• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४५-४

सत्कार समारंभातल्या त्या भेटीने आम्ही एकमेकांच्या फार जवळ आलो. मग भेटीवर भेटी झाल्या. त्यांनी मला आग्रहाने कविता वाचायला लावल्या. कथा सांगायला लावल्या. आम्ही खूप खूप बोललो. १९६२ साली त्यांनी सांगितले म्हणून मी निवडणूक प्रचाराची गाणी लिहिली. थोडी कुचेष्टा झाली ती होतच असते. ती निवडणूक अत्यंत यशस्वी झाल्यावर माझ्या कामाची शाबासकी स्पष्ट शब्दात व्यक्त करायला यशवंतराव विसरले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी वाङ्मय, कला, संस्कृती यांच्यासाठी पुष्कळ काही केले.  आज त्यांचा वारसा सांगतच महाराष्ट्राचे राज्य पुढे चालले आहे. मराठी विश्वकोशाच्या महावृक्षाचे बी यशवंतरावांनीच पेरलेले आहे.

कर्तव्यदक्ष प्रशासक, त्यागी देशभक्त, दिग्विजयी नेता, जिव्हाळ्याचा मित्र, मातृभक्त पुत्र आणि नीतिसंपन्न गृहस्थ अशी यशवंतरावांची अनेक रुपे आहेत. माझ्या मते समतोल विचार हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे. ते कधीही एकात्मिक भूमिका घेत नाहीत.

यशवंतरावांना साठ वर्षे पूर्ण झाली हे खरे वाटत नाही. सा-या सा-या गोष्टी काल परवा घडल्यासारख्या वाटतात. बेचाळीसचा लढा.. स्वातंत्र्यलाभ... संयुक्त महाराष्ट्र दिवस... प्रतापगड... शिवनेरी... चीनशी युध्द... पाकिस्तानी युद्ध... बांगला देश... आमच्या भेटी... नागपूरमधल्या.. महाबळेश्वरच्या... खुल्ताबाद... पुणे.. दिल्ली... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा यशवंतरावांचा उल्लेख "सर्वांत तरुण मुख्यमंत्री" म्हणून केला जात होता. आज त्यांनी साठी ओलांडली !

मार्ग तरुणांनीच चालायचा असतो. पण....

मार्गदर्शन अनुभवसंपन्नांचीच करावे लागते.

लढ्याचा सेनानी प्रांताचा मुख्यमंत्री देशाचा संरक्षणमंत्री या सर्व भूमिका यशस्वी रीतीने पेलणारी "काबिल" माणसे क्वचित जन्माला येत असतात. भारतासारख्या अर्धविकसित आणि खंडतुल्य देशात शासन आणि संघटना या दोन्हीतही अतिरेकी भूमिका घेऊन निभत नाही. यशवंतरावांनी हे जाणले आहे. म्हणून ते विराजमान होतील. ते पद प्रतिष्ठा पावते.