• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (69)

:   ८   :

शास्त्रीजींच्या निधनानंतर गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांच्याकडे हंगामी पंतप्रधानपद देण्यात आले. नंदांचा असा समज झाला की पुढेही आपणाकडेच पंतप्रधानपद दिले जाईल. मोरारजी देसाई त्या पदासाठी उत्सुक आहेत, त्यांचे त्यादृष्टीने प्रयत्‍न चालू आहेत याची कल्पना नंदांना नसावी. नेहरूंच्यानंतर मोरारजींनी प्रयत्‍न करून पाहिले होते. तथापि त्यांची संधी हुकली होती. म्हणूनच त्यांनी या खेपेला नेट धरला होता. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी के. कामराज होते. त्यांनी सहकार्‍यांशी चर्चा सुरू केली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि मोरारजी देसाई अशी तीन नांवे चर्चेत पुढे आली. इतर दोघांच्या मानाने चव्हाणांना पाठिंबा अधिक दिसून आला. तथापि चव्हाण आपल्याला डोईजड होतील, इंदिरा गांधी आपले ऐकतील असे गणित मांडून कामराज यांनी इंदिराजींचे नांव उचलून धरले. मोरारजी खूपच मागे पडले. इंदिराजी या पंडित नेहरूंच्या कन्या आहेत, पंतप्रधानपद हे निवडणूक करून ठरवू नये, एकमताने निवड झाली तरच आपण होकार द्यावयाचा असे मनाशी ठरवून चव्हाण घटनांचे निरीक्षण करीत असतानाच इंदिराजींच्या भेटीचा निरोप आला. यशवंतराव निरोपानुसार इंदिरा गांधींना भेटले, दोघात चर्चा झाली. चर्चेच्या शेवटी उभयतांत दिलजमाई पण झाली. यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा मिळताच इंदिरा गांधींचा मार्ग सुकर झाला. मोरारजींनी निवडणुकीचा आग्रह धरला. तथापि त्यांना बर्‍याच मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा नसल्याने इंदिराजींचे पारडे खूपच जड झाले. मतदानात मोरारजींपेक्षा इंदिरा गांधींनाच खूच अधिक मतदान झाले. त्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या. त्यांनी आपले मंत्रिमंडळ बनविताना अध्यक्षांच्या किंवा इतर ज्येष्

(पान नं. १२२ व १२३ नाही आहेत.)