• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५९-१

त्यांचे ‘कृष्णाकाठ’ हे प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांच्या कलासक्त, गंभीर वृत्तीचे अनेक पुरावे मला सापडले. या पुस्तकाबद्दल मी मन:पूर्वक लिहिले आणि आकाशवाणीवर बोललो. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्याबद्दल स्वत:च्या अक्षरात त्यांचे पत्र आले.

१ रेसकोर्स रोड
नवी दिल्ली - ११० ०११

२२-९-८४

श्री. हातकणंगलेकर यांसी,

स.न.वि.वि.

तुमचे पत्र व ‘कृष्णाकाठ’ चे तुमच्या परीक्षणाचे, (कोल्हापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाले ते) कात्रण मिळाले. कोणा एका रसिक मित्राने मला ते यापूर्वीच पाठवून दिले होते. त्यामुळे मी ते आधीच वाचलेले आहे.

मी तुमच्या रसग्रहणाबद्दल आभारी आहे. अनेक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. सर्वच तशी छान आहेत. तुमचे परीक्षण अधिक दर्जेदार आहे म्हणून मला त्याचे महत्त्व आहे. आपण कधी भेटलो तर अधिक बोलता येईल. पुनश्च आभार!

आपला
यशवंतराव चव्हाण

त्यानंतर यशवंतराव दोन वेळा सांगली, कोल्हापूरच्या दौ-यावर आले. मी गाठ घेण्याचा प्रयत्न केला पण गाठ पडली नाही. एकदा ते वाटेवर गौरिहर सिंहासने यांच्याकडे थोडा वेळ थांबले होते. तिथून त्यांनी मला निरोप पाठविला. त्या वेळी मी नेमका परगावी होतो. परत आल्यावर, मला ही गोष्ट जेव्हा समजली, तेव्हा फार हळहळ वाटली. अखेर त्यांची भेट झालीच नाही.