• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंत चिंतनिका २२

विज्ञाननिष्ठ समाज

विज्ञानसेवेचा किंवा प्रसाराचा विचार करताना माझ्या मते त्याच्या दोन प्रमुख अंगांचा विचार केला पाहिजे : एक तर मानवजातीसमोर आज जी संकटांची परंपरा उभी आहे, ती नाहीशी करण्यासाठी, निसर्गाचे गूढ उकलून, मानवाला जास्तीत जास्त शक्ती प्राप्त करून देणारे संशोधन करणे आणि अशा प्रकारच्या संशोधनास प्रोत्साहन देणे. दुसरे, जे माझ्या मते जास्त व्यापक कार्य आहे, समाजात विज्ञानविचाराचा प्रसार व प्रचार करून समाजच विज्ञाननिष्ठ बनविणे. हे काम करण्यासाठी मात्र आपणांस जास्त कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विज्ञानाचे मूळ स्वरूपच तर्कसंगत, बुध्दिसंमत विचार असे आहे. हा विचार जनतेच्या मनात दृढमूल झाल्यावरच आपण एक आधुनिक समाज निर्माण करू शकतो. जुन्या सनातन कल्पना समाजातून काढून टाकण्याचा हाच एक कार्यक्षम उपाय आहे. या दिशेन जितक्या लवकर आपला देश व समाज प्रगतिशील राष्ट्रांच्या मालिकेत जाऊन बसेल.