• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३१ -१

यशवंतराव जन्मजात लोकशाहीवादी होते त्यामुळे लोकांच्या मनाचा अंदाज, लोकभावनांचा आदर आणि लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते आणि लोकमन वा लोकभावना लक्षात घेऊन पाऊल टाकले पाहिजे या प्रकारची भूमिकाही त्यांच्या मनात सतत असे. प्रशासनाबाबत ते सुस्पष्ट होते. कोठेतरी प्रशासनात मनाविरूद्ध निर्णय घ्यावा लागला तर त्यामध्ये राज्याची आणि समाजाच्या हिताची भूमिका त्यांच्या मनात निश्चितपणे असे. सार्वजनिक जीवनात काम केल्यानंतर विचारी तरूण रॅडिकल होतो. डावीकडे वळतो. यशवंतरावसुद्धा डाव्या विचारसरणीच्या अभ्यासवर्गाला जायचे. त्यात त्यांना मानवतावादी डॉ.मानवेंन्द्रनाथ रॉय यांच्याशी विचारविनिमय करण्याची डॉ. रॉय मानवतावादी डॉ.मानवेंद्रनाथ रॉय यांच्याशी विचारविनिमय करण्याची व डॉ.रॉय मानवतावाद व लोकशाहीची संकल्पना त्यांच्या मनावर बिंंबली. पुढे पंडित नेहरूंशी संबंध आल्यावर त्यांच्या लोकशाही विचारसरणीला समाजवादाची जोड मिळाली. म्हणूनच ख-या अर्थाने मानवतावादी, समाजातील सर्व स्तर आणि विशेषत: उपेक्षित माणसांबद्दल एक प्रकारची आत्मीयता बाळगणारा नेता असे त्यांचे वर्णन करता येईल.

या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना जवळून पाहण्याची व काम करण्याची संधी मला मिळाली. परंतु त्यांच्याइतका  सरळ मनाचा व चर्चेला मोकळा असणारा दुसरा नेता मी या देशात हिलेला नाही.

महाराष्ट्राची उभारणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याचे मोहोळ उभे केले. ही उभारणी करताना त्यांनी त्यांच्याद्वारे अनेक संस्था उभारल्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणा-या कार्यकर्ताला संस्थेचा पायाच आधारभूत असला पाहिजे; असे त्यांचे मत होते. या त्यांच्या कल्पनेमधूनच सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, क्रीडा संस्था निर्माण झाल्या. महाराष्ट्रामध्ये या सर्व संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात उभे करून या उभारणीला सत्तेची साथ नसेल तर या विधायक कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतील. ते अडथळे निर्माण झाले तर हा उभा केलेला संस्थात्मक डोलारा कोलमडेल आणि त्याचा विपरीत परिणाम तेथील कार्यकर्त्यापेक्षा ज्या सर्वसामान्य लोकांसाठी त्या संस्थांची उभारणी आहे त्या सर्वसामान्यांच्या जीवनावर होईल म्हणून सत्तेच्या राजकारणापासून आपण बाजूला जाऊ नये अशा प्रकारचा त्यांचा दृष्टीकोण होता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ही गोष्ट आपणास जाणवली असेल किंवा विशेषत: १९५६-५७ साली राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला नाममात्र बहुमत असताना आणि एका बाजूला सर्वश्री एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील, आचार्य अत्रे, यांच्यासारखे धुरंधर पुढारी असताना त्यांनी ज्या पद्धतीने सदनाचे काम चालविले त्यावरून हे सिद्ध होते. त्यानंतर अतिशय कठीण काळामध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. विशेषत: त्या काळामध्ये अनेक राज्यांमध्ये वेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेवर आली होती. देशात अनेक समस्या होत्या. त्याचबरोबर पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न बिकट झाला होता. अरूणाचलमसारखी छोटी राज्ये निर्माण झालेली होती. त्याकाळामध्ये प्रभावी संसदपटू म्हणून ते गाजले. त्यांनी देशाला स्वच्छ प्रशासन दिले.