महाराष्ट्र-जगन्नाथाचा रथ
महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक सोन्याची घटना आहे, असे मी मानतो. प्रगतीच्या दिशेने पावले पडली आहेत व काही बाबतींत निराशा झाली आहे. परंतु प्रगतीच्या दिशेने चाललेलील ही सफर मध्येच अडून चालणार नाही. १९६० साली नव्या महाराष्ट्राला मी अत्यत आवडीने ‘जगन्नाथाचा रथ’ अशी सार्थ उपमा देत असे. सर्वांचे हात लागल्याशिवाय हा रथ हलणारही नाही व चालणारही नाही. महाराष्ट्राचा जन्म होताना जी दृष्टी आणि भावना होती, ती स्वयंस्फूर्त प्रयत्नांनी पुनरूज्जीवित केली पाहिजे.