• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३८-०१११२०१२

पत्र - ३८
दिनांक ०१-११-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

'जनावरांना न्याय, माणसांचं काय ?', 'चिमणीला कोठं, सापाला वारूळ, गुरांना गोठा, माणसाला घर कुठाय ?',  'भिका नको, उपकार नको.  माणुसकीचा हक्क हवा', 'आम्हांला न्याय मिळालाच पाहिजे, घटनेचे संरक्षण मिळालेच पाहिजे', 'हम सब एक है' अशा घोषणांनी सारं आभाळ भरून गेलं होतं.  चारपाच हजार स्त्री-पुरुष, लहान मुलं, त्यांची गाढव, डुकरं, बैलं, लहानमोठी सारी घोषणा देत उभी होती.  शिवाजी नगरच्या मराठा प्रिपरेटरी स्कूलच्या समोरच्या रस्त्यावर जवळच महानगरपालिकेचे ऑफिस होते.  घोषणा टिपेला गेल्या होत्या.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाणसाहेब कार्यक्रमाला उपस्थित होते.  सारा रसता ब्लॉक झाला होता.  पोलिसांच्या शिट्ट्या, धावपळ सुरू होती.  रस्त्यावरले लोक पोलिसांना आवरत नव्हते.  'जागा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.'  लोक आक्रमक होवू लागले.  महिला आघाडीवर होत्या.  

सुप्रिया, इंग्रज सरकारने १८७१ साली गुन्हेगार जमाती कायदा केला.  जन्मजात गुन्हेगार म्हणजे माणूस जन्माने जसा अस्पृश्य असतो तसाच माणूस जन्माने गुन्हेगार असतो, असे या कायद्याच गृहितक होते.  ते कितीही अमानवी असले तरी इंग्रजांनी जिप्सींचा प्रश्न जसा युरोपात सोडवला होता तसाच घेट्टो निर्माण करून इथल्या आदिवासी जमातींचा बंदोबस्त करायचा होता.  माणूस कायद्यापुढे मी गुन्हेगार आहे असे म्हणाला म्हणजे तो गुन्हेगार.  त्याच्या मागच्या पिढ्या गुन्हेगार आणि त्याच्या पुढच्या पिढ्याही गुन्हेगारच असणार, असे गृहीत धरून आदिवासींचे उठाव मोडून काढण्यासाठी त्यांना या कायद्याने गुन्हेगार ठरवले.  एका राज्यातील जमाती दुसर्‍या राज्यात नेऊन त्यांच्या स्वतंत्र सेटलमेंट्स वसाहती केल्या.  तीन तारांच्या कंपाउंडमध्ये त्यांना डांबण्यात आले.  बायापोरांनिशी चोवीस तास त्यांच्यावर निगराणी ठेवली.  दिवसातून तीन वेळा आणि रात्री तीन वेळा हजेरी लावायला लावली.  आणि त्यांच्या खाजगी जगण्यावर अमानवी बंधने आणली.  १९११ पर्यंत या जमातींना अत्यंत क्रूरपणे वागवले होते.  नंतर त्यांच्या शाळांची व्यवस्था झाली.  पुरुषाला सहा रुपये आणि स्त्रीला तीन रुपये, मुलांना एक रूपया असे अनुदान होते.  त्यांच्या प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था होती.  कामगार म्हणून कापड गिरण्यांमध्ये त्यांना नोकरी मिळत होती.  इंग्रजी बोलणारी सासू या सेटलमेंटमध्ये होती तर स्वातंत्र्यानंतर जनमाला आलेली तिची सून अंगठाबहाद्दर होती !  इंग्रजच दयाळू होते असे म्हातारे लोक बोलतात.  देश स्वतंत्र झाला.  इंग्रजांनी सर्वोदय हौसिंग सोसायट्या आणि सर्वोदय सहकारी फार्मिंग सोसायट्या करून अक्षरशः हजारो एकर जमिनी या लोकांच्या पुनर्वसनासाठी ठेवल्या होत्या.  स्वातंत्र्यानंतर चोर लोकांच्या त्याच जमिनी मोठ्या चोरांनी पळवायला सुरुवात केली.  हे अडाणी अंगठाबहाद्दर चिरीमिरी चोरत, तर हे शिकलेसवरलेले दरोडेखोर हजारो एक जमिनी चोरत होते.  निमित्त झाले पुणे शहरात रस्त्यात बसणारी गुरे, वाहतुकीला अडथळा करणारी मोकाट जनावेर झाले !  महापालिकेने ठराव केला आणि मुंढवा सेटलमेंटच्या २२५ एकर जमिनीवर पुणे शहरातल्या जनावरांचे गोठे करण्याचा प्रस्ताव पास केला.  ही सेटलमेंटच्या मालकीची शेतजमीन गुरांच्या गोठ्याला संपादन केली.  शासनाने त्याला तात्काळ मान्यता दिली.  वस्तुतः या जमिनी हस्तांतरीत होत नव्हत्या.  पण सरकारनेच ठरवल्यावर काय करणार ?  या जमिनींच्या मालकीचा लढा आम्ही भटक्याविमुक्तांच्या संघटनेच्या वतीने लढत होतो.  मोर्चे, मेळावे, परिषदा चालू होत्या.  मुख्यमंत्री पुण्यात होते म्हणून हा मोर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या जागेवर आणला होता.  आम्हाला गेटवरच अडवले होते.  कार्यक्रमात दादांसोबत चव्हाणसाहेबही होते.  हा सारा प्रश्न त्यांना माहीत होता.  या सर्व जमिनी सेटलमेंटच्या तारा तोडतानाच १९५२ साली चव्हाणसाहेबांनी या जमातींना कायद्याच्या मालकीने सहकारी तत्तावर सोसायट्या करून दिल्या होत्या.  पोलिस गेटवर आले.  पाच लोकांना शिष्टमंडळ घेऊन बोलावले आहे.  आम्ही आठ-दहाजण शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो.  कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री चहासाठी बसले होते.  निवेदने देणार्‍यांची गर्दी रेटारेटी सुरू होती. दादांभोवती माणसांचा गराडा पडला होता.  चव्हाणसाहेबांनी हातानेच मला जवळ बोलावले.  निवेदन घेतले वाचले.  दादांना सांगू लागले, 'दादा हे माझे तरुण मित्र, लक्ष्मण माने.' दादा काही लक्ष देईनात.  साहेब पुन्हा पुन्हा सांगत होते.  त्यांचा अवमान होतोय हे लक्षात आले.  आणि मी माझ्या स्वभावानुसार आक्रमक झालो.  मुख्यमंत्र्यांच्यासमोर घोषणा सुरू केल्या.  घोषणा मुख्यमंत्र्यांच्या विरोधाच्या होत्या.  दादांनी घोषणा थांबवायला लावल्या.  मी संतापलो होतो.  आम्हाकडे बघायला तुम्हाला वेळ नाही, पण त्यांच्याकडे तरी पाहा.  ते तुमचे ज्येष्ठ नेते आहेत.  त्यांचा अवमान करता ?  दादा ताडकर उभे राहिले.  माझी-त्यांची बाचाबाची सुरू झाली.  चव्हाणसाहेबांनी मला हाताला धरले आणि बाहेर नेले.  गोंधळ थोडा कमी झाला.  साहेबांनी मला शांत केले.