• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. १४९

१६
-------------

राज्य-पुनर्रचना मंडळाच्या प्रचंड आंदोलनांत महाराष्ट्रातं ‘यशवंत’ पर्व हें ख-या अर्थानं १९५६ ला सुरू झालं. महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर ते याच सालांत तरूण मुख्य मंत्री म्हणून प्रथम आले. पार्लमेंटरी सेक्रेटरी या नात्यानं १९४६ सालापासून खेर-मोरारजींच्या अमदानींत ते मुंबईच्या सचिवालयांत फायली पाहूं लागेल होते हें खरं; परंतु त्यांच्या अंगच्या गुणांची आणि कर्तृत्वाची जाणीव, १९५२ मध्ये मोरारजींच्या मंत्रिमंडळांत मंत्रिपदावर ते आरूढ झाले तेव्हापासून होऊन लागली होती. मुख्य मंत्री मोरारजी देसाई यांनी यशवंतरावांकडे पुरवठाखातं सोपवलं आणि स्वतंत्र भारतांत मंत्रिपदावर ते प्रथमच आरूढ झाले होते.

मंत्र्याच्या हिमतीची, कार्यक्षमतेची, अचूक निर्णयाची कसोटी पुरवठा खात्याच्या कारभारानं लागावी अशीच त्या काळांतली परिस्थिति होती. अन्नधान्याची परिस्थिति अत्यंत बिकट, पुरवठाखात्याबद्दल जनतेंत तिरस्काराची भावना रेशनिंग आणि अन्नधान्याच्या वाहतुकीवरील नियंत्रणं यांमुळे सरकाराविषयी लोकांच्या मनांत अप्रियता वाढलेली-अशी एकूण परिस्थिति होती. त्यामुळे नित्याच्या जीवनविषयक गरजांशीं संबंध असलेलं परवठाखातं, कर्तबगार आणि व्यवहारी मंत्र्याकडेच सुपूर्त केलं पाहिजे असा कदाचित् मोरारजींचा हिशेब असावा.

पार्लमेंटरी सेक्रेटरी या नात्यानं यशवंतरावांच्या कार्यक्षमतेचा अनुभव त्यांच्या संग्रहीं होताच, परंतु हें खातं सांभाळतांना पुरवठाखात्याबद्दल जनतेंतील तिरस्काराची भावना कमी करायची तर महाराष्ट्रांतल्या सामान्य माणसांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणं आणि अन्नधान्याच्या धोरणाबद्दल जनतेंत विश्वास निर्माण करणं याच दृष्टीनं यशवंतरावांना धोरण निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करावं लागणार होतं. दिल्लीच्या धोरणाशीं सांधा जुळवला तरच हें घडण्याची शक्यता होती.

पुरवठाखात्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली किंवा त्यांच्यावर सोपवण्यांत आली, त्या वेळीं यशवंतराव हे अन्नधान्याच्या शास्त्रांत किंवा अर्थशास्त्रांत तज्ज्ञ मानले जात नव्हते. कारभारांतील कुशलताहि त्यांना अजून स्वतंत्रपणानं सिद्ध करायची होती आणि तरीहि, या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

खात्याचीं सूत्रं स्वीकारतांच पुरवठाखात्यांतील गुंतागुंतीच्या व्यवहाराची कल्पना यशवंतरावांना येणं स्वाभाविकच होतं. त्या शास्त्रांतले ते पुस्तकी विद्वान् नव्हते, पण त्यांचं व्यवहारज्ञान पक्कं होतं. सामान्यांचं मन आणि व्यवहार जाणण्याची शक्ति त्यांच्या संग्रहीं अनुभवानं सिद्ध झालेली होती. लोकांच्या अपेक्षा ते ऐकत होते, समजून घे होते. संघटनेंतच ते वाढलेले असल्यानं मनुष्यस्वभावाचं ज्ञान त्यांनी मिळवलं होतं. पुरवठा-खात्याची जबाबदारी पार पाडायची तर व्यवहार-बुद्धि हीच आपली तारक-शक्ति आहे हें त्यांनी नि:संशय जाणलं आणि मोठ्या सावधगिरीनं नव्या धोरणाच्या दिशेनं पावलं टाकण्यास प्रारंभ केला.

दिल्लींत केंद्र-सरकारांत त्या वेळीं रफी अहंमद किडवाई यांच्याकडे अन्नधान्यखातं होतं. हुषार तितकेच व्यवहारी म्हणून त्या वेळीं किडवाई यांची ख्याति होती. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल पं. नेहरूंच्या मनांत आदर होता. किडवाई यांनी नव्या घोरणाची आखणी करावी आणि पंडितजींनी त्यास होकार द्यावा, इतका परस्परांत विश्वास होता. किडवाई यांच्याकडे पूर्वी दळणवळणखातं असतांना त्यांनी आपली कार्यक्षमता तिथे चांगलीच सिद्ध केली होती. स्वत:कडे असलेल्या खात्याच्या विविध विभागांना अचानक भेटी देऊन वस्तुस्थितीची माहिती स्वत:च करून घ्यायची असा त्यांचा परिपाठ असे.

केंद्रीय अन्नधान्यखातं स्वीकारतांच त्यांनी अशीच वस्तुस्थिति जाणून घेतली. व्यापारीवर्गाची, त्यांच्या व्यवहाराची माहिती त्यांनी संपादन केली आणि व्यापा-यांचं मनोगतहि समजून घेऊन धोरणाची व्यवहारी दिशा आखली. केंद्रस्थानीं आणि महाराष्ट्रांतहि त्याच खात्याला व्यवहारी दृष्टिकोन असलेले मंत्री लाभावेत हा एक योगायोग म्हणावा लागेल. परिस्थितीचं अचूक ज्ञान करून घेण्यांत आणि माणसांच्या स्वभावाची पारख करण्यांत किडवाई आणि यशवंतराव यांच्यांत विलक्षण साम्य असलेलं आढळतं. या दोघांच्या पहिल्या भेटींतच परस्परांत स्नेहाची भावना निर्माण होण्यापर्यंत यशवंतरावांनी मजल गाठली.