• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ११८

या निवडणुकींत गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, मुंबई इथल्या आमदारांनी चव्हाण यांना आपला संपूर्ण पाठिंबा दिला. मराठवाडा, विदर्भ इथे मात्र फाटाफूट झाली. मराठवाड्यांतील ३३ आमदार या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांतलीं फक्त पांच मतं चव्हाण यांना मिळालीं. विदर्भानं मात्र ही तूट भरून काढली. विदर्भांतून चव्हाण यांना ४० आणि हिरे यांना २० मतं मिळालीं. पश्चिम महाराष्ट्रांतूनहि हिरे यांनी पाठिंबा मिळवला होता; परंतु मुंबईपासून सौराष्ट्रापर्यंतचीं मतं चव्हाण यांनी मिळवली. आणि हिरे यांना हें अंतर भरून काढणं अशक्य ठरलं. अखेर द्वैभाषिक अस्तित्वांत आलं, मोरारजींचं नेतृत्व संपलं आणि यशवंतराव चव्हाम हे १ नोव्हेंबर १९५६ रोजीं द्वैभाषिकाचे मुख्य मंत्री झाले.

१९३० सालामध्ये, कराडांत विद्यार्थी असलेला एका गरीब सामान्य कुटुंबांतला मुलगा, आता महाराष्ट्र राज्याच्या गादीवर आरूढ झाला. यशवंतराव मुख्य मंत्री झाले तेव्हा त्यांचं वय ४२ वर्षांचं होतं. एवढ्या तरूण वयांत त्या काळांत मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेले तेच पहिले मुख्य मंत्री होते. त्यांची हिंमत आणि महत्त्वाकांक्षा मोठी होती, तेवढाच त्यांना नियतीचा पाठिंबा मिळाला. नेतेपदाच्या मार्गावर किती तरी खड्डे तयार झालेले होते. कांही उघड, कांही गुप्त. चालतांना पाय बाजूला पडेल असं गृहीत धरूनच नेतृत्वाच्या मार्गावर खड्डे तयार करण्याची व्यवस्था कांहींनी अगोदरच करून ठेवलेली होती. परंतु त्याचबरोबर नेते-पदाच्या मार्गानं यशवंतरावांची चाल सुरू झालेली पहातांच अनेकांचे हात ते खड्डे भरून काढण्यासाठी पुढे झाले आणि ‘देता किती घेशिल दो कराने’ अशी अवस्था निर्माण झाली. यशवंतरावांचा मार्ग त्यामुळे निर्वेध झाला आणि लगेचच तो त्यांनी निष्कंटकहि बनवला.

मुख्य मंत्री झालेले यशवंतराव मातोश्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा आपला यशवंता कुणी तरी मोठा झाला आहे एवढंच विठाईला समजलं. राजकारणांतलं असलं मोठेंपण समजून घेण्याचा प्रयत्न त्या माऊलीनं कधी केलाच नव्हता. पण मुलगा ‘साहेब’ झाल्याचं समजतांच तिचे डोळे ओले झाले. ते आनंदाश्रु होते. त्या अश्रूंना मोत्यांचं मोल होतं. यशवतंरावांचं मनहि गलबलून गेलं होतं. महाराष्ट्राच्या सिंहासनावर ते आरूढ झाले खरे, पम तें पहाण्यासाठी ज्ञानोबा आणि गणपतराव त्यांना हवे होते. ते तर केव्हाच निघून गेले होते! मागे राहिल्या होत्या आठवणी आणि प्रतिमा-त्यांनाच आता वंदन करावं लागणार होतं.