• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७५

७५. यशवंतराव, जाण्याची अशी उगाच का घाई केली? – टी.जी. देशमुख

यशवंतराव आपण आताशा गळून गेला होता, वेणूताई गेल्यापासून जग जणू रितं झालं होतं तुम्हाला ! ‘‘ते खायला येण्यापूर्वी मी त्या विराटरूपात आपणहून जाईन, असे तुम्ही पुटपुटला’’, तेव्हा ते यशवंतराव नव्हते, असं मला वाटू लागलं !

दिल्लीत आलं म्हणजे आता कोणाजवळ अडचण सांगून टाकावी ? दु:ख सांगून हलके व्हावे ? तुम्हाला गाणे ऐकण्याचा शौक होता म्हणे. आम्ही तर आपले रडगाणे ऐकविण्यासाठी येत असू ! आता दिल्लीच नाही तर दिल्लीचं तख्त पण तुम्ही नसल्यानं रितं वाटू लागलं आहे ! परवाच तेथे गेलो, केवळ दोन-तीन तासांसाठी.. काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर टाकावे व परत यावे म्हणून ! बोलणं झालं, टॅक्सीला तडक वन रेसकोर्सवर चालविले. रात्रीची कडाक्याची थंडी होती. खूपच दाट धुक पडलं होतं... ‘‘यशवंतराव चव्हाण’’ अशी चक्क पाटी वाचली. ‘‘अब साहब यहाँ नहीं हैं’’..! साहेब कोणी असले नसले तरी इथंच राहायचे. ‘‘शान असो, मान असो वा अवमान असो..’’ या टी.जी., आता काय घेऊन आलात?’’ असा हसत स्वागताचा उच्चार व्हायचा! आम्ही त्यांना एखाद्या आजोबांसारखे समजून केवढे अडचणीचे प्रश्न विचारायचो.. राजाकारणातला धुरंधर, साहित्यातला थोर पुरुष, चतुर शहाणे नेतृत्व आमच्यासमोर उभे आहे, हे आमच्या गावी नसायचे !

यशवंतराव इंदिरा काँग्रेसमध्ये आले अन् उंबरठ्यावर तिष्ठत बसले, असे म्हणतात. ‘‘म्हणू देत तुमच्यासारखे निष्ठावान’’ पण म्हणतात. या देहातले रक्त जवाहरलाल नेहरूंचे आहे. वाजपेयींच्या शेजारी बसून त्या रक्ताच्या विरोधात कसा जाऊ? माझ्या विरोधात बोलणारे आजचे उद्या माझ्याबरोबर येतील. ‘‘उद्या मला ठाऊक आहे म्हणून तर या राष्ट्रीय प्रवाहात ३५ आमदारांसह मी स्वत:स झोकून दिले आहे. उंबरठ्यावर उभा आहे म्हणता ना मी, तर राष्ट्रीय देवालयाच्या पायरीवर उभा राहण्यासाठी आलो...’’

चोखोबाच्या पायरीची पूजा होते, आजूबाजूच्या कळसांची नव्हे तेथे कोणाचा हातही पोहोचत नसतो. येथे सर्वांचे पाय उभे राहतात ! ३५ आमदारांसह राष्ट्रीय सेनेत सामील होणारे कसलीही अपेक्षा नसणारे, ‘‘निष्ठावान’’ नाहीत का? हरदिनी आपले कसे होईल याची चिंता ठेवणारे तेवढे निष्ठावान का? अन्य वर्णन तुम्ही केलेच आहे. निष्ठावान पुढा-यांनीच निष्ठावान कार्यकर्ते निवडले नाही, असे तुम्हीच म्हटले आहे. मग सोयींच्या राजकारणांचे डाग इतरांना का लावता?’’

यशवंतराव, वसंतराव नाईकांनी शेतकी विद्यापीठ आमच्या विदर्भात देण्याचे नाकारले आहे. अमरावतीत तरुण शेतक-यांची मुले पोलिसांच्या गोळयांनी मृत्युमुखी पडली.. शासन बदनाम झाले आहे. मी रस्त्यावर जाऊन विरोध करणार आहे. नागपूर विद्यापीठात शहीद झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मी मांडला तो एकमताने संमत झाला. विदर्भाचे राज्यच आम्ही मागत होतो ते उगीच नाही. आज दहा खासदार..आम्ही एकत्रित येऊन कृषी विद्यापीठ विदर्भात झाले पहिजे म्हणून निवेदन देणार आहोत. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही काही एक शब्द बोलणार नाही !

‘‘टी.जी. रागात असले म्हणजे तुमच्या वाणीला बहर येतो. पण इतरांना बोलण्याची संधी द्याल की नाही?..’’

‘‘तुम्ही हेच म्हणणार ना की, काँग्रेसची शिस्त पाळली पाहिजे अन् महाराष्ट्राची महान परंपरा जपली पाहिजे...’

‘‘टी.जी जरा दम खा. माझं उत्तर तुम्ही देऊ नका. विदर्भात कृषी विद्यापीठ झाले पाहिजे असे तुम्ही निवेदन काढणार आहात ना मग त्याचे शेवटी लिहा, यशवंतराव चव्हाणांचा आम्हांला पाठिंबा आहे.’’ हे ऐकताच आमचे अंत:करण भरून आले. आम्ही गोंधळलो. लगेच निवेदनाचे शेवटी ओळ टाकली. ‘‘आमच्या या मागणीस अर्थमंत्री श्री. यशवंतराव चव्हाणांचा आशीर्वाद आहे.’’ त्यांनी ते पाहिले, लगेच म्हणाले, ‘‘अच्छा नमस्कार!’’

यशवंतराव, तुमचे भाषण आज पार्लमेंटमध्ये ऐकले. इंदिरा गांधींच्या डोळ्यांच्या कडा भिजल्या होत्या. खूपच छान बोललात.’’

 ‘‘काय टी.जी? केव्हा आलात? माझे भाषण ऐकले किंवा वाचले तरी तुम्ही असे काहीतरी बोलताच, नाहीतरी लिहिण्याची खोडच आहे तुम्हाला!’’

‘‘अगदी खरे सांगतो... मला निंदा करण्याची खोड आहे. प्रशंसा सहसा करण्याची नाही.’’