• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८९

१६) “संकटाची सुद्धा चव घ्यावी लागते. खडीसाखरेची गोडी माहिती नसलेल्या माणसानं ती खाल्ल्याशिवाय तिच्या गोडीचं ज्ञान होत नाही-तसंच संकटांचं आहे. ती सामाजिक असोत, राजकीय असोत, ती चाखावीच लागतात. निश्चयी लोक आपल्या कार्यापासून कधी उद्विग्न होत नाहीत. याबद्दलचे दाखले मी जेव्हा इतिहासात वाचतो, त्यावेळी संकटं चाखायची, ती कशासाठी हे उमजतं.”
(कृष्णाकाठ, आत्मवृत्त)

१७) “सांप्रदायिकतेने एखाद्या विचारांशी बांधून घेणे हा माझा स्वभाव नाही. जे मला पटत नाही, त्या विचारातून आणि कृतीतून दैनंदिन जीवनाला योग्य ते मार्गदर्शन लाभणार नसेल, तर मी या विचारापासून अलग होत गेलो आहे. वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो की, ज्यातून कार्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. तसे न होईल, तर त्या विचारातच काहीतरी चूक असली पाहिजे, असे समजण्यास हरकत नसावी. तशी चूक असेल, तर विचार तपासण्याची माझी वृत्ती असते. १९४० पासूनची ती वैचारिक बैठक राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झाली आहे.”
(कृष्णाकाठ, आत्मवृत्त)

टीप – (लोकनेते यशवंतराव चव्हाम यांचे उदधृत केलेले विचार, जीवनपट इ. महितीसाठी खालील पुस्तकांचा उपयोग केला आहे. ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ संपादक प्रा. अशोक नाईकवाडे, औरंगाबाद; ‘युगांतर’, ‘कृष्णाकाठ’, ‘भूमिका’ लेखक यशवंतराव चव्हाण; ‘यशोदीप’ लेखक डॉ. शिवाजीराव चव्हाण; ‘शब्चे सामर्थ्य’ संपादक – राम प्रधान; ‘यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्व’ संपादक- भा. कृ. केळकर; ‘सह्याद्रीवरील सूर्यास्त’ – लेखक रामभाऊ जोशी) या सर्व पुस्तकांचे लेखक, संपादक, प्रकाशक यांचे आभार व ऋण व्यक्त करतो. संपा, श्री. रमेश चव्हाण