• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ८-२२-०६-२०१२

पत्र - ८
दिनांक २२-०६-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

यशवंतराव चव्हाणसाहेबांना मी अनेक वर्ष पाहिलं.  त्यातल्या लहानपणच्या आठवणी मी तुला सांगत व्हतो.  अशीच आणखी एक आठवण, जरा कळीतपणातली.  मी प्राथमिक शाळेत व्हतो.  पाचव्या इयत्तेत असेन. गोष्ट तशी म्हटलं तर गमतीची, आणि म्हटलं तर गंभीरही.

एके दिवशी दारातल्या चिंचंच्या झाडाखाली बा टोपल्या वळीत बसला व्हता. उन्हं कासराभर आली व्हती.  आई घरातच व्हती.  भाकरीचा खरपूस वास सुटला व्हता.  मी बाच्या भोवताली गलुरीचा डाव खेळत व्हतो.  घाणेरीच्या फोकांचा ढीग बा सपासप चिरीत व्हता.  मध्येच तंबाकूची पिचकारी मारून 'विठ्ठला तू वेडा कुंभार' असं गाणं गुणगुणत व्हता.  गावचा कुलकर्णी सायकल दामटीत गावातनं फलटणला निगाला व्हता.  बाचं त्याच्याकडं लक्ष नव्हतं.  म्होरं गेलेली सायकल एकदम मागं आली.  साकल स्टॅन्डला लावीत काका म्हणाला, 'काय बापू ?'  तेव्हा बानं वर बगितलं, अदबशीर उठून उभा राहिला.  घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला,

'काय म्हणता काका ?  म्या तर काय बी नाय केलं.  आयची आन म्या काय नाय केलं.'  बा हांजी हांजी करीत म्हणाला, काका हसला आणि म्हणाला,

'बापू, आरं काय नाय, जरा वेगळ्या कामानं आलो.  फलटणला निगालो व्हतो.  जरा इचार केला आन् मागारी आलो.'  बानं आपलं बसायचं पोतं झाडलं, नीटनेटकं झटकून हातारलं आन् पारावर टाकलं.  बसा म्हणाला.  आपण तुटाक उभं राहिला.  मी खेळतच व्हतो.  जरा कुतूहलानं म्होरं सराकलो.

काका हळू आवाजात बाला सांगत होता.  'बापू, आरं आमची घरं दारं सार्‍या लोकांनी राज्यभर जाळली.  कोण तो गोडसे ?  त्यानं बापूजींना गोळ्या घातल्या.  लोकक्षोभात सार्‍या राज्यभरातल्या बामणांची घरं दारं पेटवून राखरांगोळी केली.  आमचा सारा समाज देशोधडीला लागला.  सर्वत्र जाळपोळ झाली.  घावलं ते घेऊन माणसं जीव मुठीत धरून शहराकडे पळाली.  जमीनजुमला, घरंदारं, वाडं सारं जितल्या तितं राहिलं.  कित्येकांना प्राण गमवावा लागला.'  काका पंचानं डोळे पुशीत होता.  बानं बी डोळे पुसले.

बा म्हणाला, 'आवं काका, पर आपल्या गावात कुठं काय झालं ?'

'होरे बाबा, ही रावसाहेब धन्यांची कृपा.  आम्ही जीव मुठीत घिऊन दार लावून बसलो होतो.  आन् धनी दारात बसून राहिले.  देशपांडे-कुलकर्ण्यांच्या घराकडे कुणी फिरकलासुद्धा नाही.  चार दिवस पहारा ठेवला.  गावाला समजावलं, आमच्या केसाला धक्का लागला नाही. आम्ही वाचलो.  पण आता गावात राहायला बायको, पोरंलेकरं तयार नाहीत.  माझं मन थार्‍यावर नाही.  म्हणून सारी मुलं लेकरं फलटणला हालावली.  हुईल कसं तरी, पूजापाठासाठी गावात येतो.  चार घरच्या पूजा करतो.  महादेवाला अभिषेक असेल किंवा गावातले काही धार्मिक काम असेल, तर लोक येतात फलटणला.  आता जीव उडालाय.  सारी शान संपली.  मानमरातब गेला.  फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ आली.'

बा आवंढा गिळत म्हणला,
'तुमच्यासारक्या मोठ्या लोकाची अशी गत झाली.  काका आमीतर कायमचं वनवासी.  कर्माचे भोग.'

'आरं, आता एक नवंच संकट आलंय कूळ कायद्याचं.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  सगळ्या लोकाला आनंद झाला.  मलाही आनंद झाला.  पण, त्यांनी नवा कायदा आणलाय.  बापू, तो कायदा आमच्या मुळावर उठलाय.  कसेल त्याची जमीन, जो वहिवाटदार आहे, कूळ आहे तोच त्या जमिनीचा मालक होणार.  कागदावरचा मालकी हक्क संपला. आता मला सांग, काय करायचं आम्ही ?  माझी सारी जमीन कुळाकडं आहे.  त्यातनं पांडुरंगाकडे आहे ती वाचेल.  तो भला माणूस आहे.  पण आठ बिग्यातली कशी वाचणार ?  ती घोडेवाल्याकडे आहे. त्याच्या वाटेला कोण जाणार ?  कायदा तर विपरीत झाला.  पण कायद्यापेक्षा कुणी मोठा नसतो ना ?'