अभिनंदन ग्रंथ - औक्षवन्त व्हा, विजयवन्त व्हा... !

औक्षवन्त व्हा, विजयवन्त व्हा... !

ग. दि. माडगूळकर

कोटि मुखांनी आशिर्वच दे महाराष्ट्र माता
औक्षवत व्हा, विजयवंत व्हा, प्रियतम यशवंता !

तुच्या लेखी नगरी नगरी देवराष्ट्र होई
घराघरांतून उभ्या ठाकल्या वरद विठाबाई
'स्वस्ति' वांछितो जनपुरूषोत्तम, उंचावुन शंता - १

सह्याद्रीच्या शिखरीं उठती सवायंभव नाद
सातपुड्याच्या कड्यांत घुमती त्याचे पडसाद
'अजातशत्रू' आज लाभला अम्हा राष्ट्रनेता !    - २

शिवस्मृतीची शाल अर्पिती, लोक लोकमान्यतां,
टिळकपणाचा टिळक लाविती तुम्हां नागकन्या,
प्रतिपचंद्रापरी वाढुं द्या अशीच जग गाथा -     - ३

लोकशाहिचे तुम्ही पेशवे, सेवेचे स्वामी
तुमच्या मागें राहो जनता नित्य पुरोगामी
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत-भूमि-माता-    - ४