• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७३-१

बोर्डीहून आम्ही कोसबाडला आलो. पू. तार्इंच्या सर्वच कामाचे साहेबांना कौतुक होते. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी नवे काम सुरू केले, या तरूणास लाजवणा-या त्यांच्या धडाडीबद्दल त्यांना अभिमान वाटत असे.

आणि म्हणूनच एका वार्षिक समारंभाच्या निमित्ताने कोसबाडला येण्याचे आमंत्रण त्यांनी अगदी आनंदाने स्वीकारले. त्यांना वेळ थोडा होता. म्हणून एका दृष्टिक्षेपात संस्थेचे सर्व विभाग दाखवता यावे, अशी रचना करण्यात आम्ही आमचे कौशल्य पणाला लावले होते. त्याचे त्यांना खूप कौतुक वाटले. आदिवासी भागात शिक्षणाचे लोण पोचविण्याचे पवित्र काम हाती घेतल्याबद्दल त्यांनी तार्इंची पाठ थोपटली. अर्थात आम्हा कार्यकर्त्यानाही ती शाबासकीच होती.

कामानिमित्त पू.तार्इंच्याबरोबर साहेबांच्या घरी भेटीला जाण्याचे एक दोन प्रसंग आठवतात. अत्यंत प्रेमाने स्वागत होई. सौ. वेणूताई हसतमुखाने सामो-या येत. एखाद्या मुख्यमंत्र्याच्या अगर संरक्षणमंर्ताच्या घरी आपण आलो आहोत, असे मुळीच वाटत नसे. प्रेमळ पाठीराख्या मित्राच्या घरी आलो आहोत, अशीच मनोमन छाप पडत असे. हे प्रसन्न, प्रेमळ, सुखी घर बघून आनंद वाटत असे.

साहेब महाराष्ट्रातून दिल्लीला गेले. भारताच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण धुरा उचलली. उपपंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचे कर्तृत्व, त्यांची धिमी पण विचारपूर्वक पडणारी पावले, त्यांचे प्रभावशाली वक्तृत्व सर्वांचीच वर्तमानपत्र, रेडियोद्वारा भेट होत असे. आनंद वाटायचा.

त्यांच्या स्मृतीस वंदन.