इतरांसाठीहि वातावरण मोकळं करण्यांत त्यांनी यश मिळवलेलं आढळतं. परिस्थितीच्या चक्रव्यूहांत शिरायचं तें भेद करण्यासाठी असा त्यांचा मन:पिंडच बनला असावा. नव्या चक्रव्यूहाचा भेद त्यांनी असाच सुरू केला.

नव्या राज्याच्या गरजा भागवण्यासाठी प्रगतिशील कारभारयंत्रणा स्थापन करणं ही त्या वेळीं मूलभूत गरज होती. मंत्री या नात्यानं यशवंतरावांनी कारभाराचा कांहि अनुभव मिळवला  होता, त्यांतील उणिवांची जाणीवहि त्यांना  झाली होती. आता तर राज्याचा आकार वाढला होता आणि कामाचा बोजा वाढणार होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधली जनता, संयुक्त महाराष्ट्र समिति आणि महागुजरात जनतापरिषद भक्कपणें उभी होती. द्वैभाषिकाच्या विरुद्ध त्यांनी युद्धच पुकारलं होतं. बुद्धिजीवीवर्ग असंतुष्ट बनला होता आणि सर्वसामान्य जनता सरकाराविरुद्ध युद्धाच्या पवित्र्यांत उभी होती.

यशवंतराव शांत होते पण मनानं तितकेच भक्कम होते. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी प्राप्त परिस्थितींत अवघड असल्याचं त्यांनी जाणलं. महाराष्ट्र उत्तम राज्यकारभार करूं शकतो हें सिद्ध करण्याची मनांत जिद्द होती. द्वैभाषिक चांगलं चालवण्यासाठी सर्वांचं सर्व प्रकारचं साहाय्य घेण्याची योजना त्यांनी मग सर्वप्रथम मनाशीं आखली आणि त्यानुसार निर्णय करण्यास लागोलग प्रारंभहि केला.

नेतेपदीं निवड झाली त्याच्या दुस-याच दिवशीं यशवंतराव पुण्याला गेले. पुण्याच्या काँग्रेस-भवनांत त्यांचा सत्कार व्हायचा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनांत ज्या शहरानं त्यांना जोडे, चपला, दगड दिले तिथेच आता ते मुख्य मंत्री म्हणून पुष्पहार स्वीकारणार होते. महराष्ट्राच्या राजकारणांतले त्या काळचे भीष्माचार्य काकासाहेब गाडगीळ हे पुण्यांतच होते. पुण्यांत पोंचतांच यशवंतराव प्रथम काकासाहेबांच्या घरीं गेले. ‘मी तुमचा यशवंत आलों आहे’ एवढंच नम्रपणानं ते बोलले. आशीर्वाद हवा हें त्यांत अभिप्रेत होतंच. या भेटींतच यशवंतरावांनी थोर नेत्यांच्या सहकार्याची पहिली फेरी जिंकली. स्वत: काकासाहेबांनीच आपल्या आत्मचरित्रांत – ‘पथिक’ मध्ये या भेटीचा उल्लेख केला आहे. काकासाहेब गाडगिळांनी लिहिलं आहे की, “महाराष्ट्राला राज्य चालवतां येत नाही, असा समज मुन्शी-मोरारजी भक्तांनी पसरवला होता. महाराष्ट्रीय लुच्चे आहेत, शासक  नाहीत, असा प्रचार केला जात होता. द्वैभाषिक चांगल चाललं पाहिजे म्हणून सर्व प्रकारचं साहाय्य, मार्गदर्शन, चव्हाण यांना देण्याचं मीं ठरवलं होतं.”