• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १४५

सरदाराच्या पोटी जन्म होऊनही पित्यापासून वंचित झाल्यामुळे आईच्या मायेखाली जवळ जवळ एकाकी असे जीवन महाराजांना लहानपणी काढावे लागले, कर्तृत्ववान माणसे त्यांना आपल्या भोवताली उभी करावी लागली आणि फार मोठ्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. पण एका विशाल सत्तेशी लढण्याचा विडा उचलून ते बसले होते, लढत होते, पण मनाने ते कधीच हरले नाहीत. अधूनमधून संकटे आली, तरीही नवे राज्य उभे करण्याचा ते प्रयत्‍न करीत होते. गडामागून गड घेतले, पण पित्याचा रोष होईल, ही भीती मनामध्ये निर्माण झाली. त्यांनाही सावरावे, आईलाही सावरावे, सार्‍यांना सावरावे, आणि आपल्या नव्या राज्याच्या संसाराचे काम पुढे पुढे नेत राहावे, असे सारखे चालले होते. क्षणाक्षणाला ज्या महापुरुषाने हे काम केले, त्याच्या जीवनात किती संकटे आली असतील, किती निराशा आली असेल? पण हे सगळे सहन करीत-करीत त्या महापुरुषाने एक नवा इतिहास आम्हांला दिला.

आज तुम्ही-आम्ही सगळी माणसे आपल्या कृतज्ञतेची फुले शिवाजीमहाराजांना वाहत असतो. पण महाराज जेव्हा इतिहासाचे जीवन जगत होते, इतिहास घडवीत होते, तेव्हा त्यांच्या जीवनाचा अर्थ सहानुभूतीने समजून घेणारी जाणती माणसे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर फार थोडी होती, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या अभिषेकासाठी त्यांना महाराष्ट्राच्या सीमेबाहेरून गागाभट्टांना आणावे लागले, आणि त्यांच्या गुणांची गाथा गाण्याकरिता बुंदलेखंडातल्या भूषणांना येथे यावे लागले. ज्याला महाराजांचे गुण समजले होते, असा एक प्रतिभावान पुरुषमात्र या महाराष्ट्रात होता आणि तो म्हणजे समर्थ रामदास. पण महाराष्ट्रातील सामान्य माणसे, मावळे, लंगोट्या घालून जीव देण्यासाठी महाराजांच्या पाठीमागे लक्षांनी उभी होती. एका कठीण परिस्थितीत महाराज दिल्लीला गेले आणि राजकारणातला डाव फसून अंगावर येतो, की काय, असा प्रसंग आला. आग्र्यामध्ये कैदी झाले. तेथूनही पार झाले. राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर त्यांच्या जीवनात अनेक करुण प्रसंग आले. चंद्राचा प्रकाशमान भागच जसा आपल्याला दिसतो, तसेच कर्तृत्ववान माणसाचे जे प्रकाशमान जीवन असते, तेच फक्त दुनियेला दिसते, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनतील व्यथांची आपल्याला कल्पना नसते. नव्याने स्थापन केलेले हे राज्य राहील कसे, टिकेल कसे, कौटुंबिक वादातून त्याला शाप लागेल, की काय, अशा प्रकारच्या अनेक चिंता महाराजांच्या मनाला लागून राहिल्या असतील. त्यांची आपल्याला कल्पनाही येणे शक्य नाही. परंतु ते जे तेजस्वी, पराक्रमी, कर्तृत्ववान असे जीवन जगले, त्याने आपल्या मनाला विलक्षण ओढ लागली. त्या जीवनातून एक तेजस्वी शक्ती आमच्या मनामनांमध्ये, घराघरांमध्ये सतत तेवत राहिली आणि अद्यापिही ती तेवत आहे. तिला व्यक्त स्वरूप कवीने देण्याची फार गरज होती; आणि ते व्यक्त स्वरूप कवी यशवंतांनी आज तिला या महाकाव्याच्या रूपाने दिले आहे.

महाराष्ट्राबाहेर रवींद्रांनी आणि इतर अनेक कवींनी शिवाजीमहाराजांची गीते गायली आहेत. शिवाजीमहाराजांचे नाव महाराष्ट्राबाहेर हिंदुस्थानातील सगळ्या जाणत्या माणसांना ठाऊक आहे. बंगालमध्ये आपण गेलो, म्हणजे तेथील माणसे शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या आदराने आपल्यासमोर काढतात.