• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २८

यशवंतरावांनी लिहिले आहे की, इंग्रजी काव्य इतक्या आकर्षक शिकवणारे बोस हे विरळा. पुढे यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीस गेले असताना, प्रा. बोस दिल्लीत असतात व त्यांचा मुलगाही प्राध्यापक असल्याचे त्यांना समजले. तेव्हा यशवंतरावांनी त्यांना घरी चहाचे आमंत्रण दिले व त्याप्रमाणे प्राध्यापक बोस आपल्या मुलाबरोबर आले आणि तासभर गप्पागोष्टी करून गेले.

राजाराम कॉलेजच्या ग्रंथालयात अनेक विषयांवरील उत्तमोत्तम ग्रंथ होते. यशवंतरावांनी या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला. एच. जी. वेल्सचा जागतिक इतिहास वाचून त्यांना एक सम्यक दर्शन झाले. शॉच्या नाटकांच्या विचारांना चालना देणा-या प्रस्तावन वाचल्या. समाजवादासंबंधीची पुस्तके वाचली. व्हिक्टर ह्युगो इत्यादींच्या कादंब-या वाचल्या. वर्तमानपत्रे व नियतकालिकांचे वाचन चालूच होते. तथापि गांधीजींच्या ‘हरिजन’ची ते व त्यांचे मित्र आतुरतेने वाट पाहत असत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र प्रसिध्द झाल्यावर त्याचे सामुदायिक वाचन झालेच, शिवाय यशवंतरावांनी नंतर त्याची पारायणे केली. याचे कारण असे की, गांधीवादासंबंधी नेहरूंची काहीशी द्वीधा मन:स्थिती होती, तशी ती यशवंतरावांचीही होती. गांधींबद्दल आदर व निष्ठा बाळगूनही त्यांचा विधायक कार्यक्रम हा देशापुढील आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यास पुरेसा आहे की नाही, याबद्दल यशवंतरावांचे मन साशंक होते. यामुळे ते नेहरूंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. यशवंतराव व त्यांचे मित्र या विषयावर अनेकदा चर्चा करत. यांत आत्माराम पाटील व राघूअण्णा लिमये हे प्रमुख मित्र होते. हे दोघे अनेकदा कोल्हापूरला येत किंवा यशवंतरावांना कराडला बोलवून घेत.

ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांची एक संघटना स्थापन करण्याचाही विचार या मंडळींनी केला होता. पण हे करताना काँग्रेस हाच आपला राजकीय पक्ष मानायचा व त्याच्या ध्येयधोरणानुसार या संघटनेला वळण द्यायचे आणि काँग्रेस समाजवादी बननण्याचे प्रयत्न करायचे, असे या मित्रांनी पक्के केले होते.

काँग्रेस हाच आपला राजकीय पक्ष मानण्याबाबत यशवंतरावांचा या आधीच निश्चय झाला होता; पण कारागृहात सुटून आल्यानंतर त्यांनी ज्या राजकीय हालचाली केल्या, त्यावेळी या निश्चयास धक्का लागला या संबंधात एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, काँग्रेसमध्ये जवळपास १९३४ पर्यत तीनचार गट वावरत होते. एक होता लोकमान्य टिळकांच्या अनुयायंचा. यात माधव श्रीधर अणे, तात्यासाहेब केळकर, शिवरामपंत परांजपे इत्यादींचा समवेश होत होता. यांपैकी अणे हे नव्या काँग्रेसनेतृत्वाशी जवळ होते. तथापि तात्यासाहेब केळकर यांची मन:स्थिती व्दिधा होती आणि ३४ सालानंतर त्यांनी काँग्रेसचा त्याग केला. तसे पाहिले तर ३२ सालीसुध्दा महाराष्ट्र काँग्रेसची कचेरी ‘केसरी’ च्या आवारात होती. नंतर तिचे स्थानांतर झाले. काँग्रेसमध्ये समाजवादी, रॉयवादी व कम्युनिस्ट असे गट होते. यांपैकी कम्युनिस्ट गट हा काँग्रेसमध्ये असला तरी गांधीचे नेतृत्व प्रतिगामी वाटत होते; रॉयवादी व समाजवादी गट, काँग्रेसचे काही नेते पुरोगामी नाहीत असे मानत असला तरी काँग्रेस संघटनेत क्रांतिकारक अंश आहे आणि तोच बळकट करून संघटना समाजवादी, पुरोगामी बनवण्याचे प्रयत्न करायचे या मताचा होता. काँग्रेस सोडून जाण्याचा तेव्हा. हे सांगण्याचा हेतू असा की, नंतरच्या काळात—विशेषत: संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले तेव्हा—यशवंतराव काँग्रेसशी एकनिष्ठ नव्हतेच; समाजवादी व रॉयवादी इत्यादी पक्षात ते सामील झाले होते, अशी टीका काहीनी केली होती. तथापि हे पक्ष काँग्रेसबाहेर पडले नव्हते; त्यांना पक्षापेक्षा गट म्हणणे अधिक युक्त होते. शिवाय काँग्रेसला स्वातंत्र्य-लढा व्यापक पायावर उभा करायचा असल्यामुळे, तिने विविध विचारांच्या लोकांना मुक्तद्वार ठेवले होते. कारागृहात समाजवादी विचारांच्या लोकांच्या चर्चा यशवंतरावांनी ऐकल्या होत्या. कारागृहातून सुटल्यावर राघूअण्णा लिमये पुण्यात जात तेव्हा त्यांची एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे इत्यादींशी चर्चा होत असे. त्यांची माहिती देऊन राघूअण्णांनी काँग्रेस समाजवादी पक्षात म्हणजे गटात सामील होण्याचा आग्रह केला तेव्हा यशवंतराव या गटात सामील झाले. पण या मंडळींच्या विचारांत पुस्तकीपणा अधिक असून ग्रामीण भागातल्या स्थितीची त्यांना हवी तितकी कल्पना नाही तितकी कल्पना नाही, अशी यशवंतरावांची भावना झाली होती.