• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १०१

मिठाचा प्रश्न घेऊन ते समोर एकटेच निघाले. पण हजारोंनीं त्यांच्या लढाईंत त्यांची सोबत केली व यशस्वी लढाई दिली. आज जनतेचे प्रश्न सोडविण्याकरितां अशाच नेतृत्वाची गरज आहे. कोणतीहि समस्या सोडविण्याकरितां अशाच नेतृत्वाची गरज आहे. कोणतीहि समस्या सोडविण्यासाठीं कार्यकर्त्यांनीं अशीच उडी टाकली पाहिजे, तरच आजचे निकडीचे प्रश्न सोडवितां येतील. त्यासाठीं जनमत जागें केलें पाहिजे. जनतेचे प्रश्न समजावून घेऊनच आपणांस अशी जागृति निर्माण करतां येईल. आपण खेड्यांत जा, शेतक-याशीं समरस व्हा आणि शेती सुधारण्याच्या कामीं त्याला मदत करा. पण एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या, नुसत्या शेतीच्या सुधारणेनें देश समृद्ध व शक्तिशाली होणार नाहीं.

केवळ शेतीवर आधारलेला देश आर्थिक दृष्ट्या उन्नत होत नाहीं. आपणांला हिंदुस्तान शक्तिशाली करावयाचा आहे, समृद्ध करावयाचा आहे. त्याकरितां औद्योगिक शक्ति वाढली पाहिजे. खेड्यापाड्यांतून विजेचा वापर झाला पाहिजे. ही बिजली खेड्यांत गेल्याशिवाय उत्पादनाचें मान वाढणार नाहीं. शेतीसोबत लहान उद्योग वाढून खेड्यांची शक्ति विकसित झाली पाहिजे, खेड्यांतून ज्ञान विकसित झालें पाहिजे. मुंबई, मद्रास, कलकत्ता इत्यादि मोठमोठ्या शहरांत विजेचा झगमगाट दिसतो आणि खेडीं मात्र अंधारांत राहतात, ही परिस्थिति बदलली पाहिजे. हाच आजचा खरा प्रश्न आहे. हा महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठीं पहिल्या दोन पंचवार्षिक योजना झाल्या असूनहि शेतक-यांना खराखुरा फायदा झाला नाहीं. हें खरें आहे कीं शेती सुधारली नाहीं तर कांहींच होणार नाहीं. त्याकरितां शेतक-यांना, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळालें पाहिजे. त्यांना अडाणी ठेवून त्यांचा विकास कसा होईल? नवा विचार, नवा माणूस निर्माण केल्याशिवाय कांहींच साधणार नाहीं. मीं हें जें नवें स्वप्न पाहतों, तें महाराष्ट्र राज्याचें स्वप्न आहे. खेड्यांतील माणूस हा स्वतःच्या श्रमाचा मालक झाला पाहिजे. आज आपल्याला खेड्यांतून काय दिसतें ? कशींबशीं घरें आहेत, पण त्यांत प्रकाश नाहीं, पाण्याची सोय नाहीं. छोट्या छोट्या घरांत सर्व वापर. ही त्यांची दैनावस्था ! इकडे शहरांत सायकलरिक्षा चालविणारा मजूर घामांत सारखा न्हाऊन निघतो, त्याला किती यातना होतात ! हें सारें पाहून मन शतशः दुःखी होते. आपल्या विणकरांचा प्रश्न घ्या. ते कसेबसे जिवंत दिसतात. त्यांचा पिढ्यान् पिढ्या चालत असलेला हा धंदा आहे. त्याला आपण नवीन शक्ति दिली पाहिजे. हेच खरे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मोठमोठ्या उद्योगधंद्यांसंबंधीचीं चर्चा आपण ऐकतों. त्यांची वाढ झाली पाहिजे हें मलाहि मान्य आहे. पण मोठमोठ्या उद्योगधंद्यांसाठीं मोठ्या भांडवलाची गरज असते. अर्थात् त्या भांडवलावर आपणांस विसंबून भागणार नाहीं. छोट्या छोट्या उद्योगधंद्यांचा आपण विकास केला पाहिजे. त्यांना एकत्र आणून त्यांची वाढ करून आपण आपला विकास साधला पाहिजे. आपल्या ह्या मूलभूत समस्या आहेत. नव्या महाराष्ट्र राज्याचे हे मूलभूत प्रश्न आहेत. ह्या मूलभूत प्रश्नांना आपण हात घातला पाहिजे. मला माहीत आहे कीं हें काम वाटतें तितकें सहज किंवा सोपें नाहीं. तें फार अवघड असें काम आहे. पण तें पार पाडण्यांत खरा पुरुषार्थ आहे. हे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य करीत आहे. हे प्रश्न सोडवीत असतांना त्याचे प्रयत्न कमी पडत असतील तर महाराष्ट्राचा पराभव झाला असें तुम्ही आग्रहानें सांगितलें पाहिजे.