• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव १०५

वसंतदादांच्या कर्तृत्वाबद्दल लिहितात, ''कृष्णकोयनेचा प्रीतिसंगम हा निसर्गाने दिलेला संगम आहे.  पण काळी जमीन व कृष्णा नदी यांचा झालेला आजचा संगम हा माणसाच्या कर्तृत्वाने घडलेला संगम आहे.''  एकेक मिताक्षरी वाक्यातून व सर्वसामान्य घटनांतून त्या व्यक्तीच्या असामान्यत्वाचे दर्शन घडवतात.  मनुष्यजीवनातील काही निष्ठांवर, आदर्शावर व मंगल मूल्यांवर यशवंतरावांचा नितांत विश्वास आहे.  ह्या व्यक्तिचित्रणातील पुष्कळशा लेखांना त्यांच्या अस्सल भारतीय तत्त्वचिंतनाचा परिसस्पर्श झालेला आहे.  भाऊसाहेब वर्तकांच्या व्यक्तिचित्रणातील चिंतनशील विचार महत्त्वाचे आहेत.  ''अनुभव हा कार्यातून मिळवायचा असतो.  त्यासाठी मनाची एक विशिष्ट बैठक, तो ग्रहण करण्याची पात्रता व कार्यपद्धतीची निश्चित दिशा असावी लागते.  या गुणांनी युक्त भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व आहे.''  अशा रीतीने नावीन्यपूर्ण आणि कसदार अनुभव उचित चिंतनशील वृत्तीने कलात्मक स्वरूपात व्यक्त करतात.  यशवंतरावांनी एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाला केंद्रस्थानी मांडून त्याचे रसरशीत आणि स्पष्ट चित्र निर्माण केलेले आढळते.

यशवंतरावांनी त्यांच्या व्यक्तिचित्र रेखाटनात समाजप्रबोधनाची भूमिका स्वीकारलेली आहे.  याचबरोबर व्यक्तिदर्शनालाही महत्त्व दिलेले आहे.  व्यक्तीचा आपणास अज्ञात असलेला एखादा स्वभाव पैलू मोठ्या कौशल्याने यशवंतरावांनी रेखाटला आहे.  जीवनात लौकिक अर्थाने मोठी असणारी माणसेच यशवंतरावांच्या व्यक्तिचित्रणात आहेत.  त्यामुळे दुःखाच्या खाईत होरपळून गेलेल्या व्यक्तींची चित्रणे कमी आढळतात.  यशवंतरावांच्या व्यक्तिचित्रणाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे आपल्या लेखणीत चित्रित केलेल्या व्यक्तींच्या स्वभावविशेषावर ठळक स्वरूपात दिलेला भर तसेच व्यक्तिचित्रण परिणामकारक व कलात्मक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगांचा केलेला उपयोग.  अशी व्यक्तिचित्रे वाचकांची सहानुभूती प्राप्‍त करतात.  पण त्यांना सखोलता व परिपूर्णता प्राप्‍त होत नाही.  त्या त्या व्यक्तिचित्रणातील एखादी दुसरी बाजू दाखवल्याने त्या व्यक्तिचित्रणाला अपूर्णता आल्यासारखे जाणवते.  तरीही यशवंतरावांनी काही व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून जीवनमूल्यांचा साक्षात्कार घडविण्यावर भर दिलेला दिसतो.  सदाचार, सद्विचार, त्याग, सेवा, प्रेम सहानुभूती इ. गुणांचा साक्षात्कार त्या व्यक्तिचित्रणात केला आहे.  त्यामुळे आचार आणि विचारालाच त्यांच्या व्यक्तिचित्रणात अधिक महत्त्व लाभलेले आहे.  

यशवंतरावांनी अधूनमधून वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या प्रवृत्तीवर सतत भाष्ये केली आहेत.  जीवनाचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे.  व्यक्तीतील अलौकिक गुणांची, प्रवृत्तीची, मोठेपणाची, अनेक वर्णने चित्रित केली आहेत.  सामान्यांची ही दुःखे सहजच यशवंतरावांच्या लेखणीत सामावली आहेत.  ती दुःखे व्यक्त होताना त्या दुःखांना एक तीव्र धार चढते.  वाचकांस ती जाणवल्यावाचून राहत नाही.  त्यामुळे या व्यक्तिचित्रणाला सजीवता प्राप्‍त होते.  त्यांच्या व्यक्तिचित्रणात स्वभावगुणांचा कलात्मक आविष्कार झालेला आहे.  अशा वैशिष्ट्यांनी नटलेली ही आदर्श व्यक्तिचित्रे साक्षात चैतन्यरूप धारण करतात.