• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १३५

दुसरा जो एक महत्त्वाचा गुण नेतृत्वाला आवश्यक असतो, तो म्हणजे अवतीभोवती अडचणी असलेल्या कष्टकरी माणसांबद्दलची सहानुभूती. हा गुण त्यांच्यांत प्रथमपासूनच विपुलतेने वास करीत आहे. त्याचप्रमाणे निःपक्षपातीपणा, निःस्वार्थीपणा हे गुणही त्यांच्या लहान-सहान गोष्टींत दिसून येतात. छोट्या-छोट्या प्रश्नांत मार्गदर्शन करून, त्यातून लोकांचा विश्वास व चांगुलपणा प्राप्त करून घेणे हे फार मोठ्या प्रश्नांमध्ये नेतृत्व करण्यापेक्षा कठीण काम आहे, याचा अनुभव ग्रामीण जीवनाचा मामला ज्यांना माहिती आहे, त्यांनाच कळेल.

या वर सांगितलेल्या गुणांमुळे विखे पाटील स्वाभाविकच नैसर्गिकरीत्या आपल्या अवती-भवतीच्या लोकांचे व आपल्या गावाचे नेते बनले आणि हळूहळू हे नेतृत्व अधिक विकसित होऊ लागले. आपल्या गावाचे नेतृत्व करीत-करीत गावाच्या परिसरात असलेल्या इतर मंडळींना ते ओळखू लागले. त्यांच्या प्रश्नांमध्ये ते लक्ष घालू लागले आणि यामुळे त्यांच्या रूपाने एक प्रौढ व्यक्तिमत्त्व नव्याने निर्माण होणा-या परिस्थितीला तोंड देण्यास उभे राहिले.

दुस-या महायुद्धाच्या वेळी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे मर्म त्यांनी पुरेपूर जाणले होते. राष्ट्रांमध्ये नव्या राजकीय विचारांचे वारे वाहू लागले होते. नवीन जाणती माणसे शेतक-यांच्या जीवनातील आर्थिक प्रश्नांत व्यासंगपूर्ण लक्ष घालू लागली होती. सहकारी बँकांसारख्या नवीन संस्थांचा ग्रामीण जीवनात व शेतकी व्यवसायात प्रवेश झाला होता. भविष्यात जे कर्तृत्व करावयाचे होते, त्यासाठी लागणारा सर्व मालमसाला प्रत्यक्ष परिस्थितीत उपलब्ध झालेला होता. साखरव्यवसायाने चांगलीच प्रगती केली होती. परंतु तो खासगी मालकीच्या दावणीत असल्यामुळे त्याची आरोग्यदायी वाढ होईल, अशी परिस्थिती दिसत नव्हती. आरोग्यदायी वाढ याच्यासाठी म्हणतो की, उसाचा पुरवठा करण्याकरिता शेतक-यांची पिळवणूक होईल, अशा त-हेची धोरणे आखली जात होती आणि व्यवहारात शेतक-यांची शेतीची मालकी त्यांच्याकडून काढून खासगी कारखानदारांच्या मालकीची केली जात होती. यामध्ये एका नव्या पिळवणुकीची साथ सुरू होण्याची धास्ती होती.

शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर चांगला ऊस व्हावा, हे स्वाभाविकच, आणि तोच क्रम पुढे चालवून चांगल्या उसाचा पुरवठा झाला, तर औद्योगिक तज्ज्ञतेच्या मदतीने विपुल साखर काढणारा साखरधंदा वाढावा, हेही तितकेच स्वाभाविक होते. कृषिऔद्योगिक विकासाची ती अपरिहार्य अशी प्रक्रिया होय. परंतु  हे सर्व शक्य असतानाही नव्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहणा-या नेतृत्वाचा अभाव यामुळे शेतीच्या प्रगतीसाठी उपलब्ध झालेली ही नवी संधी फुकट जाणार, की काय; व प्रगतीच्या ऐवजी पिळवणुकीचा एक नवा संघर्ष महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत उभा राहतो, की काय, अशी परिस्थिती नैसर्गिकरीत्या कृषि-औद्योगिक समाजाची वाढ करण्यास पोषक अशी होती. परंतु याची जाणीव परकीय राज्याला नव्हती. समाजधुरीणांमध्ये त्यासंबंधीचा पूर्ण विश्वास निर्माण झालेला नव्हता. परिस्थितीचा हा संदर्भ लक्षात घेतला, म्हणजे विखे पाटलांनी पहिल्या सहकारी कारखान्याबाबत तयारी करताना जे धोरण आणि दृष्टी दाखविली, ती गुणात्मक दृष्टीने कशी विशेष प्रकारची आहे, याचे महत्त्व लक्षात येते.

सहकारी साखर कारखाना काढण्याचा निर्णय ज्या बागायतदार परिषदेमध्ये झाला आणि ज्या परिषदेचे मार्गदर्शन डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी केले, त्या परिषदेतही छोटा खातेदार शेतकरी हा भागीदार असावा, हा विचार आग्रहपूर्वक मांडून विठ्ठलरावांनी आपली दूरदृष्टी सिद्ध केली. आज पाठीमागे वळून पाहत असताना त्यांच्या या जाणिवेबद्दल आश्चर्य वाटते व मन त्यांना धन्यवाद देते.