• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (31)

यशवंतरावांना नेहमी नवीन पुस्तकं वाचण्याचं वेड होतं. प्रकाशित झालेली नवी चांगली पुस्तकं ते मागवून घेत. एवढ्या व्यापात ते केव्हा, कसे, कधी वाचत असत याचं कोडं मला अजूनही सुटलेलं नाही. वर्षभरातली मराठीतली पंचवीस-पन्नास तरी त्या वर्षाची निवडक चांगली पुस्तकं त्यांनी वाचलेली असायची. भेटीत ते त्या पुस्तकांच्या चर्चा करीत. आपली मतं तपासून घेत. खूप लेखक व प्रकाशक त्यांच्याकडे नियमित पुस्तकं पाठवीत असत. इंग्रजी व इतर भाषांतल्या पुस्तकांशी संदर्भ ती पुस्तकं वाचून झाल्यावर ते मित्रांसोबत बोलण्यातून देत. मिळतील ती चांगली पुस्तकं वर्षातून एक-दोनदा तरी त्यांना भेट म्हणून मी घेऊन जात होतो. “रिव्हिएरा” वर पुस्तकं दिल्यावर ते फार प्रसन्न असायचे. त्या लेखकांची, त्यांच्या नव्या लेखनाची चौकशी करायचे. खूप आडवळणाच्या गावांचे, थेड विदर्भ-मराठवाडा-कोकणातले नवीन लेखक चांगलं लिहिताहेत या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटायचा. त्या समृद्ध लेखकांचा, नव्या लेखकांचा, दलित-ग्रामीण नव्या प्रवाहांचा त्यांच्या भाषणांमधून ते आवर्जून उल्लेख करीत असत. त्यांच्या भेटींसाठी खूप उत्सुक असत. जी. ए. कुळकर्णी यांची ‘इस्किलार’ ही दीर्घ कथा त्यांना वाचायची होती. त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी जी एं. ची दोन दीर्घ कथांची पुस्तकं त्यांच्याकडे घेऊन गेलो. तेव्हा ते भालचंद्र नेमाडे या लेखकाला भेटायचं आहे असं म्हणाले. केव्हातरी भेटीचं ठरवा असं मला पुन्हा एक-दोनदा म्हणाले. चांगली वाड्मयीन मासिकं बंद पडताहेत, याचं त्यांनी दु:ख व्यक्त केलं. मी त्यांनी ‘अनुष्टुभ’ या वड्मयीन मासिकाबद्दल सांगितलं, काही अंक दिलं तेव्हा त्यांना ते आवडले. त्या मासिकाच्या संपादकांना त्यांना समालोचन करून दीर्घ पत्रं लिहिली. त्यांनी स्वत:ही तहहयात वर्गणी पाठविली व त्यांना इतरही मदत व्हावी म्हणून प्रयत्न केले. मनमाड, धुळे या ठिकाणांहून या वाड्मयीन घडामोडी आता होताहेत याचा त्यांना फार आनंद वाटला.

काँग्रेस एस्. च्या तिकिटावर श्री. शरदराव पवार यांना वीस-पंचवीस खासदार उभे करायचे होते. स्वत: शरदराव बारामती मतदारसंघातून लोकसभेसाठी उभं राहायंच पक्कं झालेलं होतं. बारामती, पुणे या दोन तासांच्या मोटार-प्रवासात शरदराव, मी व बारामतीचे त्यांचे विश्वासू कार्यकर्ते श्री. भीमदेव गोफणे असे होतो. औरंगाबाद मतदारसंघातून मी लोकसभेसाठी उभं राहावं असा शरदरावांचा आग्रह होता. औरंगाबादेच्या त्या जवळपासच्या एक-दोन सभा – संमेलनांतून हे उद्याचे औरंगाबादचे खासदार अशा शब्दांत त्यांनी घोषणाही केलेली होती. कार्यकर्त्यांनाही सांगितलं होतं. खाजगीतही त्या वेळी ‘काय खासदार?’ असंच ते म्हणायचे. मी त्यांना माझ्या खूप अडचणी सांगितल्या. पण ते बिल्कुल ऐकेनात. तुम्ही फक्त फॉर्म भरा. प्रचारसभा, पैसा, निवडून आणणं सगळं आम्ही करू. तुम्हांला थोडाही त्रास होणार नाही. शेतक-यांच्या योजना आता दिल्लीत बोलत्या करा. मी काही एक ऐकणार नाही.

श्री. भीमदेव गोफणे व शरदराव बारामती – पुणे प्रवासात फारच आग्रह धरून माझ्या पाठीमागे लागले. त्यापूर्वी पाच वर्षाआधी मराठवाड्यातल्या नेत्यांनी मला खासदार म्हणून उभा राहण्याचा आग्रह धरलेला होता. तसं वृत्तपत्रातून ठळकपणानं माझं नाव त्या वेळीही आलेलं होतं, पण ते मला नकोच होतं. फार तरूण नव्या कार्यकर्त्याला तिकीट देताहात हे बरोबर नाही असं बाकीचे म्हणत होते. पण मीच तयारी दर्शविली नव्हती ही त्या वेळची खरी वस्तुस्थिती होती.

शरदराव नुसते आग्रही नव्हते तर थोडे रागावलेलेही होते. मी यशवंतरावांना भेटलो. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली.

“शरदरावांचं तुम्ही खूप ऐकलं. आणखीही ते सांगतील ते ऐका. त्याप्रमाणे करा; पण लोकसभेसाठी उभं राहण्याचं बिल्कुल ऐकू नका. ते होऊ द्यायचं नाही. तुम्ही निवडूनही येऊ शकता; पण राज्यपाल, राष्ट्रपती यांच्याकडूनच तुम्ही बिगरनिवडणुकीचं सन्मानानं सभागृहात जावं असं मला वाटतं. तुम्ही चांगले लेखक- कवी आहात. तरूण आहात. तुमच्याकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. चांगली निसर्गकविता तुम्ही मराठीला दिलीय्. इतका सुंदर निसर्ग व शेती देशात आहे. सर्वदूर त्याचं सौंदर्य दिसतं. त्याचं आव्हान स्वीकारून तुम्ही लिहावं. ते आम्हांला पाहिजे. निवडणुकीच्या जंजाळात तुमच्यावर फार बंधनं पडतील. ते जग फार निराळं आहे. आता तुमच्यावर तशी बंधनं नाहीत. आमदार, मंत्री, खासदार आम्हांला खूप मिळतील. चांगला कवी मिळणं कठीण आहे. त्या कवीला त्याच्या कवितेसकट जपायचं असेल तर उभं करून उपयोगी नाही. तुमची कविता महत्त्वाची. ती नसती तर माझं तुमच्याशी, तुमच्या पळसखेड्याशी नातं जुळलं नसतं. महाराष्ट्रातले जे कुठेच कधी स्वत:हून जात नाहीत ते श्रेष्ठ साहित्यिक कलावंत तुमच्या सुन्या खेड्यात तुमच्यासाठी आले नसते. तुमची शक्ती व काम वेगळं आहे हे आम्ही समजून घ्यावं.