• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-६८

पण या दोन्हीचा काहीतरी आंतरिक संबंध असला पाहिजे खास! ऐतिहासिक वास्तूंच्या छायेत मी जेव्हा जातो तेव्हा तो वास्तुपुरुष हसू लागतो आनंदाने - भेसूरपणे! काळाचा पडदा बाजूला सारून सोन्याच्या टाकाने लिहिलेला वैभवशाली इतिहास वाचताना त्यांना आनंदाने भरते येते. आणि मळलेली भाग्यरेखा दाखविताना तो भेसूर हसतो. तो सांगतो, रत्‍नजडित सिंहासनावर आरूढ झालेला मी आज असा आहे. पडलेला, पिचलेला, जळमटलेला! ते पाहताना अंत:करण विदीर्ण होते.'' यशवंतराव पुढे कथन करतात की, ''शास्त्रज्ञ म्हणतात, सूर्याभोवती ग्रहमाला फिरते. अध्यात्मी सांगतात, सूर्य जगाचा आत्मा आहे. नियती म्हणते, पंचमहाभूते माझे दास आहेत. दृश्य व अदृश्य जगत निर्माण करण्यात नियतीचा लीलात्मक आनंद आहे असेही कोणी म्हणतात. मला वाटते, जग हे कलात्मक आनंदाकरिता निर्माण केलेली शक्ती आहे. या कलेत स्फूर्ती आहे. माणुसकी आहे. केवळ वैज्ञानिक हिशेब म्हणजे जग नव्हे. कला आणि पावित्र्य यांचा हा एक सुरेख संगम आहे.''

'मातीच्या आणि मातेच्या सान्निध्यात मला या सर्वांचा साक्षात्कार घडतो. तिच्या अंत:करणाच्या अवकाशात मी स्थिरावतो. प्रशांत मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळून निघतो, प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो कन्याकुमारीच्या प्रशांत परिसरात, कृष्णामाईच्या सान्निध्यात, गंगायमुनेच्या सहवासात, हिमालयाच्या कुशीत...अशी भावसमाधी लागते.''

यशवंतरावांनी भारत सरकारचे संरक्षण, अर्थ, गृह व विदेशमंत्री या नात्यांनी ज्या विदेशयात्रा केल्या त्या यात्रांमधून त्यांना निसर्गाची जी वैशिष्ट्ये दिसून आली ती त्यांनी सौ. वेणूताई यांना पाठविलेल्या पत्रातून बिनचूक रीतीने टिपली आहेत. ते लिहितात, ''अफगाणिस्तानच्या प्रदेशात प्रवेश केल्यानंतर मात्र डोंगरी मुलुख, बर्फाच्छादित छोटी छोटी शिखरे यांचे दर्शन झाले. प्रथमत: डोंगर व निर्जनसा भाग लागतो. मग हळूहळू छोटया वस्त्या व औद्योगिक विकासाचे दर्शन होऊ लागते. व्यवस्थित मशागत केलेले शेतजमिनीचे मोठमोठे पट्टे व त्यात पसरलेले कालव्याचे जाळे यांचे दर्शन घडताच सामूहिक शेतीच्या सोव्हिएट भूमीवर आल्याची खात्री पटते.'' ''रोमपासून फ्रँकफुर्टपर्यंतचा प्रवास मस्त झाला अधूनमधून विस्तीर्ण समुद्र दिसत होता. एकाकी 'एल्बा' बेट स्वच्छ आकाशामुळे मधेच दृष्टीस पडले आणि नेपोलियनचे शेवटचे खडतर दिवस मनापुढे येऊन गेले. नंतर आम्ही ढगांवर चढलो. पांढर्‍याशुभ्र ढगांनी आसमंत भरून गेले होते. त्यावरून आमचा राजवाडा तरंगत चालला होता. सूर्याच्या कोवळया किरणांनी आमच्या विमानाची प्रतिछाया ढगावर फार सुरेख पडली होती. सप्तरंगी वर्तुळाकार व त्याच्यामध्ये माशाच्या आकाराची विमानाची पडछाया वेगाने पुढे पुढे चालली होती. जणू काही भला मोठा देवमासा समुद्रातून वेगाने पाणी तोडीत चालला होता.'' ढग मोकळे झाले आणि खाली पुन्हा युरोपची भूमी दिसू लागली. जिनेव्हा आणि आल्पसच्या पर्वतराजी, बर्फाच्छादित शिखरे, विस्तीर्ण सरोवरे आणि भोवतालची रेखीव हिरवीगार शेती, घनदाट आखीव बने हे सर्व पाहात केव्हा वेळ गेला हे कळले सुद्धा नाही.'' होनोलुलू येथून पाठविलेल्या पत्रात ते लिहितात, ''समुद्रकाठी हॉटेलची रांगच रांग आहे. आता मी अथांग पसरलेला समुद्र व रेशमी वाळूचे लाबंच लांब परलेले बीच पाहात पाहात माझ्या खोलीत बसून हे लिहीत आहे. मुंबईसारखी हवा, जुहूसारखे वातावरण, मरीन ड्राईव्हसारखा रस्ता, नेहरू शर्ट, चुडीदार घालून बीचवर फेरफटका मारून आलो.''

''सेंट लॉरेन्स केवढी प्रचंड नदी आहे! जगातल्या मोठया नद्यांपैकी एक नदी आहे. नदीकाठचे उंच खडकाळ टेकडीवरील शहर. नदीच्या काठी असलेली सुंदर नवी-जुनी शहरे, लांबच लांब विस्तीर्ण हिरवीगार मैदाने मन मोहून टाकतात. थंडी होती तरी या हिरवळीच्या आखीव - रेखीव वाटांवरून नदीकाठापर्यंत दोन मैल चालून आलो. नदीचा काठ म्हटला म्हणजे मला माझे बालपण व युवावस्था यांची तीव्र आठवण येते. नदीकाठचे माझ्या हॉटेलच्या खोलीमधून दृश्य पाहात पाहातच हे लिहीत आहे.''