• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ५२

इंदिराजींना निष्ठा समर्पण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी हे निःसंदिग्ध शब्दांत घोषित केले, की -

''माझी निष्ठा इंदिरा गांधी यांना वाहिलेली आहे, त्यांच्या समाजवादी धोरणाचा पाईक म्हणून मी मानसन्मानाची पर्वा न करता कार्य करीत नाहीत.''

आपल्याबद्दल इंदिरा गांधींच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये, म्हणून ते पुढे असेही म्हणाले, की

''प्रधानमंत्रिपदाची मला मुळीच महत्त्वाकांक्षा नाही, इंदिरा गांधी यांना प्रधानमंत्रिपद देण्यात यावे, म्हणून मी दोन वेळा प्रयत्न केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी काही सेवा करता येईल, ती करण्यातच मला कृतार्थता वाटेल.'' ('चैतन्ययुग', ११०).

ऐक्यप्रकरणी यशवंतरावांची शिष्टाई सफल होणार नव्हतीच.  वरिष्ठ नेते प्रधानमंत्र्यांना पेचात पकडण्याच्या, तर प्रधानमंत्री वरिष्ठांना नामोहरम करण्याच्या खटपटीत सर्व सामर्थ्यानिशी पडल्या होत्या.  सिंडिकेटने कार्यकारिणीतून इंदिरानिष्ठांना वगळण्याचा घाट घातला, तेव्हा श्रीमती गांधींनी आपल्या निवडक सहका-यांसह एक खरमरीत पत्र काँग्रेस-अध्यक्षांना पाठवले.  या पत्रावर इतरांसोबत यशवंतरावांचीही सही होती.  सिंडिकेटशी त्यांचा पूर्ण काडीमोड आणि श्रीमती गांधी जे करतील, त्याच्याशी बांधिलकी या दोन्ही गोष्टी एव्हाना स्पष्ट झाल्या होत्या.  श्रीमती गांधींनी त्यांना पूर्ण विश्वासार्ह मात्र त्यानंतर कधीच मानले नाही.

सिंडिकेटने शिस्तभंगाची कारवाई पुढे रेटलीच; पण तोपर्यंत संसदीय पक्षात व बाहेर पक्षसंघटनेतही श्रीमती गांधींचे बहुमत झाले होते.  त्यांनीच मुंबईला अधिवेशन घेऊन लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका पुकारल्या.  निवडणूक आयुक्ताने त्यांच्या काँग्रेसलाच मूळ काँग्रेस म्हणून घोषित केले.  त्यांना निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आणि मुंबई अधिवेशनात प्रसृत केलेल्या स्मरणिकेत लेख लिहून चव्हाणांना जाहीर करावे लागले :  

''जुनी व नवी काँग्रेस हे शब्दच चूक आहेत.  हीच खरी काँग्रेस आहे.  धर्मनिरपेक्षता, लोकशाही व समाजवाद हीच तिची तत्त्वे आहेत.  स्वातंत्र्योत्तर काळात हरवून गेलेल्या काही मूल्यांना पुन्हा प्रतिष्ठित करण्यासाठी तिने हा पुनर्जन्म घेतला आहे.  नवे तारुण्य, नवा विचार, नवे चैतन्य व नवे समर्पण तिच्या रूपाने अवतीर्ण झाले आहे.''  ('विण्डस् ऑफ चेंज', चव्हाण-भाषण संग्रह, ११९).

वचनपूर्तीचे राजकारण, व्यवहार्य दृष्टिकोण, आत्मपरीक्षण, कार्यक्रमात्मक चिंतन आणि अंमलबजावणीवर विशेष कटाक्ष ही या काँग्रेसची खास वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले होते.