• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. १२५

“ इथे राज्य कोणत्या पक्षाचं असावं हा दावा अवश्य करा. मात्र राज्य मोडून काढण्याचा विचार देशहिताचा तर नाहिच, पण शहाणपणाचाहि नाही. राग, त्वेष, व्देष यानं जीवन बदलत नाही. राजवट बदलण्याचा कुणालाहि अधिकार आहे. या घरांत जरूर येऊन रहा, पण कृपा करून घर जाळण्याचा, मोडण्याचा प्रयत्न करूं नका. भाषिक चळवळ आता संपली आहे. ती पुन्हा चालू करून इतिहासावर संकट आणूं नका. नवा विकासघडत आहे, आपण इतिहास घडवत आहोंत, तो कुणी मागे घेऊं शकणार नाही. न्यूनगंडाची भावना काढून टाकली पाहिजे. महाराष्ट्र किंवा गुजरात, कुणी कुणावर अन्याय करूं शकणार नाही हें नीति-तत्व आचरणांत आणायचं आहे !”

व्दैभाषिकाचा निर्णय हा राष्ट्रीय निर्णय आहे हें समजून सांगण्यासाठी यशवंतरावांचीं महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, सौराष्ट्र अशा सर्वच प्रदेशांत सतत भाषणं होत राहिली, तरी पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं महाराष्ट्रांत निर्माण झालेलं वातावरण निवळलं नाही. गुजरातमध्ये महागुजरात समितीनंहि आपला पवित्रा सोडला नाही. व्दैभाषिक यशस्वी करण्याची यशवंतरावांची जिद्द होती, पण त्यांच्या काँग्रेस-निष्टेचं आकलन फार थोड्या लोकांना झालं. यशवंतराव मुख्य मंत्री झाल्यानं  कांग्रेसजन मात्र उत्तेजित बनले होते. चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे कट्टे पुरस्कर्ते असले तरी राष्ट्रांनं, लोकसभेनं दिलेला निर्णय शिरोधार्य मानून, काँग्रेसच्या शिस्तीच्या चौकटींत राहून, त्यांना काम करावं लागत होतं. चातुर्यानंच त्यांना उद्दिष्टपूर्ती करून घ्यावी लागणार होती. दिल्लीशीं उभा दावा साधल्यांनं, अगोदरच उद्दिष्ट दूर गेलं होतं.संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या दिल्लींतल्या पहिल्या दिवसापासून घडलेल्या सर्व घटना  त्यांच्यासमोर होत्या. त्यांतून त्यांनी बोध घेतला नसता तरच नवल ! व्दैभाषिकाच्या भलेपणाची निवेदनशैली म्हणूनच त्यांनी वेगळ्या घाटणीची ठेवण असली पाहिजे. याहीपेक्षा त्यांच्या राज्यकारभाराच्या चातुर्यानं अनेकांना त्या वेळीं आश्चर्यचकित केलं.

इतिहासामध्ये कधीहि एकत्र आले नाहीत एवढे सगळे मराठीभाषक व गुजराती भाषक या नव्या राज्यांत एकत्र आलेले होते. या देशांतले सगळे लोक हे भाऊ-भाऊ आहेत ही मूलभूत भावना भारताला स्वातंत्र मिळवण्यामागे होती. त्यासाठी यशवंतराव सांगत राहिले की, राज्य कोणत्या तत्वांनं चालावं, म्हणजे कोणत्या पक्षाच्या तत्वानं चालावं यासंबंधानं मतभेद होऊं शकतील, परंतु स्वातंत्राचा जो इमला आहे त्या सर्व इमल्याच्या पायांतला पहिला दगड मानाचा, महत्वाचा दगड जर कोणता असेल, तर तो हा आहे की, देशांतला प्रत्येक माणूस हा दुस-या माणसाचा भाऊ आहे. त्यानं भावासारखंच वर्तन कलं पाहिजे. देशांतल्या राजकारणांतून बंधु-भावना ज्या क्षणाला नाहीशी होईल त्या क्षणाला देशाचं स्वातंत्र, राष्ट्रपण, मोठेपण, या देशांतला गौरव, तेज सर्व कांही लुप्त होऊन जाईल.

कानडी आणि तामीळ भाषकांचीं स्वतंत्र राज्य अस्तित्वांत आलेली होतीं आणि महाराष्ट्राच्या वांट्याला व्दैभाषिक आल्यानं महाराष्ट्रांतल्या आणि गुजरातमधल्या जनतेकडून त्या संदर्भांत टीका होणं स्वाभाविकच होतं. आपल्यावरच तेवढा अन्याय झाला आहे, अशी त्यांची वाजवी भावना होती. यशवंतरावांना, टीकीकरांनी या मुद्यावर छेडण्यास सुरुवात करतांच त्यांनी सांगितलं की, मराठी-गुजरातीच्या वाट्याला हें भाग्य येण्यांत त्यांचा गौरवच आहे. एकमेकांशी भांडून ते बाजूला होत होते म्हणून त्याचं एकत्र येणं जरूर होतं. या दोन्ही भाषिक लोकांनी हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये अनेक दृष्टींनी नवीन कामे केली आहेत. देशाला राष्ट्राभिमान शिकवण्यासाठी टिळकांनीआणि गांधीनी महाराष्ट्रांत मि जुतराज मुलखांतच जन्म कां घेतला ?  खरं म्हणजे हें आपलं भाग्य आहे. राष्टपिता गांधीजी गुजरातेंत जन्मास आले आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असा मंत्र देणारे टिळक महाराष्ट्रांत जन्माला आले हें आपलं भाग्य नाही काय ? ज्यांच्या वांट्याला एवढे मोठे राष्ट्रपुरूष निर्माण करण्याचं भाग्य येतं त्यांच्यावर राष्ट्राला मार्गदर्शन करण्याची पुन्हा जबाबदारी येते. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम त्यांनी पत्करलं तर बिघडलं कुठे ?

टीकाकार या किंवा त्या बाजूनं कसं बोलूं शकतात याबाबत यशवंतरावांनी विदर्भांतील दौ-यांत असाच एक समर्पक दृष्टान्त दिला. हा दृष्टान्त असा – रावणानं सीतेचं हरण करून तिला लंकेला नेलं ही कथा पुराणिकबुवा सांगत होते. त्यांनी सांगितलं की, लंकेला नेल्यावर रावणानं सीतेला आपल्या आमराईमध्ये एका अशोकाच्या झाडाखाली ठेवलं. तेवढ्यांत एका श्रोत्यानं शंका विचारली. शंका अशी की, रावणानं सीतेला लंकेला नेल्यानंतर अशोकाच्या झाडाखालीच तिला कां ठेवलं? त्यावर शास्त्रीबुवा म्हणाले, याचं कारण असं की, तुम्ही शंका विचारणार हें रावणाला माहिती होतं. त्यानं सीतेला अशोकाच्या ऐवजीं आंब्याच्या, लिंबाच्या किंवा अन्य कोणत्या झाडाखाली ठेवलं असतं तरीहि तुम्हीं विचारलंच असतं की, कां हो, तिला त्या झाडाखालीच कां ठेवलं?- मराठी-गुजराती एकत्र कां आलं याचं यशवंतरावांचं उत्तर हें असं होतं.