• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०७

१०७ - संयमी कणखर लोकशाहीवादी – वि.स. माडीवाले

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार श्री.यशवंतराव चव्हाण चतुर व संयमी मुत्सद्दी होते. प्रसंगानुरूप कसे वागावे, समयोचित निर्णय कसा घ्यावा, अचूक शरसंधान कसे करावे याचे त्यांना पुरेपूर ज्ञान होते. त्यांच्या कर्तृत्वाची व चाणाक्षपणाची खरी कसोटी लागली संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या कठीण काळात. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना तर दुखवावयाचे नाही, काँग्रेसची शिस्त तर पाळावयाची, त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्र स्थापन करावयाचा. सर्कशीत ज्वालांच्या कड्यातून सिंह जसा अलगद उडी मारतो व प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवितो तसेच या बिकट प्रसंगात त्यांचे झाले होते. त्यांच्या बाणेदार वागणुकीची मला वार्ताहर म्हणून प्रचिती आली ती हैद्राबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले असताना. कार्यकारी मंडळाचे बैठकीत महाराष्ट्राचा प्रश्न निघाला तेव्हा काँग्रेस नेत्यांना या प्रश्नाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी आर्जवी भाषा वापरली त्याचबरोबर वेळीच एक टाका घातला नाही तर पुढे नऊ टाके घालावे लागतील असा स्पष्ट इषाराही दिला. आणि पुढच्या काळात तो इषारा खरा ठरला. आपले मत लोकशाहीच्या चौकटीत मांडण्याचे त्यांचे वाक्चातुर्य, मनाची पकड घेणारे होते. ते जितके संयमाने बोलत तितकेच प्रसंग पाहून कठोर प्रहार करण्यासही कचरत नसत. हा प्रश्न हृदयपरिवर्तनाने सोडवावा की, दबावाने सोडवावा असा अनेक वेळा काँग्रेस कार्यकर्त्याचे सभेत खल झाला. साहेबांनी दोन्हीचा उपयोग चातुर्याने केला.

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्याचे शिबिर शिर्डी येथे भरले होते. त्यात संयुक्त महाराष्ट्राची चर्चा झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र करणे कसे न्याय्य आहे हे अनेक कार्यकर्त्यानी सांगितले. या शिबिराला श्री.ठाकोरभाई देसाई आले होते. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असे हितसंबंधी लोकांचे प्रयत्न चालूच होते. काँग्रेस कार्यकर्त्याची महाराष्ट्राची न्याय्य मागणी ऐकून ठाकोरभार्इंचा रागाचा पारा चढला व ते तावातावाने बोलू लागले आपला या मागणीला विरोध असल्याचे त्यांनी कडक शब्दात सांगितले. त्यांचा संताप इतका शिगेला पोहचला की शेवटी ते रागाने म्हणाले, ‘‘माझ्या प्रेतावरूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होईल.’’ या भाषणाचे वेळी साहेब मंडपात नव्हते. ठाकोरभाईच्या या आततायी भाषणाबद्दल मी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता साहेब शांतपणे पण हसत म्हणाले की, ‘‘लोकशाहीमध्ये कोणीच अशी अतिरेकी भाषा वापरू नये’’ साहेबांसारखा चतुर नेता अधिक टीका काय करणार? मुखात चपराक देतात पण त्याचे वळ इतरांना दिसत नाहीत ज्याला ती चपराक बसते तोही कुंठीत होतो.

पुण्यातील काँग्रेस भुवनात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर अनेक सभा होत. आठ आठ तास चर्चा चाले. विविध पर्याय येत पण मार्ग सापडत नव्हता. अशाच एका सभेत साहेबांचे मनाचा ठाव घेणारे भाषण झाले. या प्रश्नाची निकड त्यातून प्रगट होत होती. पण त्याची तड कशी लावावी हे उलगडत नव्हते. भाषण ऐन रंगात आले होते.कार्यकर्ते टाळ्या वाजवून पसंती दाखवीत होते. साहेब म्हणाले, आपण इंग्रजी वसाहतवादाविरूद्ध प्राण पणाला लावून लढा दिला व स्वातंत्र्य मिळविले. पण भाषावार प्रांतरचना करताना मुंबईचा प्रश्न सुटत नाही. इतर प्रांतांत तो सुटला आहे मग महाराष्ट्राचे बाबतीत माघार का घेण्यात येत आहे? याचा अर्थ उघडच स्पष्ट आहे की अद्यापि देशी वसाहतवाद संपलेला नाही. हा यशवंत बाणा बराच काळ गाजला. दिल्लीपर्यंत पोहोचला. संयमी भाषणाबरोबरच झणझणीत इषारा देण्याची त्यांची हातोटी अनेक वेळा अनुभवाला आली आहे. कृष्णाकाठचा ऊस गोड तशीच मिरची चटका देणारी.

पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाचे पटांगणावर अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्याचवेळी बेळगांव कारवारचा सीमा प्रश्न धसास लागला होता. श्री.जयंतराव टिळक सीमा लढ्यातील पहिले सत्याग्रही. त्यांनी बेळगावला सत्याग्रह करून तीन महिने कारावासाची शिक्षा भोगली होती. अर्थातच सीमा लढ्याचे केंद्र गायकवाडवाड्यात होते.