• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ११६

मुख्यमंत्रिपदावर त्या वेळीं मोरारजी देसाई होते. तरी पण ही जागा रिकामी होणार असल्यानं यशवंतरावांनी ही जागा संपादन करण्याच्या निर्धारानं पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विदर्भांत कन्नामवार आणि पी. के. देशमुख या दोन शक्ति होत्या. देशमुख हे हिरे यांच्या बाजूचे होते आणि कन्नमवार यांनी आपली सर्व शक्ति चव्हाम यांच्या पाठीशीं उभी करण्याचा निर्णय केला होता. प्रदेश – काँग्रेसनं ३० ऑगस्टच्या बैठकींत, द्वैभाषिकाला मान्यता देण्याचा ठराव केल्यापासूनच द्वैभाषिकाच्या नेतृत्वासाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या होत्या. हिरे हे प्रथमपासूनच त्यासाठी उत्सुक होते. किंबहुना त्रिराज्य-योजना मान्य करण्याचा आग्रह धरणारांपैकी ते एक होते. त्रिराज्य निर्माण झालं तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद त्यांनी गृहीतच धरलं होतं. तसं घडण्याची शक्यताहि होती; परंतु स्वत:च्या निर्णयाबद्दल ते स्वत:छ भक्कम रहात नव्हते. निर्णय बदलत रहाणं हा त्यांचा पुढे स्वभाव बनल्यानं, द्वैभाषिकाची योजना येतांच त्रिराज्य-योजना बाजूस सारून त्यांनीच प्रथम ती मान्य केली. मुख्यमंत्रिपद मिळण्याची संधी यामुळे हुकणार आहे याकडे तयांनी लक्ष दिलं नसावं.

द्वैभाषिकाचा पर्याय पुढे आला त्या वेळीं, अमृतसर इथेच मोरारजींनी, द्वैभाषिकाची जबाबदारी आपण स्वीकारणार नाही, असं पं. पंत आणि ढेबरभाई यांना सांगितलं होतं. तरीहि काँग्रेस-श्रेष्ठांचं मत, मोरारजी यांनीच द्वैभाषिकाची जबाबदारी स्वीकारावी असं होतं. त्यानुसार मोरारजींना श्रेष्ठांनी सूचनाहि केली. नेतेपदाबद्दल महाराष्ट्रांत सुरू झालेल्या हालचाली आणइ चव्हाणांची वाढती शक्ति लक्षांत आल्यानंतर विदर्भांतील पी. के. देशमुख प्रभृतींनी, चव्हाण यांना बाजूला सारण्याच्या दृष्टीनं दिल्लीचे हेलपाटे सुरू केले, काँग्रेस-श्रेष्ठांनी मोरारजींनाच मुख्यमंत्रिपदासाठी तयार करावं असा त्यांचा आग्रह होता. मोरारजींनी तें मान्य केलं असतं, तर हिरे यांना निवडणुकीच्या रिंगणांतूनच बाहेर काढण्याची त्यांची तयारी होती. पी. के. देशमुख आणि गो. ह. देशपांडे यांनी हिरे यांना हा बेत सांगतांच मात्र हिरे भडकले. मोरारजी यांची एकमतानं निवड व्हावी हे हिरे यांना कदापि मान्य नव्हतं.

एकमतानं निवड होणार असेल तरच जबाबदारी स्वीकारण्याची मोरारजींनी तयारी दर्शवली होती. दरम्यान द्वैभाषिकाचं नेतृत्व स. का. पाटील यांनी स्वीकारावं असाहि कांही काँग्रेस-श्रेष्ठांचा प्रयत्न होता. परंतु ते निवडून येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. स. का. पाटील हे कोकणांतले सारस्वत. महाराष्ट्रांतल्या विविध जाति-जमातींतून निवडून आलेल्या आमदारांचीं मतं मिळतील अशी त्यांना खात्री नव्हती. त्यांची सर्व मदार मुंबईवर होती; पण तिथेहि फाटाफूट झालेली होती. मोरारजींचाहि पाठिंबा मिळण्याची उरलेली नसल्यानं श्रेष्ठांची इच्छा पूर्ण करणं पाटील यांना अशक्य ठरलं.

शंकरराव देव यांनी मात्र हिरे यांना मुख्य मंत्री करण्यासाठी बरीच धांवपळ केली. गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्र इथल्या आमदारांनी नेता-निवडीच्या वेळीं तटस्थ रहावं यासाठी त्यांनी मोरारजींची मदत घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रांतले आमदार, नेतेपदाचा निर्णय एकमतानं करणार नसतील, तर गुजरात, कच्छ सौराष्ट्र इथल्या आमदारांनी तटस्थ रहाणं योग्य होय अशी त्यांची सूचना होती. मोरारजींनी स्वत:च मुख्य मंत्री म्हणून रहावं असा देव यांचा प्रारंभीं आग्रह होता; परंतु मोरारजींनी त्यास नकार देतांच त्यांनीहि दुसरी सूचना केली. या संदर्भांत मोरारजींवर दिल्लीहून दबाव आणण्याचाहि त्यांनी प्रयत्न केला; पण त्याचा परिणाम होत नाही असं आढळतांच वैकुंठलाल मेहता किंवा सी. डी. देशमुख या दोघांपैकी कोणा तरी एकाचा नेते-पदासाठी प्रयत्न करावा असं त्यांनी मोरारजींना पत्र लिहून सुचवलं.

देव यांचे खरे उमेदवार भाऊसाहेब हिरे हे होते; परंतु त्यांचं सारं डळमळीत आहे असं दिसतांच, त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंतराव चव्हाण यांना संधि मिळण्यापेक्षा, दुस-याच कुणाला तरी नेते-पदाची माळ घालण्याचा एक वेगळाच आनंद त्यांना मिळवायचा होता; परंतु मोरारजींनी तसला आनंद देव यांना मिळूं दिला नाही. कारण वैकुंठलाल मेहता यांची स्वत:चीच तयारी नव्हती आणि सी. डी. देशमुख यांना मतदान करण्याला गुजराती आमदार तयार नव्हते. त्यामुळे देव यांचा मोठाच विरस झाला.