• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १७६

स्वतंत्र भारताने आपल्या राजकीय जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणून या धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केल्यानंतर अलीकडे अशी टीका ऐकू येते, की सार्वजनिक समारंभाच्या वेळी काही धर्मकृत्ये, धर्मविधी केल्यास धर्मनिरपेक्षतेचा पाया खर्‍या अर्थाने रोखला जात नाही का? परंतु या टीकेबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मीपणा नव्हे. शिवाय देशातल्या ध्येयधोरणांवर किंवा कायद्यांवर जोपर्यंत कोणत्याही एका धर्मातील कल्पनांचा प्रभाव पडत नाही, तोपर्यंत त्या देशातील धर्मनिरपेक्षतेचा पाया कच्चा झाला, असे मला वाटत नाही. धर्मविधी, धर्मकृत्ये, धर्मसंस्कार व देशातील कायदे यांमध्ये फरक हा केलाच पाहिजे, व्यक्तिगत जीवनातील श्रद्धा सामाजिक ध्येयधोरणांवर या कायद्यावर जोपर्यंत अंमल गाजवीत नाहीत, तोपर्यंत तक्रार करण्याचे काही कारण नाही, असे मला वाटते.

भारतीय राष्ट्रवादामधील आजच्या घडीची आणखी एक समस्या ही प्रदेशाप्रदेशांमधील वादाच्या संदर्भातील होय. गेल्या काही वर्षांत या वादाने अनेक वेळा अनेक तर्‍हेने डोके वर काढले आहे. परंतु या वादामागेदेखील आपल्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाची जबरदस्त प्रेरणा आहे, हे विसरून चालणार नाही. प्रत्येक प्रदेशाला वाटते, की आपला आर्थिक विकास झपाट्याने व्हावा आणि यातूनच दोन राज्यांतील तणातणी निर्माण होत आहे. काही प्रमाणात हे स्वाभाविकही मानले पाहिजे.सर्वच विकसनशील राष्ट्रांतील संक्रमणकाळातील ही समस्या आहे. परंतु आर्थिक विकासाची ही प्रेरणा व्यक्त करताना लोकशाहीच्या संदर्भात आपण काही लक्ष्मणरेषा आखून घेतल्या पाहिजेत, असे मला जरूर वाटते. आपल्या आर्थिक विकासाच्या उत्कट इच्छेमुळे, भारतीय राष्ट्रवादाला तडा जाणार नाही, एवढा विवेक, संयम पाळलाच पाहिजे. हा विवेक जर पाळला, तर मग आपल्या प्रदेशाची झपाट्याने आर्थिक प्रगती व्हावी, ही प्रेरणा संकुचित म्हणता येणार नाही. प्रश्न आहे, तो संयमाचा, विवेकाचा, राष्ट्रनिष्ठेचा. तो संयम पाळला, तर या प्रवृत्तीतूनही आर्थिक विकास पूर्ण करून आपल्याला राष्ट्रवाद शाबूत ठेवता येईल.

जातिनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष असे सामाजिक ऐक्याचे नवे पर्व निर्माण करून समाजात समता, स्नेहभाव वाढविण्याचा, समाजपुरुष हा येथून तेथून एक आहे, ही भावना निर्माण करण्याचा भारतीय राष्ट्रवादाचा मूलतः प्रयत्‍न आहे.

धर्मभावनेतून निर्माण झालेल्या, धर्माने दिलेल्या विषमतेची निरपेक्षता राष्ट्रवादामध्ये अनुस्यूत आहे. हिंदू समाजापुढे यामुळे एक पुरोगामी विचार आला आहे. सामाजिक क्रांतीचा विचार सांगणारा पुरोगामी राष्ट्रवाद हेही या राष्ट्रवादाचे स्वरूप आहे. आपल्या लोकशाही राज्याची उभारणी ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूलभूत पायावरच झाली आहे.