• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १३२

तो एक केवळ ध्यास नव्हता. ह्या अट्टहासामागे असीम खटाटोप होता, कष्टांची उपसण होती, ध्येयवादाची बेहोशी होती. 'लोकांना हे कळले पाहिजे' हा महामंत्र वारंवार हे घोकीत होते, उच्चारीत होते. आचार्य जावडेकरांनंतर 'लोकशक्ति' चे संपादन हाती घेताना घमेंड नव्हती, पूर्वसूरींचा अनादर करण्याची भावना नव्हती, स्वतःबद्दलचा अनाठायी विश्वास नव्हता, तर 'लोकांना हे कळले पाहिजे' आणि त्यासाठी झीज सोसून राबण्याची गरज आहे, अशी मनोधारणा होती. तीच मनोधारणा आजही आहे. काळाचे आव्हान नरूभाऊंनी स्वीकारले आणि आपल्या शक्त्यनुसार झुंज दिली. माझ्या नजरेतून हा एक त्यांचा जीवनविशेष आहे.

स्वर्गीय काकासाहेब गाडगीळांच्या जीवनाचा नरूभाऊंच्या जीवनावर झालेला परिणाम मला स्पष्ट दिसतो. नरूभाऊ काकांप्रमाणेच आपल्या सहधर्मचारिणीबाबत भाग्यवान आहेत. काकांच्या व नरूभाऊंच्या पिढीत अशा स्त्रिया ह्या भूमीत जन्मल्या, वाढल्या, वावरल्याचे आपल्याला सर्वांना माहीत आहे. घरात चूल पेटविण्याची पंचाईत असे कधीकाळी, पण गृहिणीने आल्या अतिथीचे प्रसन्न मुखाने स्वागत केले नाही, असे कधी झाले नाही. ध्येयाच्या धुंदीत पुष्कळ आधिव्याधींचा विसर पडतो, पण ध्येयधुंद माणसांची घरे सांभाळणे फार अवघड गोष्ट आहे, ती एक कला आहे. ते एक व्रत आहे. घरात असेल-नसेल, त्याची व स्वसुखाची आहुती ध्येयपूजेच्या यज्ञकुंडात देणे सोपे नाही. नरूभाऊंच्या पत्‍नीने, सौ. मीरावहिनींनी, नरूभाऊंच्या जीवनयज्ञात सर्वस्व ओतले. त्यांनी अमाप सहन केले. घराचा अखेरचा आधार, स्त्रीचा अखेरचा आधार स्त्री-धन! त्याला पावित्र्याचे कुलूप लावून अडीअडचणीलाही हात घालता येऊ नये, अशी आपल्या परंपरेने व्यवस्था करून ठेवली आहे. पण दागिने विकूनही पत्रासाठी पैसे उभे करण्यास वहिनींनी आपला हातभार लावला. समाजाच्या सेवेसाठी ह्या दोघांनी त्यागाची ही सीमा गाठली. 'त्याग' हा शब्द फार गुळगुळीत झाला आहे. तो जपून वापरायला हवा. त्याचे वजन जाता उपयोगी नाही. व्यक्ती व प्रसंग ह्यांच्या अनुषगांने त्या शब्दाला योग्य ते वजन देण्याची कला आपल्याला शिकायला हवी. एरव्ही फसगत व्हायची!

मारुनि ज्यांना जगणें न इच्छूं । झुंजावया तेचि उभे समोर' असे भगवद्‍गीतेत वर्णिल्यासारखे प्रसंग माझ्या आयुष्यात पुष्कळ उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी तर अशा घटनांची पुनरावृत्ती झाली. त्या वेळी तात्त्विक मतभेदाने माझ्या समोर दुसरी बाजू घेऊन पुष्कळ संबंधी उभे होते. पण त्यांच्यांतही माझ्या बाजूला असलेल्यांपेक्षा प्रेमात तसूभरही कमी नसलेले पुष्कळ होते. अडचणीच्या वेळी तात्त्विक मतभेद बाजूला ठेवून मंडळींनी मला मदत केली. माझ्यावर वैयक्तिक हीन हल्ले केले नाहीत. नरूभाऊ तर आमचेच होते. सहमती असेल, तर सर्व सामर्थ्यनिशी झटून त्यांनी मला साहाय्य दिले. क्वचित माझा निर्णय, दृष्टिकोन त्यांना पूर्णांशाने पटला नसला, तरी तो माझा दृष्टिकोन आहे, यासाठी जाणीवपूर्वक त्याची कदर केली आणि ते सतत पाठच्या भावासारखे माझ्या मागे उभे राहिले. त्यांच्या मनातील माझ्यासंबंधीचा जिव्हाळ्याचा झरा ऐन उन्हाळ्यातही कधी सुकला नाही.

पुनरावृत्तीचा थोडासा दोष पत्करूनही मी म्हणेन, की नरूभाऊंची मी बुद्धिमत्ता पाहिली, जनकल्याणाची तळमळ पाहिली, पटल्या गोष्टी साकार करण्यासाठी लागणारी जिद्द पाहिली, स्वतःच्या मताशी इमान राखण्याची हिंमत पाहिली, जुटून काम करण्याची वृत्ती पाहिली आणि प्रयोग करून पाहताना धोके झेलण्याची शक्ती पाहिली. मग प्रश्न मनात येतो, तो हा, की या गुणी माणसाच्या सर्व गुणांचे चीज झाले का? समाजाच्या सेवेत आपल्या अंगचे सारे गुण राबविण्याची संधी नरूभाऊंना मिळाली का? या प्रश्नाचे माझे उत्तर 'नाही' असे आहे. या जाणिवेने मला हळहळ वाटते. पण त्या हळहळीचे स्वरूप समजून घेण्याचा मी यत्‍न करतो. लौकिक अर्थाने पुढे सरलेल्याने लौकिक अर्थाने तेवढे पुढे सरायला न मिळालेल्या व्यक्तींबद्दल स्वतःचा मोठेपणा वाढविण्यासाठी यत्‍नपूर्वक वाढीला लावलेली माझी हळहळ नाही. आपला इतरांनी हेवा करू नये, निदान त्याच्या कडक कडा घासल्या जाव्यात, ह्यासाठी जतन केलेली ती हळहळ नाही.