• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १७

१७. रात्री जागून अभ्यास – शांताबाई पाटील

यशवंतरावांची आणि बापूंची ( कै. आत्मारामबापू पाटील) जुनी मैत्री. पुण्यात ते शिकायला आले त्या वेळी आमच्या घरीच राहात. रात्री उशिरापर्यंत जागून ते अभ्यास करीत आणि सकाळी उशिरा उठत. पण अभ्यास तसा कमीच व्हायचा. कॉम्रेड चितळे वगैरे मंडळी त्यांच्याकडे यायची आणि राजकारणावर गप्पा चालायच्या. बापूंकडे क्रांतिकारकांचा आणि राजकीय माणसांचा राबता फार होता. यशवंतरावांना राजकारणाचा फार नाद असे. त्यामुळे या राबत्याचा त्यांच्यावरही परिणाम होत असे.

त्यांना जेवण-खाण्याचे सारे जिन्नस आवडत. ते चवीने खाणा-यांपैकी होते, पण कधीही त्यांनी ‘‘मला अमुक हवे’’ किंवा ‘‘अमुक नको’’ असे सांगितले नाही. घरात असेल ते खात. अनेकदा शिळे खाऊन देखील ते कॉलेजात जात.

ते पास झाले पण आमच्या घरी राजकारणाची फार गडबड असल्याने त्यांचा अभ्यास होत नसे. ‘‘तुमच्याकडे अभ्यास होत नाही. मी दुसरीकडे जातो.’’ म्हणून पुढे त्यांनी खोली घेतली. घरात असेपर्यंत घरातल्या माणसासारखी मदत करीत. सर्वांची विचारपूस करीत. दुसरीकडे राहायला गेल्यावर आणि मोठेपण मिळाल्यावर देखील त्यांनी हा जिव्हाळा आणि अगत्य चांगले ठेवले होते.